ग्रीष्मातल्या माध्याह्नी तळपणार्या रश्मीकराचे प्रकाशबाण त्या ताटकळलेल्या पथिकांच्या सर्वांगांना घायाळ करत होते. श्रांत पांथांनी त्यांपासून संरक्षणाकरिता आम्रतरू आणि जम्बुफलवृक्षांनाच आपल्या ढाली केल्या आणि 'त्या'ची प्रतीक्षा करत ते तिथेच सैलावले. इतक्यात दूरवरून 'तो' धरणीव्योम कंपित करणार्या जडसंथ गजपावलांनी मार्ग क्रमताना दृष्टोत्पत्तीस पडला. 'त्या'ला पाहून सर्वच जण सरसावले व आपापल्या तरुछायेतून बाहेर येत उत्कट अपेक्षांच्या भाराने अल्पसे वाकून उभे राहिले. समीप येताच आपल्या अर्धोन्मिलित नेत्रच्छदांच्या आडून 'त्या'ची दिठी सभोवारच्या व्याकुळ जनसमुदायावर भिरभिरली. जिव्हाग्रावर आलेली शिवी 'त्या'ने क्षणभर गिळून टाकली. 'त्या'च्या तप्तमुद्रांकित मुखमंडळातून सप्तजिव्हा फुत्काराव्यात त्याप्रमाणे रक्तवर्णी तुषार भुईवर उडाले आणि पाठोपाठ आपल्या खर्जगंभीर ध्वनीत मदमस्त होत्साता 'तो' उद्गारला, "डायवर कोने? लायसन बगू."
मभागौदि २०२५ शशक- मदमस्त - हरचंद पालव
Submitted by हरचंद पालव on 23 February, 2025 - 07:29
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारीच!
मला वाटतोय तो ' तो ' नक्की नसणार पण कोण असेल विचार करताना हे असतील अशी पुसटशी शंका ही आली न्हवती.
(No subject)
हेहेहे भारी लिहिली..मला कळली
हेहेहे
भारी लिहिली..मला कळली दोन वेळा वाचल्यावर.
मस्तच.. अमितव अनुमोदन..
मस्तच.. अमितव अनुमोदन..
शेवटी इष्टवार्ताश्रवण घडले,
शेवटी इष्टवार्ताश्रवण घडले, हर्ष झाला. 😂
मस्तच!
मस्तच!
भारी!
छान!
छान!
पहिल्या एक दोन वाक्यात च जाणवलं बहुतेक म्हैस विषयीच असणार !
एकदम मस्त. भारीच !
एकदम मस्त. भारीच !
संस्कृतोद्भव लोकसत्ता होता
खतरनाक धमाल जमली आहे
काल पासून मराठी शब्दकोश घेऊन
काल पासून मराठी शब्दकोश घेऊन बसलो आहे. आता वाचून संपली. तरीही नाही कळली
कुठला आधीचा/दुसरीकडचा संदर्भ आहे का कथेला?
भारी
भारी
हर्पा style शब्द आहेत सगळे
.
काय माहिती म्हशीबरोबर गटणे आठवला
भारीच!
भारीच!
खूपच छान.
खूपच छान.
सुबक ठेंगणी आणि मधु मलुष्टे घुसडायचे होते कुठे तरी!
श्रांत पांथांपैकी एक गौरवर्ण ललना आणि एक सापेक्ष नवयुवक यांच्यातील विशेष मैत्र जनांच्या नजरेतून निसटले नव्हते.
श्रांत पांथांपैकी एक गौरवर्ण
श्रांत पांथांपैकी एक गौरवर्ण ललना आणि एक सापेक्ष नवयुवक यांच्यातील विशेष मैत्र जनांच्या नजरेतून निसटले नव्हते>>>
आवडलं
छल्ला
छल्ला
ऋन्मेष
म्हैस ऐक नक्की. युट्यूबवर आहे. माझं नाव पण सापडेल त्यात.
सुबक ठेंगणी मिसिंग
सुबक ठेंगणी मिसिंग
नैतर तेव्हाच कळालं असतं.
एकदम समर्पक शेवट
भारी
भारी
हपा ओके
हपा ओके
हर्पा
हर्पा
(No subject)
श्रांत पांथांपैकी एक गौरवर्ण
श्रांत पांथांपैकी एक गौरवर्ण ललना आणि एक सापेक्ष नवयुवक यांच्यातील विशेष मैत्र जनांच्या नजरेतून निसटले नव्हते >>>
हे पण भारी आहे "सापेक्ष" चा असा चपखल वापर पहिल्यांदाच वाचला 
जुन्या माबोवर अक्षरे लपवायची सोय होती. म्हणजे तेथे कर्सरने सिलेक्ट केली, की मगच दिसत असत. या कथेतील शेवटचे वाक्य लपवायला फार उपयोगी पडली असती ती सोय. म्हणजे बाकी वाचून झाल्यावर ते "रिव्हील" होतील असे काहीतरी
क्या बात है, भई
क्या बात है, भई व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व!! हरचंद पालवा, सिंपली फँटाष्टिक
दाद द्यायला म्हणून लॉगिन करतोय. खरं म्हणजे अक्षरशः परवाच लाँग ड्राईव्ह वर 'म्हैस' ऐकलं होतं. पण शेवटपर्यंत पत्ता लागला नाही.
सिक्सर ठोकली हर्पा. शेवटचं
सिक्सर ठोकली हर्पा. शेवटचं वाक्य वाचून ठ्या करून हसायला आलं. रक्तवर्णी तुषार भूमीवर उडाले म्हणजे एग्झिबीट नं १. रक्त. मग सगळंच ऐकू आलं, रक्त?? तुमचा तो आर्डर्ली पान खाऊन पचापचा थूंकलाय.
बाकी अमितव म्हणला तसं शेवटपर्यंत पत्ता लागू दिला नाहीत हां.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
दाद द्यायला म्हणून लॉगिन करतोय >> याबद्दल विशेष आभार.
कल्पक.
मालक दंडवत स्वीकारा. झिलग्या
मालक दंडवत स्वीकारा. झिलग्या आनी धर्मा मांडवकर पण कधीतरी इथेच भेटतील.
जबराट..
जबराट..
मस्त मस्त.
मस्त मस्त.
विचार करताना हे असतील अशी पुसटशी शंका.......+१.
Pages