Submitted by चिनूक्स on 27 October, 2010 - 07:59
या वर्षीच्या, म्हणजे २०१०च्या, दिवाळी अंकांविषयी...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या वर्षीच्या, म्हणजे २०१०च्या, दिवाळी अंकांविषयी...
'जत्रा'चा दिवाळी अंक ठीक आहे.
'जत्रा'चा दिवाळी अंक ठीक आहे. व्यंगचित्रांचा नेहमीचा मसाला आहेच. मंगला गोडबोल्यांची 'तो आणि त्याचा बाप' ही कथा चांगली आहे.
'प्रपंच'चा दिवाळी अंक चांगला आहे. प्रा. कुंदा महादेवकर यांचा 'एक माती, दोन नाती' हा लेख मस्त आहे. निळू दामले यांचा 'दिवास्वप्नातला भारत' आणि शर्मिला फडके यांचा 'रस्किन बॉण्ड - माउंटन्स इन माय ब्लड' हे दोन लेखही आवडले. अंकात दहा कथा आहे. त्या ठीक आहेत.
अरे वा. अंक हातात येवून वाचन
अरे वा. अंक हातात येवून वाचन पण सुरु झालं.
माझे दिवाळी अंक दिवाळीनंतर गावाकडून आल्यावर हातात पडणार. तोपर्यंत काय काय वाचण्यासारखं आहे यावर्षी हे तरी कळेल.
माझा तरी नेहमीचा आवडीचा सेट
माझा तरी नेहमीचा आवडीचा सेट म्हणजे माहेर, मेनका वगैरे. पूर्वीपेक्षा क्वालिटी घसरलीये नक्कीच. पण तरी तुका म्हणे त्यातल्यात्यात.
यंदाच्या ‘सामना’ दिवाळी
यंदाच्या ‘सामना’ दिवाळी अंकाचे देखणे मुखपृष्ठ संजय सुरे यांचे आहे. ‘मेकिंग ऑफ लालबागचा राजा’ हा छायाचित्रांसह नटलेला संजय परब यांचा खास लेख हे या अंकाचे मुख्य आकर्षण असून ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचा ‘फिक्सिंग : क्षणात पैशाचे घबाड’ हा क्रिकेट क्षेत्रातील ‘फिक्सिंग’ या विषयाचा सर्वांगीण वेध घेणारा विशेष लेख हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ‘हो, आम्हीही तरुण होतो!’ या विषयावरील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, कविवर्य मंगेश पाडगावकर, समाजसेवक अण्णा हजारे, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, अभिनेते रमेश देव यांच्या तरुणपणातील आठवणींचे खास दालन या अंकात असून ‘हो आम्ही तरुण आहोत’ या विषयावरचे आजच्या तरुणाईचे विविध क्षेत्रांतील ‘आयडॉल्स’ मिलिंद गुणाजी, कृष्णा पाटील, तेजस्विनी सावंत, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, प्रा. संजीव गलांडे, भार्गवी चिरमुले यांच्याही मुलाखतींचा समावेश अंकात आहे. सजावट किशोर गावडे व रवी वरवडेकर यांची असून रेखाचित्रे प्रतिमकुमार कसबेकर, किरण जोशी व व्यंगचित्रे संजय मिस्त्री यांची आहेत. मुद्रण व्यवस्थापन संजय वाडेकर, गोविंद सावंत यांचे आहे. अंकाची पृष्ठसंख्या 172 व मूल्य 60 रुपये आहे.
.
‘मार्मिक-दिवाळी 2010’ या अंकाचे विनोदी मुखपृष्ठ ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचे असून प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, सोमाजी गोमाजी कापशे, नरेंद्र बल्लाळ, राजा राजवाडे, द. पां. खांबेटे यांच्या साहित्याचा ‘पुरातन खजिना’ हे या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. संपादन सहाय्य श्याम मोकाशी व मोहन गांगण यांचे असून सजावट सुजित कदम यांची आहे. अंकाची पृष्ठसंख्या 122 असून मूल्य 50 रुपये आहे.
अरे वा अंक यायला सुरुवात झाली
अरे वा अंक यायला सुरुवात झाली का ?
'रस्किन बॉण्ड - माउंटन्स इन माय ब्लड' >>> हा आपल्या अंकात होता की गेल्या वर्षी.
मी उद्यापासुन रतीब सुरू करणार
मी उद्यापासुन रतीब सुरू करणार आहे अंकांचा..

गेली दोन वर्षे तरी अंकांतील साहित्याचा दर्जा काही खास वाटला नाही. यावर्षी काही वेगळे असेल अशी आशा आहे.
