इंद्राणीची करणी

Submitted by मिल्या on 7 September, 2015 - 14:19

मिडीयामध्ये जिकडे तिकडे इंद्राणी धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्स अॅपवर विनोदांचा पूर आलाय. मी म्हटले आपण पण वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेऊ -

इंद्राणीची करणी ! नमू तिच्या चरणी ! मिडीया भजनी ! लागीयली

कन्येला बहीण ! जगा भासवून ! लग्ने लपवून ! कांडे केली

अंड्यांचे पक्षीण ! शेताचे कुंपण ! करीती रक्षण ! हाचि नेम

घडे विलक्षण ! मातेने वैरीण ! होऊन भक्षण ! केली शीना

सखा शामवर ! खन्नाही तयार ! प्री-प्लॅन्ड मर्डर ! केला म्हणे

पैशाची ही खाज ! पाच पतीराज ! नाही लज्जा लाज ! तीच्या ठायी

बोले मिखाईल ! कशी ही बाईल ! कॅरॅक्टर सैल ! आहे तीचे

मिल्या म्हणे आता ! तुम्ही येता जाता ! हाणा बुक्या लाथा ! शिक्षा म्हणुनी

मिलिंद छत्रे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीने खुन केला असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे पण तिची किती लग्न झालीयेत,थ्यावरुन तिइचे चारित्र्य धेंदवडे काधायचे काहीच गरज नाही. मुळात कुठल्याही बाइला चारित्र्य सर्टेफिकेट देणारे तुम्ही कोण?

तीने खुन केला असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे पण तिची किती लग्न झालीयेत,थ्यावरुन तिइचे चारित्र्य धेंदवडे काधायचे काहीच गरज नाही. मुळात कुठल्याही बाइला चारित्र्य सर्टेफिकेट देणारे तुम्ही कोण?
>>
साध्या सरळ आयुष्यात असे केले असते तर कोणी काही म्हटले नसते.
पण जी व्यक्ती खुन करते, तिने ईतर गोष्टीही वाईट हेतुन / आधिच्या नव-याला फसवुन / धोका दुइन केल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तीने खुन केला असेल तर तिला शिक्षा झालीच पाहिजे पण तिची किती लग्न झालीयेत,थ्यावरुन तिइचे चारित्र्य धेंदवडे काधायचे काहीच गरज नाही. मुळात कुठल्याही बाइला चारित्र्य सर्टेफिकेट देणारे तुम्ही कोण?>>>>>>>इथे एका मान्यवर सदस्याला काही गोष्टीन्वरुन त्यान्च्या लिखाणात, वाहत्या बाफवर टोमणे मारण्यात आले, नावे ठेवली गेली तेव्हा नाही हे विचार आठवले? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? मग याना कवितेवरुन नावे ठेवणारे तुम्ही तरी कोण?

इथे एका मान्यवर सदस्याला काही गोष्टीन्वरुन त्यान्च्या लिखाणात, वाहत्या बाफवर टोमणे मारण्यात आले, नावे ठेवली गेली तेव्हा नाही हे विचार आठवले? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? मग याना कवितेवरुन नावे ठेवणारे तुम्ही तरी कोण?> ? महन्जे काय?

जास्त लिहीत नाही, कारण त्याना परत मनस्ताप व्हावा अशी माझी ईच्छा नाहीये. पण शक्य असेल तर तुमच्या जवळच्या कुठल्याही मायबोलीकराला विचारा की ते मान्यवर सदस्य कोण आहेत. त्यावेळेस माझ्यासकट फक्त तीन जणानी त्या सद्स्याला होणार्‍या त्रासाला विरोध केला होता. बाकी सगळे अशा वेळेस तुम लढो, हम कपडे सम्भालते है हा विचार करुन गप्प होते.

इथे एका मान्यवर सदस्याला काही गोष्टीन्वरुन त्यान्च्या लिखाणात, वाहत्या बाफवर टोमणे मारण्यात आले, नावे ठेवली गेली तेव्हा नाही हे विचार आठवले? तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म? मग याना कवितेवरुन नावे ठेवणारे तुम्ही तरी कोण?

