एकटा येथ
खंत ना खेद!...१
शेवटी हेच
मृत्युशी भेट!...२
दर्शनी एक
अंतरी भेद!...३
साधिते नेम
वक्रशी रेख!...४
पेटतो देह
आज तू चेत!...५
राहिला तेज
घाव हा थेट!...६
प्रेम ही ठेच,
लष्करी पेच!...७
काय हा लेख?
पाचवी खेप!...८
भेटलो जेथ
पाहशी तेथ!...९
शैशवी प्रेत
काळजा छेद!...१०
बाह्यत: प्रेम
मानसी शेज!...११
धीट हो घेत
अंबरी झेप!...१२
सांगतो मेख
नांगरू शेत!...१३
रामकुमार
म्हणेन हो स्वत:सही लहान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी!...१
जळून जात कामना, पुन्हा न येत अंतरी
उरेल ना मनात या तहान एकदा तरी!...२
झिजेन चंदनापरी नुरेन रंचमात्रही
झिजून दावतो-झिजे सहाण-एकदा तरी!...३
असह्य येथ जाहले लबाड,भ्रष्ट लांडगे
चला तयांस मारुया वहाण एकदा तरी!...४
उरात गच्च संचिते पहा कितीक दाटती
घडो नितांत सौख्य ते प्रहाण एकदा तरी!...५
प्रहाण=नष्ट होणे
चुकेल कर्जभार हा असे प्रयत्न रोजचे
नसेल हे खरेदिखत गहाण एकदा तरी!...६
भाळू नकोस पोरी दिसण्यावरी कुणाच्या
ते प्रश्नचिन्ह असते असण्यावरी कुणाच्या! .....१
माझ्याच वेदनेचा उपहास होत आहे
मी स्मीत फक्त करतो हसण्यावरी कुणाच्या! .....२
ही माळ उत्तरांची माझी तयार आहे
भित्रीच बंधने पण पुसण्यावरी कुणाच्या! .....३
या भारती धरेचा संकोच होत आहे
का बोलते कुणी ना घुसण्यावरी कुणाच्या? .....४
नाही कधीच इथला श्रमयज्ञ थांबलेला
उपकार हेच; ऐते बसण्यावरी कुणाच्या! .....५
सर्वत्र सांडलेला घळ-ओघ वासनांचा
कोणी उगा न खुलते रुसण्यावरी कुणाच्या! .....६
मधल्या तमोयुगाचे झाले शिथील अवघे
गावातले नियमही वसण्यावरी कुणाच्या! .....७
शब्देंच संत-विभुती जनमानसात उरती
दु:खास कीव माझ्या इतक्यात हाय! आली
दिसलो सुखास मीही - ही बात काय झाली ...1
भयग्रस्त मी भुकेला डोळे तहानलेले
व्याकूळलो दुधास्तव दारात माय आली ...2
प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...3
काव्यात मांडिले मी मंथूनिया स्वतःला
अमृत प्राशिलेल्या कंठात साय आली ...4
"ईच्छा हवीच थोडी"- भ्रांतीत जीव गेला
मक्ता अनाम गाता सुरुवात काय झाली ...5
रामकुमार
ओसाड वाळवंटी हिरवी फुटेल जेंव्हा
माझ्यातल्या तुलाही येईल पूर तेंव्हा !...१
संतापल्या उन्हाला वाटे विषाद, हेवा
अमुच्यात दंग आम्ही छाया असे नसे वा !...२
दिस आज आठवांचे येतील का फिरोनी ?
खोपे, लपाछपी अन गोड शिवारी मेवा !..३
गर्दीत भोगियांच्या नादावला कुबेर
त्याला पुरे न अवघा नगरीमधील ठेवा !...४
ही कोणत्या मनाची स्वप्नील आस आहे ?
अंधार पेरिताही उगवेल सूर्य केंव्हा ?...५
दिधलीस तूच तृष्णा, सलही उरात देवा
का फक्त अंकुशांनी केली तुझीच सेवा ?...६
--रामकुमार.
कालच पहिल्यांदा मायबोली संकेतस्थळाला भेट दिली तेंव्हा-
'दु:ख आता फार झाले-तरही' बद्द्ल वाचण्यात आले.
आज सकाळी तरही गझल लिहिली,
आणि आत्ता पोस्ट करीत आहे,
उशीर तर झालाच आहे.
क्षमस्व!
------------------------------------------------------------------------------------
श्वासही दुश्वार झाले
दु:ख आता फार झाले!----१
वादळे बंदिस्त चित्ती
सांगणे अनिवार झाले!----२
वाहिल्या इच्छा विषारी
डोह उरिचे गार झाले!----३
दग्ध चिंतांनी गुलाबी
रक्त काळेशार झाले!----४
सूर्य ग्रहणाने बुडाला
प्राक्तनाचे वार झाले!----५
उमजलो अस्तित्वदंशा
हृदय हे हळुवार झाले!----६
आवरी तृष्णा जराशा