या वर्षीचा 'माहेर'चा अंक
या वर्षीचा 'माहेर'चा अंक चांगला वाटला. अजून वाचतोय.
हा धागा फक्त सभासदांसाठी का
हा धागा फक्त सभासदांसाठी का केलाय?? इतरांचेही अभिप्राय येऊदेत की इथे.
'रस्किन बॉण्ड - माउंटन्स इन
'रस्किन बॉण्ड - माउंटन्स इन माय ब्लड'>> सिंडीला अनुमोदन. हा लेख मायबोलीवर होता ना मागील वर्षी?
पाटकरांचा आवाज आला का मार्केट
पाटकरांचा आवाज आला का मार्केट मध्ये?????
'आवाज' आला आहे. पण यंदाचा अंक
'आवाज' आला आहे. पण यंदाचा अंक अजिबात आवडला नाही. काही व्यंगचित्रं चांगली आहेत. पण इतर मजकूर कंटाळवाणा वाटला.
'लोकप्रभा'चा अंकही बरा आहे. अंकात जाहिरातीच जास्त आहेत. कणेकरांचा 'लता श्रेष्ठ की आशा' हा लेख त्या दोघींच्या चाहत्यांना आवडेल. सिंधूताई सपकाळांवर लेख आहे. हा अंक ऑनलाइन वाचता येतो.
http://www.loksatta.com/lokprabha/
लोकप्रभाच्या लिंकसाठी धन्यवाद
लोकप्रभाच्या लिंकसाठी धन्यवाद चिनूक्स.
लोकप्रभाच्या लिंकसाठी धन्यवाद
लोकप्रभाच्या लिंकसाठी धन्यवाद चिनूक्स.
माझेही स्विकार रे बाबा. आधी तो लताआशावालाच लेख वाचते. मी दोघींच्याही गटातली आहे.
लोकप्रभाचा दिवाळी अंक
लोकप्रभाचा दिवाळी अंक वाचला.
लता-आशा वरचा शिरीष कणेकरांचा लेख वाचला.ठीक आहे. हजार लेकरांची माय हा सिंधुताई सपकाळांवरचा लेख आवडला.
तसेच 'मॄत्युच्या छायेतील महापुरुष आणि खलपुरुष' हा विश्वास पाटील यांनी लिहिलेला लेखही माहितीपुर्ण आहे.भुषण कोरगावकर यांनी लिहिलेला 'सोडा सोडा राया तनु शिणली' हा लेखही छान.
धनंजय कुलकर्णी यांनी लिहिलेला 'निकाह' आणि 'रत्नचरित्र-दैवी रत्नांची शापित वाटचाल' हे ही लेख वाचनीय.
मिळून सार्याजणीचा अंक उत्तम
मिळून सार्याजणीचा अंक उत्तम आहे. ‘यातला तरूणाईची धडकन’
विभागातील काही लेख छानच आहेत.
समीक्षा फराकटे या विशीतल्या तरूणीचा लेख अप्रतिम! तिची शैली
फारच वेगळी आहे. जरूर वाचा.
ओजसचा इरोल शर्मिला यांच्या संघर्षावर आधारीत नाट्यानुभवाचा
लेखही वाचनीय.(तरूण मनं तरूण मतं हा तिचा विश्लेषणात्मक
लेखही चांगला)
वेगळ्या वाटा शोधणार्या तरूणांचे लेख हे या भागाचं विशेष.
‘जाहल्या काही चुका’ ह्या भागात चळवळीतल्या लोकांनी केलेल्या
चूका त्यांच्याच शब्दात दिल्यात.
यात मुक्ता मनोहर,आनंद कपूर, आणि अवचटांचे अनुभव वाचनीय.
कथा विभागात ‘प्रिय असीम’ ही अर्चना अकलूजकरांची कथा उत्तम
आहे.
एकूणच पूर्ण अंक वाचनीय आहे.
माहितीबद्दल धन्यवाद. काही
माहितीबद्दल धन्यवाद.
काही दिवसांपुर्वी मायबोली खरेदी विभागातुन काही दिवाळी़ अंक मागवले. वरील माहिती अगोदर मिळाली असती तर अजुन मागवता आली असती.
महागुरू, अहो अंक प्रकाशीत
महागुरू,
अहो अंक प्रकाशीत झाल्याशिवाय ही माहिती कशी मिळाली असती?
इकडे सुद्धा हल्ली अंक लवकर प्रकाशीत होत नाहीत/ उपलब्ध होत नाहीत.
