Submitted by मोरपिस on 3 November, 2019 - 05:05
हल्ली माणसं आंतरिक सौन्दर्यापेक्षा बाहेरील वरवरच्या सौन्दर्याकडे आकर्षित होतात. सावळा-गोरा असा भेद करू लागतात. जर एखादी व्यक्ती इतरांपेक्षा रूप-रंगानं थोडी कमी असली पण त्या व्यक्तीचं आंतरिक मन अतिशय निर्मळ असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीला समाजात तुच्छतेने वागवलं जातं. बाहेरून दिसणाऱ्या सौन्दर्यापेक्षा मनाचं सौन्दर्य अधिक श्रेष्ठ असतंं अशा आशयाची 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'रंग माझा वेगळा' या नावाची मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.
या! चर्चा करू या!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चला चला चर्चा करूया.
चला चला चर्चा करूया.
Original गोर्या रंगाच्या
Original गोर्या रंगाच्या हिरोवीनी ला काळी दाखवून सिद्ध केलाय तसा यांचा रंग फारच वेगळा आहे ते
सावळा रंग असलेली नायिका
सावळा रंग असलेली नायिका घ्यायला हवी होती. मुळ गोरी आणि अनेक मालिकेत आधी बघितलेली नायिका घेतल्याने फार कृत्रिम वाटतोय तो सावळा रंग. मी नाही बघत म्हणून मालिका. मी सात फेरे बघितलेली काही दिवस त्यात साधारण हाच विषय होता, पण नायिका खरंच सावळी होती. मला आवडलेली, उगाच मेकअप केलेला नव्हता, मस्त होती शरद केळकर आणि राजश्री ठाकूर वैद्य जोडी.
स्टार प्रवाहच्या fb पेज वर पण बऱ्याच जणांनी हेच विचारलं आहे की सावळा रंग असणारी नायिका का नाही घेतली.
आशुतोष गोखले आणि नायिका दोघे चांगले अभिनय करणारे आहेत पण तरीही मला नायिका ही पटली नाही.
एक पुरुष आणि त्याच्यामागे दोन
एक पुरुष आणि त्याच्यामागे दोन बायका, एक अर्थात त्याला आवडणारी (शक्यतो चाळीत राहणारी) आणि दुसरी त्याच्यावर लट्टू असणारी आणि सुडाने पेटलेली ही बेसिक गोष्ट आहे, यात त्याला काळ्या-गोऱ्या रंगाचा तडका दिलाय. दीपा ही तमाम मालिकेतल्या नायिकांसारखी अति सहनशील, अति कनवाळू, सतत दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करणारी, सर्व गुण संपन्न आहे. तिला स्वाभिमान असंही काही असतं याची जाणीवच नाही. आईने आणि बहिणीने कितीही हाड तुड केलं तरी ती शेपूट घातलेल्या कुत्र्यासारखी त्यांच्या आजूबाजूला घोटाळत असते. तिचा अविश्वसनीय चांगुलपणा उर्फ मूर्खपणा बघून तिला एक ठेवून द्यावीशी वाटते.
सासरी तिची सासू तिला छळणार, करवली म्हणून गेलेली तिची बहीण जी कधी परत जातच नाही, तिच्या नवऱ्यावर हक्क गाजवणार आणि ही मोलकरीण बनून घरातली सगळी कामं करत राहणार आणि नोकरांना आराम देणार.
हखा जिन्यावरून खाली उतरताना दोन वेळा चपला बदलते, चपलांचे प्रायोजक आहेत का कुणी. तिचे ऑक्सिडाइज दागिने फक्त आवडले आत्तापर्यंत.
खरंच नायिकेला वेगळ्या च रंगात
खरंच नायिकेला वेगळ्या च रंगात रंगवले आहे. ती शेड नैसर्गिक वाटत नाही. मेकअप गंडला आहे. म्हणून मालिकेचे नाव रंग माझा वेगळा.
