घटस्फोट
जर बायकोला घटस्फोट नको असेल तर नवरा जबरदस्ती मिळवू शकतो का?
घटस्फोट
हल्लीच मी ठरवलं घटस्फोट घ्यायचा. इतरांनी काही केलं की मला पण तसंच करावंसं वाटतं. वाटलं घेऊन पाहू आपणही. बाकीच्यांना जमतं मग मला का नाही हा प्रश्न मी स्वत:ला विचारते आणि लागते कामाला. वरातीमागून घोडं होतं दरवेळेस. पण ठीक आहे नं, वरातीत शिरल्याशी कारण. तसंच हे घटस्फोटाचं. बाकीच्यांचे झाले पण माझा का होत नाही हे काही कळेना. खरं तर मी येता जाता म्हणतंही होते की मला घटस्फोट घ्यायचाय. नवराही तत्परतेने ’घे’ म्हणायचा. आता त्याने एखादी गोष्ट कर म्हटली तर त्याचा छुपा हेतू साध्य होईल असं मला वाटतं त्यामुळे त्याने सांगितलेलं कुठलंच काम मी लगेच करत नाही.
"पप्पा मला तुमच्याजवळ रहायचंय" अन "मम्मी मला मारू नकोस"
आपला खोटा चेहरा उघडा पाडेल ह्या भीतीने स्वत:च्याच तेवीस वर्षाच्या मुलीला जीवे मारणारी मुंबईची इंद्राणी मुखर्जी, आणि खाजगी आयुष्यात अडचण वाटते म्हणून आपल्याच तेरा वर्षाच्या मुलाला कित्येक दिवस घरात कोंडून व उपाशी ठेवून शेवटी निर्दयपणे बॅटने मारहाण करून ठार मारणारी पुण्याची राखी बालपांडे. "घटस्फोटानंतर मुलांचा ताबा आईकडे द्यावा, कारण मुलांचे संगोपन करण्यात व त्यांची काळजी घेण्याबाबत वडिलांपेक्षा आई जास्त योग्य आहे". पारंपारिक समजुतीवर आधारित न्यायालयाच्या ह्या निकषाला ह्या बायकांनी जबरदस्त तडा पाडला आहे. ह्यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
![Subscribe to RSS - घटस्फोट](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)