Submitted by रामकुमार on 27 February, 2011 - 14:11
एकटा येथ
खंत ना खेद!...१
शेवटी हेच
मृत्युशी भेट!...२
दर्शनी एक
अंतरी भेद!...३
साधिते नेम
वक्रशी रेख!...४
पेटतो देह
आज तू चेत!...५
राहिला तेज
घाव हा थेट!...६
प्रेम ही ठेच,
लष्करी पेच!...७
काय हा लेख?
पाचवी खेप!...८
भेटलो जेथ
पाहशी तेथ!...९
शैशवी प्रेत
काळजा छेद!...१०
बाह्यत: प्रेम
मानसी शेज!...११
धीट हो घेत
अंबरी झेप!...१२
सांगतो मेख
नांगरू शेत!...१३
रामकुमार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
रामकुमार, ही गझल नसल्याने
रामकुमार,
ही गझल नसल्याने 'कविता' विभागात हलवावी.
धन्यवाद!!!
कणखर, सुचनेबद्दल धन्यवाद! ही
कणखर,
सुचनेबद्दल धन्यवाद!
ही गझल? पोस्ट करण्यामागे माझा उद्देश माझ्या प्रश्नांची उकल व्हावी हा होता.
ही रचना करतानाही माझ्या मनात हे प्रश्न होते.
ते असे-
१)स्वर काफिया म्हणजे काय?
२)गैर मुरद्दफ गझलेत स्वर काफिया असू शकतो का?
इतर जाणकारांनीही याबाबत प्रकाश टाकावा.
इतर निकष पूर्ण होतात ते असे-
१)द्विपदी
२)प्रत्येक शेर सुटा
३)दोन ओळींत संबंध असणे,दुसरी ओळ पहिलीचा समारोप
४)वृत्तात असणे-इथे गालगा गाल
शंका अशा-
या रचनेत स्वर काफिया- अ असू शकतो का?
ए हा स्वर त्याअगोदरच्या अक्षरात प्रत्येक ठिकाणी येतो त्याबद्दल मत(अलामत संदर्भी)
अन्य निकष पूर्ण होत नसल्यास ते कोणते?
रामकुमार
रामकुमार, माबो वर गझली ची
रामकुमार, माबो वर गझली ची माहीती देणारे अनेक दुवे आहेत...
अनय, <<<रामकुमार, माबो वर
अनय,
<<<रामकुमार, माबो वर गझली ची माहीती देणारे अनेक दुवे आहेत...<<<
त्यातला एखादा दिला असतात तरी चालले असते.
रामकुमार,
गझलेत स्वरकाफिया असू शकतो. तसेच गैरमुरद्दफ गझलेतही स्वरकाफिया असू शकतो.
मात्र 'अ' या स्वरकाफिया विषयी कुणीच अनुकूल नाही. कारण, मराठीत तो प्रथम स्वर असल्या कारणाने....
बाकी, आ,ई,ए, वगैरे स्वरकाफिया असण्यास हरकत नाही.
आपली उपरोक्त गझल 'अ' हा स्वरकाफिया असलेली मात्र रदीफ नसलेली आहे. त्यामुळे शेवटी कोणतेच अक्षर जमत नाही. म्हणून ही सदोष गझल मानता येईल. त्यामुळे एकतर यात बदल करावा किंवा ती अन्यत्र हलवावी.
**** केवळ प्रश्न विचारण्यासाठी सदोष गझल करू नयेत. प्रश्न विचारण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत.
धन्यवाद!!
आशय आवडलाच! ही
आशय आवडलाच!
ही 'तांत्रिकदृष्ट्या' व 'शारिरीक' दृष्ट्याही (डोळा मारला हे गृहीत धरावे) गझल नाही.
काही इतर बाबींबाबत!
त्यातला एखादा दिला असतात तरी चालले असते.>>> 'गझल परिचय' असा शोध घ्यावात मायबोलीवर! त्यात तांत्रिक सर्व शंकांचे निरसन आहे.
