ज्योती

उतारा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 21 October, 2016 - 02:40

"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले"

प्रकाश परत तेच म्हणत होता.

"अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले.

"सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला.

सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता.

ज्योती

Submitted by अनघा कुलकर्णी on 6 August, 2013 - 13:05

कविता ---ज्योती

अंतरीचा दिवा मालवू देऊ नको ,
प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I
तिच देईल तुला आधार,
कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I
अंधारातून मार्ग दाखवते ,
प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट ,
खाच खळगे किती असती त्यावरी I
प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास,
असाध्य ते साध्य कराया सायास ,
तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I
कवी म्हणतो ,
चालून आली नामी संधी ,
नाही दवडणार मी कधी ,
प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी ,
योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास,
तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

शब्दखुणा: 

ज्योती

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 7 December, 2010 - 04:22

आमचा मित्र पिट्ट्या याला ज्योती नावाची मुलगी पसंत पडली.
लग्नात मजा यावी म्हणुन त्यानी मला कविता करुन मागीतली
ती पूढील प्रमाणे

स्वप्नातील कामिनी रुप तीचे गोजिरवानी
तीच्या करिता झाली जरी माझी हानी
करिल तीला मी माझी रानी
तीच्या त्या स्पर्शाने जरी मी सुखावलो
पण ती त्या दुराव्याने मी फार फार दुखावतो
तीज वाचून मला नको हीरे अगर मोती
मला हवी केव्ळ तीच ती ज्योती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ज्योती