Submitted by आशिका on 12 September, 2024 - 02:55
श्वेत - श्लोक जुळे भाऊ, साहजिकच खेळणे-बागडणे, खाणे-पिणे, अभ्यास सगळं एकत्रच असायचं त्यांचं.
त्या दिवशीदेखील धुंवाधार पाऊस कोसळत असतांना , आई नको म्हणत असतांनाही गेलेच ते खेळायला. अंगणात चिखलाच्या पाण्यात उड्या मार, कागदी होड्या बनवून सोड, पावसांतच क्रिकेट, फूटबॉल सगळं मनसोक्त हुंदडून झालं.
दोनेक तास होत आले, हाका मारुनही पोरं काही घरात यायचं नाव घेईनात. परीक्षा तोंडावर आल्यामुळे आईच्या जीवाची घालमेल सुरु. काय करावं बरं या दोघांना घरात आणायला?.....
शेवटी आईने ब्रह्मास्त्र काढलेच.
किचनमध्ये जाऊन पटापट कांदा चिरुन, बेसन, मीठ-मसाला घालून भजी तळली आणि गरमागरम कांदाभजीची प्लेट घेऊनच अंगणाकडे मोर्चा वळवला.
रेनकोट घातलेले ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तं लालुच!
मस्तं लालुच!
येस्स्स! मस्तच. पाऊस =
येस्स्स! मस्तच. पाऊस = कांदाभजी