रश्मी, तुम्ही हे उपरोधाने लिहिले असण्याची शक्यता आहे, कारण माबोवर अशा कमेंट्स आधी काही धाग्यांवर पाहिएलेया आहेत, म्हणुन त्यांची खिल्ली उडवण्यासाठी तुम्ही हे लिहिल्याची शक्यता आहे.

असल्या कमेंट्स इथे आणि तिथे कुठेही वाचल्या की एक विचार मनात येतो की नविन धागा वाचुन त्यावर प्रतिक्रिया द्यायच्या आधी इथले ५५४५६ धागे वाचणे आवश्यक आहे का? आणि त्या प्रत्येक धाग्यावर एकतर वावा लिहणे किंवा धाग्याला झोडणे आवश्यक आहे का? जर मी तसे केले नाही तर मला धागा नंबर ५५४५७ वर फक्त वावा च करता येईल. धाग्याला झोडायचा मला अजिबात अधिकार राहणार नाही असे आहे का? मायबोली अ‍ॅडमिनने अशा काही गाईडलाईन्स दिल्या आहेत का कुठे?

तुम्हाला हे व्यक्तिशः लिहिलेले नाही पण जेव्हा जेव्हा असल्या कमेंट्स पाहिल्यात तेव्हा हाच प्रश्न पडला आहे.

बाकी आर्कशी मीही सहमत आहे. तिने पाच लग्ने केलीत म्हणजेच तिला लाज नाही हा निष्कर्ष भयावह आहे. हे असले निष्कर्ष दुसरे लग्न केलेल्या बाईबद्दलही लोक काढत असतात. आणि म्हणुन मी त्याला भयावह म्हणतेय.

साधना तुम्ही मला उद्देशुन लिहीलेले नाही हे मला माहीत आहे. पण ज्या वेळेस एखाद्याची न्याय्य बाजू आपल्याला माहीत असते तेव्हा आपल्या मित्र मन्डळीतील कोणी जर त्याला ( तो जो कोणी आहे) सतत टारगेट बनवत असतील तर त्या वेळेस का मौन राखले जाते? मग कोण कुठली ती इन्द्राणी, जिला उद्देशुन मिल्या यानी कविता केली, तर मिल्या याना नावे ठेवण्याचा अधिकार कसा कुणाला प्राप्त होतो?

आणी पटत नसेल तरी एखाद्या कवितेला/ विडम्बनाला वावा म्हणावेच अशी कोणावरही जबरदस्ती नाहीये. आणी मी पण ती अपेक्षा करणारच नाही.

तिने पाच लग्ने केलीत म्हणजेच तिला लाज नाही >> साधना, तिने पाच लग्न केलीत म्हणजे तिला लाज लज्जा नाही असा निष्कर्ष निघत नाही/ नसावा.. तिच्या एकूणच कृत्यांमुळे 'नाही लज्जा लाज ! तीच्या ठायी' असं लिहिलं आहे असं मला वाटतं.

रश्मी, क्कोणी २४ तास माबोवर नसते ना? वाहत्या धाग्यांवर काय चाललेले असते हे सतत तिथे राहिल्याशिवाय कसे कळायचे?

आणि एखाद्या धाग्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे केवळ त्या धाग्याशी संबंधित असावे ना?

मी स्वतः मायबोलीवर दिवसाचा बराच वेळ असते तरीही तुम्ही म्हणता ती घटना मला माहिती नाहीय किन्वा त्या घाग्यावर जाऊनही माझ्या लक्षात आली नसावी. आणि असे असताना जर मी दुस-या कुठल्या धाग्यावर जाऊन कोणावर टिका केली तर मी तसे करु नये काय?

