नेटफ्लिक्स च्या मासिक वसूलीला न्याय देण्यासाठी मी बऱ्याचदा माझा अमूल्य वेळ काही मालिकांवर खर्च करीत असतो. अगदी रोजच्या रोज स्क्रिनला चिकटून राहणे शक्य नसले तरी कधीतरी एखादा चित्रपट पाहणे मी पसंत करतो. शक्यतो मी स्वत:हून नवीन काही बघायला जात नाही. पण कोणीतरी आवर्जून शिफारस केली तर बघण्याचा प्रयत्न नक्की करतो.
कलर्स मराठीवर सुरू झालेली ही मालिका.. विषय तसा जुना , (आईना सारख्या) अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला..
पण यातली नायिका, शिवानी सोनार आणि नायक मणिराज पवार, दोघेही मस्त आहेत. स्पेशली तो मणिराज जाम सॉलिड दिसतो आणि कामही सहज , मस्त करतो 
शुभांगी गोखले , गार्गी फुले, अजय पुरकर अशी तगडी स्टारकास्ट आहे मालिकेची...
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
खऱ्या घटना आणि व्यक्तींवर आधारीत आहे मालिका .. कोलंबिया देशात पाब्लो एस्कोबार हा ड्रग माफिया होता 1980 - 90 दशकात .. त्यावेळच्या जगातल्या पहिल्या 10 श्रीमंत लोकांत त्याचा नंबर होता इतकी अमाप संपत्ती कमावली ... अमेरिकेत कोकेन पहिल्यांदा आणणाऱ्या माफियांपैकी तो होता . कितीतरी बिलियन डॉलर अमेरिकेतुन कमावून नेले ...
काही दिवसांपूर्वीच अग्निहोत्र-२ ही मालिका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्राच्या पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये शरद पोंक्षे, मोहन जोशी, विनय आपटे, इला भाटे, मुक्ता बर्वे इ. कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका खूप रंजक बनली होती. आता अग्निहोत्र-२ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार यात शंका नाही. अग्निहोत्रच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागातील जास्तीत जास्त कलाकार असतील तर अजूनच मजा येईल. दुसऱ्या भागात काय नवीन रहस्य दडलेली असतील हे पहायची माझी खूप उत्सुकता आहे.
हल्ली माणसं आंतरिक सौन्दर्यापेक्षा बाहेरील वरवरच्या सौन्दर्याकडे आकर्षित होतात. सावळा-गोरा असा भेद करू लागतात. जर एखादी व्यक्ती इतरांपेक्षा रूप-रंगानं थोडी कमी असली पण त्या व्यक्तीचं आंतरिक मन अतिशय निर्मळ असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला समाजात तुच्छतेने वागवलं जातं. बाहेरून दिसणाऱ्या सौन्दर्यापेक्षा मनाचं सौन्दर्य अधिक श्रेष्ठ असतंं अशा आशयाची 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'रंग माझा वेगळा' या नावाची मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.
या! चर्चा करू या!!
साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं ..
" 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात "
मी फारशा क्राईम- डिटेक्टिव्ह / पोलीस मालिका पाहिलेल्या नाहीत ... इंग्रजीतील ह्या प्रकारातली पहिलीच पाहिलेली ही मालिका , ती आवडली .. हिच्यापेक्षाही खूप चांगल्या- अधिक प्रसिद्ध इंग्रजी क्राईम मालिकां इथे अनेकांनी आधीच पाहिलेल्या असतील , त्यामुळे कदाचित यात फारसा रस वाटणारही नाही याची मला कल्पना आहे .. तरीही कुणालातरी पाहावीशी वाटेल आणि आवडेल म्हणून इथे शेअर करत आहे .
तर या चर्वितचर्वण करायला न पिसं काढायला!
२१ ऑक्टोबर पासून चालू होतेय. रानादा टाटा करणार बहुतेक...
हाय फ्रेण्डस,
ह्यावेळचा हिन्दी बिग बॉसचा सिझन ' ओन्ली सेलिब्रिटिज' चा असणार आहे. नो कॉमनर्स!
बिबॉ लोणावळयात नसून, फिल्मसिटीत घडतय.
ह्यावेळी सिझनमध्ये काही नवीन टिव्स्ट्स असणार आहेत म्हणे.
एरवी बिग बॉस पुरुषी आवाजात स्पर्धकान्ना आदेश दयायचा, पण आता त्याच्या जोडीला फिमेल वॉईस ऐकायला मिळणार आहे. आणि तो आवाज असणार आहे:
अमिषा पटेलचा.
सो, चर्चा करायला या!
