मायबोली दिवाळी अंक २०१२ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
या वर्षीच्या, म्हणजे २०१०च्या, दिवाळी अंकांविषयी...
नमस्कार मायबोलीकर,
ही आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आजकाल दिवाळी अंकाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभुमीवर अनेकोनेक देखणे आणि नितांत सुंदर आंतरजालीय दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत.
नमस्कार,
कुठलंही पुस्तक, दिवाळी अंक हाती घेतला की आधी सामोरं येतं ते त्याचं मुखपृष्ठ! ते जितकं लक्षणीय, जितकं चपखल तितकं चटकन वाचकांचं लक्ष त्याकडे आकृष्ट होणार. मुखपृष्ठ म्हणजेच अंकाचं ’फर्स्ट इम्प्रेशन’. ऑनलाईन अंक असला तरी मायबोली दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे याला अपवाद कसं असेल?
दिवाळी वा अंकाच्या संकल्पनेला अनुलक्षून आतापर्यंत, पणत्या-गेंदेदार झेंडूची फुलं ते निसर्गातल्या हिरवाईचा ताजेपणा मिरवणारं जलरंगातलं चित्र, सुलेखन अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी मुखपृष्ठावर हजेरी लावून अंकाची शोभा वाढवली आहे.