उपक्रम शशक

मभागौदि २०२५ शशक- कस्मे वादे प्यार वफा - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 26 February, 2025 - 04:39

टिजिआयेफच्या फणकाऱ्यातच ती बारमध्ये येऊन बसली. तिच्यासारख्या रूपगर्वितेशी कोणीतरी बोलायला येणारच की! स्वतःशीच खूश होत तिने बारकडे मान वळवली. तिला पित बसलेला तो दिसला. ती थबकली. त्याला हाक मारावी का? पण इगो! "झक मारत येईल की!" पण ही कोण नालायक? त्या दोघांना इतक्या जवळ आलेलं पाहून तिला सुचेनासंच झालं. मन ताळ्यावर येतंय तोवर ती हरामखोर त्याला घेऊन चक्क बाथरूममध्ये..! भरभर ही त्यांच्यामागे गेली आणि स्टॉलमधला वखवखलेला प्रणय फटीतून बघायला लागली. अचानक त्याचे काळेभोर डोळे तिच्यावर स्थिरावले. ते डोळे आता तिचे कधीच नाहीत? कधीच??

शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ शशक - घृणा आणि मत्सर - अमितव

Submitted by अमितव on 25 February, 2025 - 11:31

सलूनमध्ये घाम पुसत हा पेपरात डोकं खुपसून बसलेला. इतक्यात एक प्रौढशी व्यक्ती काही न बोलता खुर्चीत येऊन बसली. हात विजारीच्या खिशात. "केस कापायचे? फार गरम आहे नाही?" संवाद वाढवायला काही बोलुनही समोरुन पूर्ण शांतता. हा यंत्रवत तेल पाणी नसलेलं जंगल कापू लागला. असह्य उग्र दर्प! जरावेळ गेला आणि खिशातून बाहेर आलेला हात बघुन याला शिसारीच आली. कोरडी राख पडेल अशी सुजलेली नखं.
"मॅनिक्युअर नाही होणार, समोरच्या गल्लीत होईल काम", ह्याने कसंबसं तोंडं उघडत निर्विकारपणे सांगितलं.

शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ शशक- मदमस्त - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 23 February, 2025 - 07:29

ग्रीष्मातल्या माध्याह्नी तळपणार्‍या रश्मीकराचे प्रकाशबाण त्या ताटकळलेल्या पथिकांच्या सर्वांगांना घायाळ करत होते. श्रांत पांथांनी त्यांपासून संरक्षणाकरिता आम्रतरू आणि जम्बुफलवृक्षांनाच आपल्या ढाली केल्या आणि 'त्या'ची प्रतीक्षा करत ते तिथेच सैलावले. इतक्यात दूरवरून 'तो' धरणीव्योम कंपित करणार्‍या जडसंथ गजपावलांनी मार्ग क्रमताना दृष्टोत्पत्तीस पडला. 'त्या'ला पाहून सर्वच जण सरसावले व आपापल्या तरुछायेतून बाहेर येत उत्कट अपेक्षांच्या भाराने अल्पसे वाकून उभे राहिले. समीप येताच आपल्या अर्धोन्मिलित नेत्रच्छदांच्या आडून 'त्या'ची दिठी सभोवारच्या व्याकुळ जनसमुदायावर भिरभिरली.

विषय: 
शब्दखुणा: 

मभागौदि २०२५ शशक- नियत - छल्ला

Submitted by छल्ला on 23 February, 2025 - 02:16

पुरे पुरे, सुभद्रे. किती वाढशील मला? अर्जुनाने हात आडवा धरत म्हटले आणि क्षणार्धात त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली.

अपूप वाढणारे द्रौपदीचे हात किंचीत काळ थबकले पण ती बोलली काहीच नाही.

इतकी आवडते ती त्याला? इतकी? मनात सदैव तिचेच नाव रेंगाळत राहण्याइतकी? या अर्जुनावर मी उत्कट प्रेम केले. सगळे आयुष्य पणाला लावले. पण जिंकली कोण? तर सुभद्राच!

तिच्या मनात असूयेच्या ठिणग्या उडत होत्या. डोळे भरुन येत होते.

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: २: - हा आणि तो - अमितव

Submitted by अमितव on 12 September, 2024 - 10:27

हा रहायचा जंगलात, म्हणजे मु. पो. जंगलं! ते अस्तित्वात असेल तर. नाही तर मग नामशेष न होता जी काही धडपड करत टिकाव लागेल तिकडे. तो रहायचा कुठेही! घरात, रस्त्यावर, वळचणीला जागा मिळेल तिकडे. ह्याचा देह मोठा आणि आहारही मोठा, तो अगदीच खिजगणतीतला. काय शिळंपाकं मिळेल ते खाऊन थंडी वार्‍यात कसाही जगणारा अगदी खैरकूट. राज्याकडे असला की कोण मान ह्याला. तो टोपी ते चोळी काहीही पळवून समस्तांस 'जेरी'स आणणारा. ह्याची चाल कायम नाकासमोर. तो.. हु केअर्स!

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: २: { कांदाभजी} - {आशिका}

Submitted by आशिका on 12 September, 2024 - 02:55

श्वेत - श्लोक जुळे भाऊ, साहजिकच खेळणे-बागडणे, खाणे-पिणे, अभ्यास सगळं एकत्रच असायचं त्यांचं.

त्या दिवशीदेखील धुंवाधार पाऊस कोसळत असतांना , आई नको म्हणत असतांनाही गेलेच ते खेळायला. अंगणात चिखलाच्या पाण्यात उड्या मार, कागदी होड्या बनवून सोड, पावसांतच क्रिकेट, फूटबॉल सगळं मनसोक्त हुंदडून झालं.

दोनेक तास होत आले, हाका मारुनही पोरं काही घरात यायचं नाव घेईनात. परीक्षा तोंडावर आल्यामुळे आईच्या जीवाची घालमेल सुरु. काय करावं बरं या दोघांना घरात आणायला?.....

शेवटी आईने ब्रह्मास्त्र काढलेच.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उपक्रम शशक