आबा (अदभुतिका)
आबांची बुलेट धाडधाड आवाज करत अनाथाश्रमासमोर येऊन थांबली. हा आवाज सर्वाँच्याच, विशेषत: मॅनेजर बाईंच्या परिचयाचा होता. त्यांचं स्वागत करायला ती धावत बाहेर आली. एककाष्ठी धोतर नेसलेले अन खानदानी फेटा घातलेले आबा आकडेबाज मिशीआडून हसले. गाडीच्या एका अंगाला दूध वाटायला वापरतात तशी मोठी प्लास्टिकची कॅन लटकवलेली होती. आबांनी कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घालून शंभरीच्या पाच गड्ड्या बाहेर काढल्या. सवयीप्रमाणे बाईंनी पुढे होऊन पैशांचा स्विकार केला. आभार मानणं आबाला आवडत नाही अन आग्रह केला तरी ते थांबणार नाही हे माहीत असल्याने बाई आत निघून गेल्या. आबांची गाडी पुन्हा रस्त्याने धावू लागली.