सिरियलचा विषयच उगाच आपल
सिरियलचा विषयच उगाच आपल काहीतरी.. असा वाटतोय. कारण आजकाल दिसण्यावरुन नाही तर एकंदर माणसाच (स्त्री-पुरुष दोघही) व्यक्तिमत्व बघुनच तो माणुस पारखला जातो..
खरंच नायिकेला वेगळ्या च रंगात
खरंच नायिकेला वेगळ्या च रंगात रंगवले आहे. ती शेड नैसर्गिक वाटत नाही. >> अगदी अगदी .
कोनीतरी खरच सावळी हवि होति
बघणाऱ्या मा बो प्रेक्षकांनी
बघणाऱ्या मा बो प्रेक्षकांनी मला एक सांगा की ती यात नायिका खरंच सावळी दाखवली आहे की एक हिंदी सिरीयल होती की नायिका गोरी असते पण समाजात सुरक्षित राहावं म्हणून काळा रंग लावत असते, तसं असेल तर ok नाहीतर नायिका खरोखर सावळ्या रंगाची घ्यायला हवी होती असं मनापासून वाटतं.
दीपा ही तमाम मालिकेतल्या
दीपा ही तमाम मालिकेतल्या नायिकांसारखी अति सहनशील, अति कनवाळू, सतत दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करणारी, सर्व गुण संपन्न आहे. तिला स्वाभिमान असंही काही असतं याची जाणीवच नाही. आईने आणि बहिणीने कितीही हाड तुड केलं तरी ती शेपूट घातलेल्या कुत्र्यासारखी त्यांच्या आजूबाजूला घोटाळत असते. तिचा अविश्वसनीय चांगुलपणा उर्फ मूर्खपणा बघून तिला एक ठेवून द्यावीशी वाटते. >>>>>>> अगदी अगदी
सावळा रंग असलेली नायिका घ्यायला हवी होती. >>>>>>> त्यान्ना अस वाटत असेल की सिरियलमधे सतत नायिकेच्या रन्गावरुन तिला हिणवल जातय, सो सावळया रन्गाची नायिका घेतली तर तिला वाईट वाटेल सिरियलमधल ह्युमिलेशन बघून.
खर तर दोघीन्नी आपल्या भुमिकान्ची अदलाबदल करायला हवी होती. दिपाची भुमिका त्या खलनायिका झालेल्या मुलीला दयायला हवी होती. ती नवीन वाटते.
हखा जिन्यावरून खाली उतरताना दोन वेळा चपला बदलते >>>>>>> हो ना. त्यातला एक रन्ग काळा आहे.
हिरो नेहमी पारोसा , दाढी न केलेला असतो. सौन्दर्या ( हखा) त्याला सान्गत का नाही की बाबा रे ती दाढी आधी सफाचट करुन टाक. मला काळा रन्ग आवडत नाही माहितेये ना तुला.
सौन्दर्याने तिच्या नवर्याशी लग्न का केलेल असत कारण तो पुरुषान्ची कुठलीतरी मि. इण्डिया स्पर्धा जिन्कला होता, रुबाबदार दिसतो म्हणून. त्याची अक्कल गेली चुलीत. आता तर ' मिस डोम्बिवली' स्पर्धा आयोजित केली आहे तिने का तर कार्तिकसाठी ( आशुतोष गोखले) सुन्दर बायको शोधायची म्हणून. काहीही!
दिपाच्या आजीला डोळयान्नी खरच दिसत नसत का? कायम डोळे बन्द करुन असते ती.
बाकी आशुतोष गोखलेला चान्गला ब्रेक मिळाला.
अन्जू ती आधीपासूनच सावळी असते. मी पहिल्या भागापासून बघायला सुरुवात केली आहे. दिपाची सख्खी आई तिच्या लहानपणी वारलेली असते. ती सुद्दा सावळी दाखवलीय. आता आहे ति तिची सावत्र आई आणि बहीण. त्या तिच्या लहानपणापासून तिचा दुस्वास करत असतात. तिची आजी ही सावत्र आईची आई असते. आजी आणि तिचे वडील मात्र तिच्यावर माया करतात.
