मुलांच्या विचीत्र सवयी आणि त्यावरील उपाय
माझा मुलगा दिड वर्षाचा आहे. त्याला एक विचित्र सवय आहे. खालचा ओठ वरच्या दाताखाली घट्ट दाबुन ठेवतो. काही बोलताना किंवा खाताना सोडुन बाकीवेळ तसाच असतो, आपण सांगितल की तेवढ्या पुरता ओठ काढणार पुन्हा तसचं, झोपताना पण आणि झोपेत पण तसचं, आणि झोपेत तो ओठ चोखतो,अगदी आवाज येईपर्यंत. बरेच उपाय केले, कारल्याचा रस/ बारिक किस, कोरफडीचा गर जेवढ्या वेळा मी लावलं त्याने लगेच चाटून टाकलं. आणि पुन्हा तेच. आता एका ओळखीच्या डेन्टीस्टने सांगितलयं की सर्जिकल स्पिरीट लाव त्याच्या ओठाला..ते कडु असतं आणि त्याने ओठ जडावल्यासारखं होईल असं ती म्हणाली. पण असं केमिकल ओठाला लावणं कित्पत योग्य आहे.