Submitted by अमितव on 12 September, 2024 - 10:27
हा रहायचा जंगलात, म्हणजे मु. पो. जंगलं! ते अस्तित्वात असेल तर. नाही तर मग नामशेष न होता जी काही धडपड करत टिकाव लागेल तिकडे. तो रहायचा कुठेही! घरात, रस्त्यावर, वळचणीला जागा मिळेल तिकडे. ह्याचा देह मोठा आणि आहारही मोठा, तो अगदीच खिजगणतीतला. काय शिळंपाकं मिळेल ते खाऊन थंडी वार्यात कसाही जगणारा अगदी खैरकूट. राज्याकडे असला की कोण मान ह्याला. तो टोपी ते चोळी काहीही पळवून समस्तांस 'जेरी'स आणणारा. ह्याची चाल कायम नाकासमोर. तो.. हु केअर्स!
सध्या मात्र मोठी बडदास्त होती दोघांची. सकाळ संध्याकाळ सुग्रास जेवण काय, आरत्यांची ताटं काय. पावसाच्या दिवसांत डोक्यावर मंडप काय! दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>>सध्या मात्र मोठी
>>>>>>सध्या मात्र मोठी बडदास्त होती दोघांची. सकाळ संध्याकाळ सुग्रास जेवण काय, आरत्यांची ताटं काय. पावसाच्या दिवसांत डोक्यावर मंडप काय! दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच.
मला आधी वाटलेले गणपती आणि उंदीर 'जेरी.'
पण नाही तसं नाही दिसत.
खैरकूट शब्द मस्त वापरलात.
पण नाही तसं नाही दिसत. <<
पण नाही तसं नाही दिसत. <<
जवळ जवळ तसंच आहे. Head Owner.
मस्त शशक..
मला आधी वाटलेले गणपती आणि
मला आधी वाटलेले गणपती आणि उंदीर
>>>> तेच तर आहे की.
आवडली शशक.
>>>>Head Owner होय हत्ती.
>>>>Head Owner
होय हत्ती.
छान जमली आहे, सगळी शशके वाचून
छान जमली आहे, सगळी शशके वाचून आणि संयोजनातला उत्साह बघून कौतुक वाटले. creative juices flow होत आहेत अगदी.
फायानली मला अमितव यांची शशक
फायानली मला अमितव यांची शशक कळली
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.

नको तुला पण हवा असेल तर) पण लिहिणं पण सोडून दिलं आहेस हल्ली!
तू अभिषेकचे कपडे घाल आणि लिही बरं! धागे नाही काढतेस (नो कम्प्लेन.
धन्यवाद अमितव.. थोड्या
धन्यवाद अमितव.. थोड्या प्रायोरीटी बदलल्या आहेत. ज्याची काही खंत नाही. जो पर्यंत मजेत आहे तोपर्यंत आयुष्याच्या प्रवाहानुसार वाहतो. कित्येक धागे वाचणे सोडले आहे. पण लिहिणे कधीच पूर्ण थांबणार नाही. चांगले वाईट कसेही. माझ्यासाठी ते स्ट्रेस बस्टर असते
एनिवेज, तुम्ही आणि अतरंगी दोघे यंदा अगदी बुद्धीचातुर्याचा वापर करून कथा लिहीत आहात.
कळल्यामुळे छान!
कळल्यामुळे छान!
या साऱ्या शशक लिहिण्यार्यांचे कतुक वाटते.
आत्ताच एक हत्तींच्या कॉरिडॉर
आत्ताच एक हत्तींच्या कॉरिडॉर संदर्भातली माहिती देणारी एक मुलाखत ऐकून संपवली आणि लगेच तुझीच शशक पान उघडल्यावर समोर आली
आवडली शशक
मस्त. समजली आणि आवडली!
मस्त.
समजली आणि आवडली!
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली. टोपी ते चोळी रेफरन्सने
आवडली. टोपी ते चोळी रेफरन्सने जरा कन्फ्यूज झाले पण शेवटाकडे परत मुळचे आकलन बरोबर होते हे समजले.
झकास!!
झकास!!
राजा भिकारी माझी टोपी घेतली..
राजा भिकारी माझी टोपी घेतली.... आणि उंदराने बायकोची चोळी पाहुण्यांच्या बिछान्यात नेऊन टाकली अशी टोटल पीजी -१३ कहाणी आहे ना.
पटकन् च कळाली... छान जमली आहे
डबल प्रतिसाद.
पटकन् च कळली... छान जमली आहे.
पटकन् च कळली... छान जमली आहे.
मस्त आहे कल्पना. आवडली शशक.
मस्त आहे कल्पना. आवडली शशक.
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली.
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली.
शेवटी ते कोरडे का राहिले? मांडव होता म्हणून - असा आधी विचार केला, पण म्हटलं अमितने लिहिलीय, काहीतरी वेगळा अर्थ असणार.
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली.
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली. +१
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली.
सुंदर कल्पना. कळली आणि आवडली. Happy>>>+११ आणि हर्पाला अनुमोदन
धन्यवाद!
धन्यवाद!
हपा
अरे हत्ती आणि उंदिर जोकचा काही तरी संदर्भ घालणार होतो, पण मग आठवलं ते हत्ती आणि मुंगी असतात. च्यामारी! आता रात्र झाली च्यामारी उद्या सकाळी! :यक्क: मग म्हटलं मुंगीला मेरू पर्वत गिळायला धाडून करू काही तरी, पण आयत्यावेळी विसरुन गेलो.
(No subject)
छान आहे
छान आहे
वाचतानाच कळत गेली त्यामुळे अजूनच छान वाटले.