ह्या सिरियलचा लेखक केडया आहे बर का.
ह्या सिरियलचा लेखक केडया आहे
ह्या सिरियलचा लेखक केडया आहे बर का. >>>> बोम्बला !!!!
सिरीयलमध्ये डोंबिवली आहे काय
सिरीयलमध्ये डोंबिवली आहे काय
.
त्यान्ना अस वाटत असेल की सिरियलमधे सतत नायिकेच्या रन्गावरुन तिला हिणवल जातय, सो सावळया रन्गाची नायिका घेतली तर तिला वाईट वाटेल सिरियलमधल ह्युमिलेशन बघून. >>> मला नाही वाटत तसं. कमलाची कमला मस्त होती ह्या रोलसाठी, आता मोलकरीण मध्ये आहे. हिंदीत मात्र बिदाई आणि सात फेरे मध्ये सावळ्या नायिका घेतलेल्या, बिदाई मी नव्हते बघत.
कोणीतरी गोरीच जर यांना सावळी दाखवायची होती तर मग नवीन घ्यायला हवी होती, जिला फार कोणी ओळखत नाही. चार पाच सिरीयल केलेली ही गोरी आहे हे सर्वांना माहितेय.
हो आणी तुपारे चे प्रोडुसरच
हो आणी तुपारे चे प्रोडुसरच ह्याचे प्रोडुसर आहेत... म्हणजे विचार करा
हो आणी तुपारे चे प्रोडुसरच
हो आणी तुपारे चे प्रोडुसरच ह्याचे प्रोडुसर आहेत... म्हणजे विचार करा >>>>>>>> त्यान्ची नावे वाचली तेव्हा डाउट आला होता नक्की हेच का ते. तरीच हखाचा बन्गला एवढा छान दाखवलाय.
कोणीतरी गोरीच जर यांना सावळी दाखवायची होती तर मग नवीन घ्यायला हवी होती, जिला फार कोणी ओळखत नाही. चार पाच सिरीयल केलेली ही गोरी आहे हे सर्वांना माहितेय. >>>>>>> अगदी अगदी खर तर दोघीन्नी आपल्या भुमिकान्ची अदलाबदल करायला हवी होती. दिपाची भुमिका त्या खलनायिका झालेल्या मुलीला दयायला हवी होती. ती नवीन वाटते.
सिरियलचा लेखक केडया आहे बर का
सिरियलचा लेखक केडया आहे बर का. >>> >>> >> केडयाच्या नावाचा उल्लेख लेखक केला म्हणुन जरा जास्तच हसु येतय..

सिरियलचा लेखक केडया आहे बर का
सिरियलचा लेखक केडया आहे बर का. >>> >>> >> अरे देवा! मी डोक्याला हातच मारून घेतला!!
ही तर काही बघणार नाही. आणि
ही तर काही बघणार नाही. आणि अग्निहोत्र फॅन्स साठी गुड न्यूज, अग्निहोत्र परत येतेय. स्टार प्रवाह चा धागा आहे सो इथेच लिहिले.
ही तर काही बघणार नाही. आणि
ही तर काही बघणार नाही. आणि अग्निहोत्र फॅन्स साठी गुड न्यूज, अग्निहोत्र परत येतेय. स्टार प्रवाह चा धागा आहे सो इथेच लिहिले. >>> >>> वा!! मलाही त्या मालिकेची उत्सुकता आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे अग्निहोत्र-२.
पहीले कलाकार नसतील मात्र
पहीले कलाकार नसतील मात्र जास्त आता. सतीश राजवाडे, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे. मृण्मयीच्या बहिणीला घ्यायला हवं, ती पण मस्त आहे.
