इंद्राणी मुखर्जी

इंद्राणीची करणी

Submitted by मिल्या on 7 September, 2015 - 14:19

मिडीयामध्ये जिकडे तिकडे इंद्राणी धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्स अॅपवर विनोदांचा पूर आलाय. मी म्हटले आपण पण वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेऊ -

इंद्राणीची करणी ! नमू तिच्या चरणी ! मिडीया भजनी ! लागीयली

कन्येला बहीण ! जगा भासवून ! लग्ने लपवून ! कांडे केली

अंड्यांचे पक्षीण ! शेताचे कुंपण ! करीती रक्षण ! हाचि नेम

घडे विलक्षण ! मातेने वैरीण ! होऊन भक्षण ! केली शीना

सखा शामवर ! खन्नाही तयार ! प्री-प्लॅन्ड मर्डर ! केला म्हणे

पैशाची ही खाज ! पाच पतीराज ! नाही लज्जा लाज ! तीच्या ठायी

बोले मिखाईल ! कशी ही बाईल ! कॅरॅक्टर सैल ! आहे तीचे

विषय: 

"पप्पा मला तुमच्याजवळ रहायचंय" अन "मम्मी मला मारू नकोस"

Submitted by अतुल. on 4 September, 2015 - 04:25

पला खोटा चेहरा उघडा पाडेल ह्या भीतीने स्वत:च्याच तेवीस वर्षाच्या मुलीला जीवे मारणारी मुंबईची इंद्राणी मुखर्जी, आणि खाजगी आयुष्यात अडचण वाटते म्हणून आपल्याच तेरा वर्षाच्या मुलाला कित्येक दिवस घरात कोंडून व उपाशी ठेवून शेवटी निर्दयपणे बॅटने मारहाण करून ठार मारणारी पुण्याची राखी बालपांडे. "घटस्फोटानंतर मुलांचा ताबा आईकडे द्यावा, कारण मुलांचे संगोपन करण्यात व त्यांची काळजी घेण्याबाबत वडिलांपेक्षा आई जास्त योग्य आहे". पारंपारिक समजुतीवर आधारित न्यायालयाच्या ह्या निकषाला ह्या बायकांनी जबरदस्त तडा पाडला आहे. ह्यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

विषय: 
Subscribe to RSS - इंद्राणी मुखर्जी