Submitted by अमितव on 25 February, 2025 - 11:31
सलूनमध्ये घाम पुसत हा पेपरात डोकं खुपसून बसलेला. इतक्यात एक प्रौढशी व्यक्ती काही न बोलता खुर्चीत येऊन बसली. हात विजारीच्या खिशात. "केस कापायचे? फार गरम आहे नाही?" संवाद वाढवायला काही बोलुनही समोरुन पूर्ण शांतता. हा यंत्रवत तेल पाणी नसलेलं जंगल कापू लागला. असह्य उग्र दर्प! जरावेळ गेला आणि खिशातून बाहेर आलेला हात बघुन याला शिसारीच आली. कोरडी राख पडेल अशी सुजलेली नखं.
"मॅनिक्युअर नाही होणार, समोरच्या गल्लीत होईल काम", ह्याने कसंबसं तोंडं उघडत निर्विकारपणे सांगितलं.
झाल्यावर तो दरवाज्याकडे चालू लागला.
"पन्नास रुपये!"
त्याने हात घालून खिसे उलटे केले आणि याला उमाळून आलं.
बाहेर पडताचं तो गल्लीकडे वळला.
"अद्दल घडेल सालीला! "
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही कळली, जर कसला संदर्भ
नाही कळली, जर कसला संदर्भ असेल तर.
अन्यथा, याला घृणा, पैसेही मिळाले नाही, तर तिकडे मॅनिक्युअर करणारीला पण अशीच अद्दल घडेल म्हणुन मत्सराने हा खुश?
हो!
हो!
आपले पैसे गेले, ते ही किळसवाण्या गिर्हाइकाकडून, याचं वैषम्य वाटण्यापेक्षा पूर्ववैमनस्यातून त्रास देण्याची आयती संंधी सापडल्याचा उफराटा खुनशी आनंद त्याच्या मनाला चिरकाल सुखावून जाईल बहुतेक.
अच्छा, मी उगाच आधी वेगळे काही
अच्छा, मी उगाच आधी वेगळे काही शोधत होतो, ती व्यक्ती डिटेक्टिव्ह कुणा KKK सारखी कुणी वगैरे.
जमली आहे, खालची पोस्ट
जमली आहे, खालची पोस्ट वाचल्यावर 'क्लिक' झाली. कुष्ठरोगी दाखवला असता तर अजून तीव्र घृणा पोचली असते, आधी मला झॉम्बी वाटला.
आपले पैसे गेले, ते ही
आपले पैसे गेले, ते ही किळसवाण्या गिर्हाइकाकडून, याचं वैषम्य वाटण्यापेक्षा पूर्ववैमनस्यातून त्रास देण्याची आयती संंधी सापडल्याचा उफराटा खुनशी आनंद त्याच्या मनाला चिरकाल सुखावून जाईल बहुतेक. >> वाचली तेव्हा हेच मनात आलं होतं माझ्या. छान जमली आहे अमितव.
मला समजली वाचताच
मला समजली वाचताच
जमली आहे
थोडी वेगळी मांडणी सुचली.
पहिल्या वाक्यात समोरच्या दुकान मालकाशी/मालकिणीशी असलेली दुश्मनी सूचित करायची.
मग पुढे ही कथा..
आणि तो माणूस निघताना खिसे उलटे करून दाखवताना बोटावर नजर. आणि ते पाहून याचा शेवटचा डायलॉग,
मॅनिक्युअर समोरच्या गल्लीत करून मिळेल
षड्रिपुंबरोबर बीभत्स रसाचीही
षड्रिपुंबरोबर बीभत्स रसाचीही फोडणी पडली आहे. छान!
जमलेय कथा भारी आहे
जमलेय कथा
भारी आहे
आवडली कळवल्याबद्दल धन्यवाद
आवडली कळवल्याबद्दल धन्यवाद
जमली आहे.
जमली आहे.
षड्रिपुंबरोबर बीभत्स रसाचीही फोडणी>>>
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट कळली,आवडली.
>>> बीभत्स रसाचीही फोडणी हो
>>> बीभत्स रसाचीही फोडणी
हो
>>> सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट कळली,आवडली.
मलाही.
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट कळली,आवडली.>>>+१
>>> सोललेल्या संत्र्यामुळे
>>> सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट कळली,आवडली. >> +१
यंत्रवत शब्द उडव नि ""अद्दल घडेल सालीला! "" च्या आधी ' हा: "अद्दल घडेल सालीला! " ' असे कर म्हणजे संत्र सोलवे लागणार नाही
मला ऋन्मेश म्हणतोय तसा एक
मला ऋन्मेश म्हणतोय तसा एक सुरुवातीला संदर्भ पेरायचा होता. पण ते शब्दांत नीट बसवता नाही आलं. शक्यतो मेनिक्युअर करणार्याचं लिंग ही पुरुषच ठेवायचं होतं. पण त्यात शब्दांची/ अर्थाची फार ओढाताण होऊ लागली. म्हणून थांबलो आणि आणखी वेळ न दवडता पोस्ट केली.
कुष्ठरोगी दाखवला असता तर अजून
कुष्ठरोगी दाखवला असता तर अजून तीव्र घृणा पोचली असते, <<<<
हा प्रतिसाद असंवेदनशील वाटला
हो, पण रीपूच दाखवायचा होता
हो, पण रीपूच दाखवायचा होता सद्गुण नाही. त्यामुळे त्याच्या दुर्गुणाची तीव्रता दिसली असती. मला वाटलंच होतं कुणालातरी असं वाटेल पण हे नाट्यमयता 'बिल्ड अप' करण्याबाबत होते, जनरल स्टेटमेंट नाही. असंवेदनशील लिहायचा उद्देश नव्हता. उलट असा विचार मनात येणं हा एक रीपू आहे हेच म्हणत होते मीही. स्पष्टीकरण दिलं आहे तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व, पुढच्यावेळी काळजी घेईन.
तो उल्लेख कथेच्या अनुषंगाने
तो उल्लेख कथेच्या अनुषंगाने आहे हे समजले अस्मिता. धन्यवाद
तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते
हे कळविल्याबद्दल आभारी आहे स्पार्कल.
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट
सोललेल्या संत्र्यामुळे गोष्ट कळली,आवडली.>>>+१