त्याचा शेवट केलेला एक दुसरा अग्निहोत्री पत्र पाठवतो नील ला, आम्ही पण तिथलेच, त्या family ची स्टोरी असेल आता कदाचित. छान होऊदे दुसरा भाग. सतीश राजवाडेच डायरेक्शन करणार आहेत बहुतेक.
नील ची फॅमेली तीच हवी, बाबा:
नील ची फॅमेली तीच हवी, बाबा: मोजो आई :इला भाटे बहिण :मृणाल गोडबोले (नाव नीट आठवत नाही, श्रीरंग गोडबोलेंची मुलगी)
आस्ताद काळे आधीच्या सिरीयल मध्ये रिप्लेस झाला होता, (नील ची आते भाऊ दाखवलेला ना) नंतर कोणीतरी भलताच होता. विनय आपटें ना खुप मिस करीन,
ज्या सिरीयल च्या धाग्यावर आहे त्या बद्दल विचारते आता
>>हखा जिन्यावरून खाली उतरताना दोन वेळा चपला बदलते,>>>> ह्या सिरीयल मध्ये हखा आहे? ती तर कलर्स मराठी वर "नवरा असावा तर असा " करायची ना?
आस्ताद काळे आधीच्या सिरीयल
आस्ताद काळे आधीच्या सिरीयल मध्ये रिप्लेस झाला होता, >>> हो का, मला नाही आठवत पण त्यावेळी त्याची gf दाखवलेली त्यात, तीच त्याची प्रत्यक्षात gf होती आणि तिला कॅन्सर झालेला, त्यामुळे असेल त्याची replacement. स्पृहा मला त्यात आवडलेली नंतर नाही आवडली कधी सिरीयलमध्ये.
मो जो नंतर बदलून अविनाश नारकर होते त्याजागी ते आठवतंय.
ती तर कलर्स मराठी वर "नवरा
ती तर कलर्स मराठी वर "नवरा असावा तर असा " करायची ना?>>>>>> ती मालिका केव्हाच बंद झाली. त्याजागी आता श्री लक्ष्मी-नारायण ही मालिका सुरू आहे
मो जो नंतर बदलून अविनाश नारकर
मो जो नंतर बदलून अविनाश नारकर होते त्याजागी ते आठवतंय.>>>> नाही गं, मोजो शेवटपर्यंत होते नील चे वडिल चिंतामणी अग्निहोत्री, अविनाश नारकर मृण्मयी देशपांडे चे वडिल होते आणि ते बदलून डॉ गिरीश ओक तिचे वडिल (सुहास जोशी चा मुलगा) शेवटपर्यंत
मो जो नंतर बदलून अविनाश नारकर
मो जो नंतर बदलून अविनाश नारकर होते त्याजागी ते आठवतंय.>>>> नाही गं, मोजो शेवटपर्यंत होते नील चे वडिल चिंतामणी अग्निहोत्री, अविनाश नारकर मृण्मयी देशपांडे चे वडिल होते आणि ते बदलून डॉ गिरीश ओक तिचे वडिल (सुहास जोशी चा मुलगा) शेवटपर्यंत
>>> गिरीश ओकना नंतर अविनाश नारकरनी रिप्लेस केलं !
मोहन जोशी - चिंतामणी
गिरीश ओक > अविनाश नारकर - सुहास जोशीं चा मुलगा ( निंबाळकर )
मी बघणार !!!!
माझी सगळ्यात लाडकी मालिका
गिरीश ओकना नंतर अविनाश
गिरीश ओकना नंतर अविनाश नारकरनी रिप्लेस केलं ! >>> असं असेल, अ ना नंतर आले सिरीयलमधे एवढं आठवतंय.
नाही गं, मोजो शेवटपर्यंत होते >>> हो आठवलं, आठवलं.
