लहान मुले

मुंज मुलाला काय भेट देता येईल?

Submitted by आभा on 25 November, 2021 - 19:00

परदेशात राहणाऱ्या मुलाला मुंजीनिमित्त काय भेट देता येईल?
परदेशात राहणाऱ्या हे एव्हढ्यासाठी लिहिलं आहे कि आकाराने /वजनाने फार मोठ्या वस्तु देता येणार नाहीत.
पण इथेच भारतातील मुलांसाठी असं लिहुन सल्ले लिहिल्यास बाकीच्यांना उपयोग होऊ शकेल.
तर मंडळी कृपया मदत करा.

आदर्श संगोपन - भाग २

Submitted by सतीश कुमार on 24 October, 2019 - 07:25

आदर्श संगोपन - भाग २

माबोवरील माझ्या प्रिय वाचक आणि वाचकिणीनों, ( मालक आणि मालकीण ह्या धर्तीवर. खरं म्हणजे नायक आणि नायिका असेल तर मालक आणि मालिका असायला हवं. कृपया सूज्ञ वाचकांनी मादक आणि मादकिण असा नवा शब्द प्रयोग रूढ करावा का याचा विचार करावा.)

विषय: 

अद्भूत खेळण्या

Submitted by स्वप्नाली on 24 February, 2016 - 13:59

लहान मूलाना बर्‍याचदा स्वत: च्या खेळण्या कंटाळवाण्या होतात..तेच तेच खेळायला नको वाटते, कधी कधी खेळायला कोणी सोबत नसते..अश्या वेळी, कोणत्या वस्तू मूलाना देता येतील ज्या त्यांच्या साठी नवीन असतील (वय 2-10 वर्षे), ज्यामधून त्यांना शिकायला ही मिळेल.
उदा: लोह-चुंबक, दरवज्याचा आय-होल, भिंग (मॅगनिफाइंग ग्लास), किचन मधले मोज-मापाचे चमचे. चला करू या यादी..

विषय: 

मुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय

Submitted by मुग्धा केदार on 1 December, 2015 - 07:27

माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे.

विषय: 

लहान मुलांसाठीच्या वाहिन्या

Submitted by स्वस्ति on 21 October, 2014 - 03:25

जाहिरातिंच्या धाग्यावर चर्चा सुरु झाली म्हणून नविन धागा काढला

शब्दखुणा: 

असे होते का?

Submitted by _आनंदी_ on 18 November, 2013 - 02:39

माझी मुलगी १ वर्ष , ४ महिन्यांची आहे...
खुप दंगा मस्ती करते .. त्या बाबत काही प्रश्न नाही उलट मजाच येते..
पण खेळायच्या नादात भुके कडे अजिबात लक्ष नसते..
भुक लागली कळाले तरी खेळातच इंटरेस्ट असतो...
दाढा आल्या नाहियेत... दात मिळुन ८ आलेत...
खाण्याची आवडच नसल्याने उपमा शिरा सारख थोड काही घातल तर टाकुन देते वा खुप उशिर तोंडातच ठेवते...
सध्या तिला अम्ही.. दुध-बिस्किट, तांदुळ आणि डाळ भाजुन बारिक करुन केलेलि पुड शिजवुन, रव्याचा शिरा-उपमा,गव्हाची पोळी दुधात अगदी मऊ करुन कुस्करुन देतो...
आहारात अजुन काही मिसिंग आहे काय?

विषय: 
शब्दखुणा: 

लहान मुलांचे वेळापत्रक [वय १ ते २]

Submitted by प्रितीभुषण on 25 June, 2012 - 04:25

माझी लेक आता १९ महिन्याची झाली आहे
आधी जायची प्ले स्कुल ला [मी जोब शोधत आहे ना म्हणुन मला वेळ मिळावा म्हणुन मिच घातल्ले तिला पण आता घरीच ठेवलय
तिचे वेळा पत्रक कसे बनवु
तुमच्या पैकी कुणी आसे बनवले आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लहान मुले