टीका अयोग्य असेल तर तसे लिहा, त्या टीकेवर चर्चा होऊ शकते. पण अमुक एका ठिकाणी तुम्ही काहीच स्टँड घेतला नाही त्यामुळे आता यापुढे तुम्ही कोणावरच काहीच टीका करु शकत नाही हे कसे काय?>

मण्जुडी, तसा अर्थही काढता येतो हे मान्य.

पण मला आलेल्या बहुतेक फॉरवर्ड्सवर तिच्या लग्नांचा उल्लेख आणि लगेच निर्लज्जपणाचाच उल्लेख वाचलाय. Sad तिने जे काय केले ते निषेधार्ह आहे आणि त्याची शिक्षा होणार. पण लग्नांछ्या उल्लेखानंतर लगेच निर्लज्जपणाचा उल्लेख कशाला? जणु काही स्त्रीने एकापेक्षा जास्त लग्ने केलीत म्हणजे ती निर्लज्जच असणार. मला तरी ते खटकले.

arc+1

चोविस तास माबोवर नसतेच कोणी. पण जेव्हा असतात, तेव्हा काय वेगळे करतात? आणी प्रश्न इन्द्राणीने किती लग्न केलीत यापेक्षा तिने पोटच्या मुलीला, ती आपल्या महत्वाकान्क्षे आड येते म्हणून मारल्याचा लोकाना सन्ताप आहे.

पण वाद तुमच्यात आणी माझ्यात नकोत. कारण मला मायबोलीवर जी सन्तुलीत स्त्री व्यक्तीमत्वे आवडतात त्यात तुम्ही पण आहात. सो तुमच्याकरता हा वाद इथेच समाप्त.

बोले मिखाईल ! कशी ही बाईल ! कॅरॅक्टर सैल ! आहे तीचे>> तो तिचा मुलगा आहे असे वाचले. तेव्हा प्लीजच त्याच्या तोंडी असे शबद ...... विचित्र वाट्त आहेत.

मिल्या म्हणे आता ! तुम्ही येता जाता ! हाणा बुक्या लाथा ! शिक्षा म्हणुनी>> आक्षेपार्ह लाइन.
निषेध. केस कोर्टात उभी राहून तिला लीगल प्रोसेस प्रमाणे शिक्षा होइलच. तिने केलेल्या कृत्यांचे समर्थन आजिबात नाही. कळवळा पण नाही. पण तिला लाथा बुक्क्या माराव्या जनरल पब्लिकने जाता येता हे क्ष देशात दगडे मारून पब्लिकली मारायचे शिक्षा असते त्या धर्तीचे वाक्य आहे. फ्युडल
मानसिकता. ह्यात विनोद सापडला नाही.

मी म्हटले आपण पण वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेऊ >> फारच सुसंस्कृत.

मलाही नाही आवडली पण विनोदी लेखनात आहे म्हणून विनोद शोधायचा प्रयत्न केला तोही कुठेही दिसला नाही.
या आयडीचे इतर सगलेच लिखाण मनापासून आवडते म्हणून प्रतिक्रिया देतेय. दुसरा एखादा आयडी असता तर कदाचित वाचून इग्नोर केलं असतं.

वाचकहो,

कविता आवडली.

इथं अनेक लोकं म्हणताहेत की इंद्राणीने पाच लग्ने केली म्हणून ती निर्लज्ज असल्याचा निष्कर्ष कवीने काढलाय. पण कवितेत या अर्थाचा मजकूर कुठेच दिसंत नाही. पैशासाठी पाच पतीराज केले असा आरोप दिसतो आहे. तिच्या डोक्यात सतत पैशाचे विचार असंत, हे तिचा दुसरा पती खन्ना यानेच प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.

कवीने वाहत्या इंद्रायणीत हात धुवून घेतले म्हणून अमा यांचा आक्षेप आहे. तो एका अर्थी बरोबर आहे. मात्र कवीला तसं करण्यापासून परावृत्त करण्याचा नैतिक अधिकार आज कोणाकडे आहे? अशा लोकांना आमंत्रित करून वाहिन्यांवर काही चर्चाबिर्चा झालीये का?