सर्वात मस्त सीन्स शरद पोंक्षे आणि मुक्ता बर्वेचे असायचे. आधी किती हाडतुड करायचा काका तिला आणि मग प्रेमळ झाला एकदम तिच्याबाबतीत, ते दोघांचंही होणारं transaformation किती छान होतं. अगदी आत्ता बघितल्यासारखं आठवतं. अग्निहोत्र तेवत ठेवण्यासाठी तिने घातलेलं तूप आणि मग खाल्लेला ओरडा लख्ख आठवतोय.
अग्निहोत्रचा धागा काढा कोणीतरी, नाहीतर सगळी चर्चा इकडेच व्हायची
माझीपण अत्यंत आवडतो मालिका होती. आता दुसरा भाग पण छान असुदे, hope so.
अग्निहोत्रच्या चाहत्यांसाठी
अग्निहोत्रच्या चाहत्यांसाठी एक नवीन धागा काढला आहे. लिंक - https://www.maayboli.com/node/72238
कोणी स्टार प्रवाह वरची 'आई
कोणी स्टार प्रवाह वरची 'आई कुठे काय करते' ही मालिका बघता आहात काय?
एक दोन सीन बघितले होते, नाही
एक दोन सीन बघितले होते, नाही पचनी पडले. एखादी शिकलेली गृहिणी ईतकी लाचार असू शकते यावर माझा तरी विश्वास कधीच बसणार नाही.
रंग माझा मध्ये त्या दीपाच्या दोन ठेवून द्याव्याश्या वाटतात. आता लागलाय ना तो डॉक्टर मागे मग घे ना स्वतःचं भलं करून तर ही बया आयाच असल्याच नाटक काय करते आणि त्याने दिलेलं गिफ्ट काय परत करते. दोघी बहिणी माठ आहेत, दुसरीही ठरलेलं लग्न मोडते कारण तिला डॉक्टर आवडत असतो. मला फक्त हखाची ज्वेलरी आवडते.
झी वर साडेसात वाजता जी मालिका
झी वर साडेसात वाजता जी मालिका सुरू आहे जिचे प्रोमोसुद्धा बघवत नाहीत त्यापेक्षा ही आई कुठे काय करते बरी वाटली.यातसुद्धा नवर्याचे विबासं,सुनेवर राग असणारी सासू ,सोज्वळ, साधीभोळी,पती परमेश्वर मानणारी गृहिणी सून असलाच मसाला आहे
रंग माझा मध्ये त्या दीपाच्या
रंग माझा मध्ये त्या दीपाच्या दोन ठेवून द्याव्याश्या वाटतात. आता लागलाय ना तो डॉक्टर मागे मग घे ना स्वतःचं भलं करून तर ही बया आयाच असल्याच नाटक काय करते आणि त्याने दिलेलं गिफ्ट काय परत करते. दोघी बहिणी माठ आहेत, दुसरीही ठरलेलं लग्न मोडते कारण तिला डॉक्टर आवडत असतो. >>>>>>>> +++++++++११११११११ तिची मैत्रिण साक्षी सुद्दा तिला हाच सल्ला देते पण ही ऐकेल तर शपथ!
एखादी शिकलेली गृहिणी ईतकी लाचार असू शकते यावर माझा तरी विश्वास कधीच बसणार नाही. >>>>>>> तिची सासू ती कमी शिकलेली आहे अस म्हणाली होती ना?
त्या विबासं करण्यार्या बाईची अवस्था सुद्दा क्रिटिकलच आहे. चान्गली मॉर्डन दाखवलीये ती, तरीही ती तिच्या दारुडया आणि आळशी नवर्याला का टॉलरेट करते, त्याच्याबरोबर का राहते हे कळतच नाही.
छान आहे सीरियल आई कुठे काय
छान आहे सीरियल आई कुठे काय करते
मधुराणी प्रभुल करने मस्त काम केलंय. आता सीरियल मध्ये मल मसाला पाहिजे म्हणून ते विबासं वगैरे...
पण तिची तिन्ही मुलं अगदीच रद्दी घेतली आहेत...सगळं काम स्वस्तात करायला.....!
Pages