बर्याच वेळा वृत्तपत्रातुन
बर्याच वेळा वृत्तपत्रातुन तसेच नियतकालिकांमधुन कोणाकोणाचे लेख/कविता प्रकाशित होणार याच्या जाहिराती येतात , तशी जरी काही माहिती मिळाली तरी काय मागवायचे आणि काय नाही यासाठी मदत होते.
लोकसत्ता दिवाळी अंकात
लोकसत्ता दिवाळी अंकात महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आतापर्यंतचे मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रातील महाराष्ट्रीय मंत्री यांच्या कारकीर्दीचा आढावा वेगवेगळ्या पत्रकारांनी घेतला आहे, गेल्या वर्षीचा लोकसत्ताचा अंकही असाच महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या प्रवासावर छाप सोडणार्या नेत्यांच्या कामगिरीचा आढावा आहे. छायाचित्रकार डी व्ही कामत यांनी टिपलेल्या चित्रतार्यांच्या छबी व त्यामागची कहाणी वाचनीय (मधुबालाच्या पंख्यांसाठी मस्ट रीड) सुधीर गाडगीळ यांच्या डायरीतली चाळता चाळता पडलेली पानेही आहेत्..काही प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच्या प्रसंगांचे वर्णन. लोकसत्ता दिवाळी अंकात कविता नाहीत. :(. हे बहुधा प्रथमच घडले.
लोकप्रभाचा दिवाळी अंक म्हणजे नुसता स्टार्टर (फराळातले शंकरपाळे) यातला शिरीष कणेकरांच्या लेखात नवे काहीच नाही, यात लिहिलेले त्यांच्या आधीच्या लेखनात कुठेना कुठे आलेले आहे. यातच 'मृत्यूच्या छायेतील महापुरुष आणि खलपुरुष' ही विश्वास पाटील यांनी दॉ शरद कोलारकर यांच्या 'काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस' या ग्रंथासाठी लिहिलेली प्रस्तावना आहे. लावणी कलांत शकुंतला नगरकर , नाझिया हसन यांच्यावरही लेख आहेत. अच्युत गोडबोले यांचा ईईजी, एमआराआय आणि पेट हा एक वेगळा लेख आहे.
ज्यांची वाट बघतो ते किस्त्रीम, अक्षर, दीपावली, मौज हे अंक बहुधा दिवाळीलाच हाती येणार.
रच्याकने मी जिथून अंक घेतले तो विक्रेता पुन्हा पुन्हा सामना आणि मार्मिक माझ्या पुढे करत होता.
मायबोलीकरानो, दिवाळी
मायबोलीकरानो,
दिवाळी अन्काच्या जर काही आन्तरजालीय दूवे ( online links ) असतील तर क्रुपया ईथे पोस्ट कराल का ? उदा.
लोकप्रभा.
मोगरा फुलला दिवाळी अकं- २०१०
मोगरा फुलला दिवाळी अकं- २०१० ऑनलाईन लिंक
अतिथी संपादक मिलिंद गुणाजी
अतिथी संपादक मिलिंद गुणाजी असलेला मैत्रेय गृपचा "मस्त भटकंती दिवाळी अंक २०१०" नेहमीप्रमाणेच सुंदर. कव्हरपेज आकर्षक
झाला आहे.
जयश्री देसाई यांचा "स्वप्नातला गाव", निनाद बेडेकर यांचा "पानिपताचा वेध" मिलिंद गुणाजींनी उलगडलेला "अज्ञातवासातील खजिना", पराग लिमये यांचा धारातीर्थे ऐवजी "गिझाचे प्रसिद्ध पिरॅमिडस", सैला राव यांचे "गोमन्तकच......पण जरा वेगळा" , स्नेहा केतकर यांचा "पर्यटानाचा नवा विचार - व्हिलेज वेज्", इ. भटकंतीवरचे लेख वाचन्यासारखे आहेत.
योगिता राऊत यांनी "सेलिब्रिटीज फोटोग्राफी" मध्ये गुरू ठाकूर, सोनाली कुलकर्णी, रवींद्र मंकणी, सुनीला करंबेळकर यांच्या अभिनयाव्यतिरीक्त असलेला फोटोग्राफिचा पैलु उलघडुन दाखवला आहे.
आकर्षक फोटो आणि सुंदर लेख यामुळे संपूर्ण अंकच वाचनीय/देखणीय
पण, थोडे खटकले कि महाराष्ट्रातील भटकंतीस्थळाची माहिती खुपच कमी आहे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि पर्यटन वर्षानिमित्त यंदाच्या दिवाळी अंकात महाराष्ट्राच्या विविध भागांच्या माहितीबद्दल जरा जास्त अपेक्षा होत्या.
