दु:ख आता फार झाले

दु:ख आता फार झाले-तरही

Submitted by रामकुमार on 4 February, 2011 - 15:13

कालच पहिल्यांदा मायबोली संकेतस्थळाला भेट दिली तेंव्हा-
'दु:ख आता फार झाले-तरही' बद्द्ल वाचण्यात आले.
आज सकाळी तरही गझल लिहिली,
आणि आत्ता पोस्ट करीत आहे,
उशीर तर झालाच आहे.
क्षमस्व!
------------------------------------------------------------------------------------

श्वासही दुश्वार झाले
दु:ख आता फार झाले!----१

वादळे बंदिस्त चित्ती
सांगणे अनिवार झाले!----२

वाहिल्या इच्छा विषारी
डोह उरिचे गार झाले!----३

दग्ध चिंतांनी गुलाबी
रक्त काळेशार झाले!----४

सूर्य ग्रहणाने बुडाला
प्राक्तनाचे वार झाले!----५

उमजलो अस्तित्वदंशा
हृदय हे हळुवार झाले!----६

आवरी तृष्णा जराशा

गुलमोहर: 

दु:ख आता फार झाले..

Submitted by मी मुक्ता.. on 30 January, 2011 - 07:00

सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दु:ख आता फार झाले