तसेच गैरमुरद्दफ गझलेतही स्वरकाफिया असू शकतो.>>> अजिबात नसावा. 'बेफिकीरी'मध्ये तशी एक गझल आहे जी 'हे मत' माहीत नसताना रचलेली होती.
मात्र 'अ' या स्वरकाफिया विषयी कुणीच अनुकूल नाही. >>> 'कुणीच अनुकूल' असण्या नसण्याचा प्रश्नच नाही. चंद्र, टोळ, माफ, वॉर, तीर, पॅक, असे सर्वच शब्द मग त्या काफियांमध्ये 'उचित' ठरतील व मग गझल नुसती डायल्यूटच होणार नाही तर मुळात 'गझलेचे सौंदर्य' ही बाबच राहणार नाही व या गोष्टीचा लोकांनी विचार करायलाच हवा म्हणून मी कायम कार्यरत राहणार आहे.
प्रश्न विचारण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत.>>>
ही गझल होऊ शकत नाही हे आता
ही गझल होऊ शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
वरील सर्व प्रतिसाद पाहता रचना इथेच ठेवत आहे.
गझल अशी असू शकत नाही हे इथेच नोंदलेले राहू देत!
इथून पुढे या रचनेतील फक्त आशय घ्यावा
(तो आवडला असे कळवल्याबद्दल आभार बेफिकीर)
(तन्त्र आणि शारिरिकदृष्टीबद्दल नन्तर कधीतरी दे.घे.)
गझलेत स्वरकाफिया असू शकतो. तसेच गैरमुरद्दफ गझलेतही स्वरकाफिया असू शकतो.
तसेच गैरमुरद्दफ गझलेतही स्वरकाफिया असू शकतो.>>> अजिबात नसावा.
ही दोन मते पुढे कधीतरी पुन्हा समोरासमोर येतील तेंव्हा अजून काही गोष्टी स्पष्ट होतीलच
उदा.रदीफ असलेल्या गझलेत स्वरकाफिया 'अ' असू शकतो का?
नाहीतरी<<<प्रश्न विचारण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेतच.>>>
रामकुमार
बेफिकीर, ::::तसेच गैरमुरद्दफ
बेफिकीर,
::::तसेच गैरमुरद्दफ गझलेतही स्वरकाफिया असू शकतो.>>> अजिबात नसावा.::::
का? तुम्ही म्हणता म्हणून..?
::::मात्र 'अ' या स्वरकाफिया विषयी कुणीच अनुकूल नाही. >>> 'कुणीच अनुकूल' असण्या नसण्याचा प्रश्नच नाही. :::::
हेच मलाही म्हणायचे आहे. अर्थाचा विपर्यास करून उगाच उकरू नका.
:::: आपली उपरोक्त गझल 'अ' हा स्वरकाफिया असलेली मात्र रदीफ नसलेली आहे. त्यामुळे शेवटी कोणतेच अक्षर जमत नाही. म्हणून ही सदोष गझल मानता येईल. त्यामुळे एकतर यात बदल करावा किंवा ती अन्यत्र हलवावी. ::::
*** हे माझे म्हणणे सोयीस्करपणे वाचलं नाहीत वाटतं
:::: या गोष्टीचा लोकांनी विचार करायलाच हवा म्हणून मी कायम कार्यरत राहणार आहे. ::::
रहा बरं! रहा...
रामकुमार, ::::उदा.रदीफ
रामकुमार,
::::उदा.रदीफ असलेल्या गझलेत स्वरकाफिया 'अ' असू शकतो का?::::
हे मात्र शक्य नाही.
ही गझल नसली तरी ए़कूण रचनेत
ही गझल नसली तरी ए़कूण रचनेत गझलीयत जरूर आहे .वरील जाणकारांची चर्चासुद्धा उपयुक्त आहे .
पुलेशु .