अंतर्नाद दिवाळी अंक मला खूप
अंतर्नाद दिवाळी अंक मला खूप आवडला. गुजराथी, तेलगू, हिंदी, कानडी आणि कोकणी या मायबोलीच्या सख्या शेजारणी. त्यांची मराठीशी साहित्यिक देवाण घेवाण, सांस्क्रुतीक संबंध, त्यांच्या द्रूष्टीने मराठी माणसे, ज्ञानपीठ विजेत्यांबद्दल माहिती, राजकवी भा रा तांबे यांच्या वरचा लेख, त्या त्या भाषांमधील उत्कृष्ट कथा व कवितांचे भाषांतर असा खूप वाचनीय , रंजक व त्याबरोबरच बर्याच वेळेस अंत:र्मूख करणारा अंक.
रेषेवरची अक्षरे २०१० - दिवाळी
रेषेवरची अक्षरे २०१० - दिवाळी अंक
http://www.maayboli.com/node/21018
साप्ताहिक सकाळ कोणी आणलेला
साप्ताहिक सकाळ कोणी आणलेला आहे का? माझ्याकडे आज आलेला आहे. अनुक्रमणिकेमध्ये लेखांची सूची पाहिली असता २४० पानांचा तरी अंक आहे असं दिसतंय, पण आलेल्या अंकात २२६ पानंच आहेत. अजून कोणाकडे असा अंक आलाय का?
http://diwali.upakram.org/ उप
http://diwali.upakram.org/
उपक्रमचा दिवाळी अंक. आश्चिगचाही मस्त लेख आहे त्यात.
मी अंक नुसता चाळलाय, पण छान वाटतो आहे.
मेघना. धन्यवाद. नक्की वाचणार 'रेषेवरची अक्षरे'.
टण्याने इकडेतिकडे लिंक दिली होती, पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकातील त्याच्या लेखाची. टण्याचा लेख फार सुंदर आहे. उरलेला अंकही चाळते आहेच.
शैलजाचाही लेख आहे लवासावरचा.
http://www.pustakvishwa.com/diwalimagz/PustakVishwaDiwali2010.pdf
ऋतुरंगचा दिवाळी अंक मी
ऋतुरंगचा दिवाळी अंक मी पोचायच्या आत संपला. कुणी वाचला असेल तर सांगा मी काय मिसलय ते.
दीपावलीच्या अंकातील सुहास
दीपावलीच्या अंकातील सुहास बहुळकरांचा दृश्यमाध्यमातून शिवचरित्रे वरचा लेख आणि बोकीलांचा श्री पु भागवतांवरचा लेख दोन्ही उत्तम आहेत. बहुळकरांने सपासप वार केले आहेत. देव त्यांचे भले करो. अजून छापील दिवाळी अंकात कोणीतरी वैचारिक भूमिका घेऊ शकते हे वाचून अतिशय समाधान वाटले.
श्रीपुंचे कथालेखकांसाठी 'वर्णन आणि दर्शन' यावरील मत आणि बोकीलांची मांडणी अतिशय आवडली.
तसेच श्रीपुंचे साहित्याची भूमी नावाचे पुस्तक आहे आणि ते चक्क ग्रंथालीचे आहे- हेही नवीन समजले.
अनिल अवचटांचा अनुल्लेख. गौरी देशपांडेंवरचा लेख बंडल आणि सुनीताबाईंवरचा ठिक आहेत.
निलिमा बोरवणकरांची कथा मस्त आणि विशेष म्हणजे रोमन लिपीत इंग्रजी लिहीले आहे.
मुद्रितशोधनाच्या अफाट चुका आहेत सगळीकडे
हृदय प्रसंग, resourse वगैरे.
वैधानिक इशारा- हे दोन्ही लेख वैचारिक लेख या प्रकारात मोडतात.
दिवाळी अंकात सर्वात जास्त
दिवाळी अंकात सर्वात जास्त डोक्यात गेले असेल तर काय तर बहुतांश मुखपृष्ठांवर असलेला ऐश्वर्या रायचा फोटो. अरे दुसरे काही नव्हते चांगले तर पान कोरे ठेवायचे ना.
अनुभव, अनुवाद, मौज ह्या
अनुभव, अनुवाद, मौज ह्या तिन्ही दिवाळी अंकांची मुखपृष्ठे सुरेख आहेत.. मी 'साधना' वाचतोय सध्या
Pages