Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
आबांची बुलेट धाडधाड आवाज करत अनाथाश्रमासमोर येऊन थांबली. हा आवाज सर्वाँच्याच, विशेषत: मॅनेजर बाईंच्या परिचयाचा होता. त्यांचं स्वागत करायला ती धावत बाहेर आली. एककाष्ठी धोतर नेसलेले अन खानदानी फेटा घातलेले आबा आकडेबाज मिशीआडून हसले. गाडीच्या एका अंगाला दूध वाटायला वापरतात तशी मोठी प्लास्टिकची कॅन लटकवलेली होती. आबांनी कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घालून शंभरीच्या पाच गड्ड्या बाहेर काढल्या. सवयीप्रमाणे बाईंनी पुढे होऊन पैशांचा स्विकार केला. आभार मानणं आबाला आवडत नाही अन आग्रह केला तरी ते थांबणार नाही हे माहीत असल्याने बाई आत निघून गेल्या. आबांची गाडी पुन्हा रस्त्याने धावू लागली.
कसं ना आपण मोठ्ठे होता होता बालपण हरवतं ... आणि पुन्हा मग थोड्याच काळात आपल्याच मुलांच्या रुपात पुन्हा गवसतं.. आता लेकाला बघून पुन्हा वाटतं आपणही लहानपणी समुद्र ..पाणी.. ते शंख शिंपले...किनार्यावरची वाळू बघून असंच हरकून जायचो... तासनतास खेळायचो... न कंटाळता न दमता... मुरुडेश्वरच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्यावर श्रेयानही तसाच मस्त एंजॉय करत होता.