प्रस्तुत कविता इंद्राणीच्या खाजगी आयुष्याशी संबंधित नाही. ती ज्या उच्चभ्रू कॉर्पोरेट समाजाचं प्रतिनिधित्व करते तो समाज किती किडलेला आहे, ते त्यातून सूचित होतंय. आज तिच्यासोबत पुख्खा झोडणारे पेजथ्रीवाले कोणी पुढे येऊन तिचा निषेध करतांना दिसतात का? नाही ना? साधा तोंडदेखला निषेध करायला काय जातं म्हणतो मी? तोही होत नाही म्हणजे सगळ्यांचेच हात अशा कारनाम्यांनी बरबटलेत. हे सूचित होणारं तथ्य अधिक भयावह आहे.

इंद्राणीच्या रंगील्या वैयक्तिक आयुष्याचं जाऊद्याहो. ते फारसं महत्त्वाचं नाही.

आ.न.,
-गा.पै.

तिचा गुन्हा हाच की स्वतःच्या मुलांच्या जीवावर उठली. त्याबद्दलच टीका करा.
बाकी लग्नं किती केली, character यावरून comments करणं नाही आवडलं. That is none of anybody's business.

.

गामा पै शी सहमत, परंतू मिडीया जे असे मुद्दे सतत उचलुन धरते त्यामुळे पार्रिकर यांनी खेद व्य्क्तकेलाय.

कविता आवडली नाही.
रिया +१, या आयडी कडून केवळ दर्जेदार लेखनच अपेक्षित करायची सवय आहे.

हे सर्व प्रकरण अजूनही धूसर आहे. पोलीस तपास सुरु आहे. पोलीस माहिती लीक का करत आहेत हे ही अनाकलनीय आहे. असो, त्यातून यथावकाश सत्य बाहेर येइल व काय ती शिक्षा होइल. इतक्यातच तिला लाथा बुक्क्या वगैरे.. फारच झाले.

गाम, तुमचे समर्थन misogynistic आहे. तुमच्या पोस्टचा मुद्देसूद प्रतिवाद करण्याची ही जागा नव्हे म्हणून मी काही लिहित नाही. इनोसंट अन्टिल प्रूव्हन गिल्टी हे महत्त्वाचे तत्व आहे.

त्यांची टर्म तशीही संपतच होती ना ३० तारखेला? आणि ३० पर्यंत ते आहेत आयुक्त म्हणुन. आणि त्या कालावधीत तपास पुर्ण करु असेही ते बोलल्याचे आलेय बातम्यात.

सहज सलमान आठवला Happy

ईंद्राणी बाईंबद्दल काही चांगले असे माझ्या तरी वाचनात आले नाही. तिचा गुन्हाही फार गंभीर स्वरुपाचा आहे.

सलमानच्या चांगल्या पैलूंबद्दल बरेच काही कानावर पडते. त्याचा गुन्हा सदोष मनुष्यवधाचा असला तरी तो दारूच्या नशेत असलेला एक अपघात होता. ईंद्राणीचा गुन्हा नक्कीच यापेक्षा गंभीरच म्हणायला हवा.

सलमानबद्दल कोणी सहानुभुती दाखवताच तो सेलेब्रेटी आहे म्हणून त्याला सहानुभुती दाखवता असा आरोप सहज केला जातो, त्याला झोडपणे हाच आपला अजेंडा राहतो.

ईंद्राणीबाबत मात्र तिचा गुन्हा मान्य करूनही आपण तिच्यावर होणार्‍या टिकेचा निषेध करतो.

सेलेब्रेटी असणे वा सुपर्र्स्टारपद म्हणजे एक काटेरी मुकुट असतो हेच खरे.

ईंद्राणी प्रकरणातील एकंदरीतच सर्वच विनोदांनी(?) बोर केलेय व्हॉटसपवर, अगदी तिची द्रौपदीशी तुलना करेपर्यंत आचरट प्रकार झालेत, म्हणून त्या सर्वच विनोदांचा मी निषेध करतो !

Pages