मभागौदि २०२५ शशक- नियत - छल्ला

Submitted by छल्ला on 23 February, 2025 - 02:16

पुरे पुरे, सुभद्रे. किती वाढशील मला? अर्जुनाने हात आडवा धरत म्हटले आणि क्षणार्धात त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली.

अपूप वाढणारे द्रौपदीचे हात किंचीत काळ थबकले पण ती बोलली काहीच नाही.

इतकी आवडते ती त्याला? इतकी? मनात सदैव तिचेच नाव रेंगाळत राहण्याइतकी? या अर्जुनावर मी उत्कट प्रेम केले. सगळे आयुष्य पणाला लावले. पण जिंकली कोण? तर सुभद्राच!

तिच्या मनात असूयेच्या ठिणग्या उडत होत्या. डोळे भरुन येत होते.

पण अभिमन्यूच्या मत्यूची बातमी येताच मात्र ती सर्व विसरून तीरासारखी धावली आणि सुभद्रेला कवेत घेऊन रडताना वारंवार म्हणत राहिली, "भद्रे, तुझंमाझं जाउदे, आपले हेवेदावे युद्धासोबतच निमाले आहेत; पण आपला अभिमन्यू वाचायला हवा होता गं!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिमन्यूच्या मत्यूची बातमी येताच मात्र ती स्वत:च्या मुलांच्या मृत्यूचे दु:ख विसरुन तीरासारखी धावली
<<<<
क्रोनोलॉजी चुकलीय इथे! अभिमन्यू युद्धात मृत्युमुखी पडला आणि द्रौपदीचे पाचही पुत्र अश्वत्थाम्याने युद्ध अलमोस्ट संपल्यावर केलेल्या हल्ल्यात.