सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.
सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११
हा नवीन कायदा येणार आहे. अल्पसंख्यांकावर कुणीही अगदी पोलिसानी दंगल करतानादेखील कारवाई केली तर त्याच्याविरोधात अल्पसंख्याकाना दाद मागण्यासाठी हा कायदा आहे.
अल्पसंख्यांकाविरोधात बहुसंख्याकांनी अन्याय केलेलाच आहे, असे समजून कारवाई होणार आणि संबंधित बहुसंख्याकाना आपले निर्दोषित्व सिद्ध करावे लागणार.
बहुसंख्याकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार.
याविरोधात मत नोंदवण्यासाठी शासनाने मुद्दामच १० जुन २०११ इतका कमी वेळ दिलेला आहे.
काल स्टॅनले का डब्बा पाहिला. खूप सुंदर सिनेमा आहे.
अवघ्या पावणेदोन तासांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाद्वारे अमोल गुप्तेने समाजातील एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. चित्रपट पडद्यावर उलगडत असताना आपलं मनोरंजन होतच असतं पण आपल्याही नकळत आपण ज्याचा शोध घेत असतो ते वास्तव अचानकपणे चित्रपट संपतासंपता आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं आणि आपण सुन्न होऊन जातो.
चित्रपटातून मांडलेल्या प्रश्नावर आपण ह्याआधी इतक्या गंभीरपणे विचार केलाही नसेल कदाचित, पण हा चित्रपट त्या सामाजिक प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतो.
आंतरजाल आणि प्रताधिकार कायदा यांतले परस्पर संबंध यात भरपूर अस्पष्ट गोष्टी आहेत. पण दिवसेंदिवस या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आज अमेरिकेत यावर भरपूर खटले चालू आहेत आणि काही खटल्यांचे निकाल या स्पष्टीकरणाला मदत करत आहेत. "Fair use" हे तत्व म्हणजे नक्की काय आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत जाते हे ही या खटल्यांमधे तावूनसुलाखून निघते आहे. या खटल्यांमधून भरपूर पैशांची उलाढाल चालू आहे.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्या, त्यांना कुस्करणार्या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.