उपग्रह वाहिनी

टीव्ही चॅनेल, TV Channel

झी-मराठी : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:15

२३ ऑगस्ट पासून रात्री ९.०० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

एक लग्नाळू मुलगी (हिला कुठंतरी बघितलंय पण आठवत नाहीय Uhoh ) तिच्या सासरच्या माणसांची नावं पाठ करत असते असं ट्रेलर मधे दाखवलं आहे. राणादा पुन्हा नव्याने येतोय... पण राणादाचा छाप तो उतरवू शकेल का हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

तर अशा या नव्या शिरेलीवरील चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

झी-मराठी : माझी तुझी रेशिमगाठ

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:12

२३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

या सिरियलच्या निमित्ताने श्रेयस तळपदे अन प्रार्थना बेहेरे बर्‍याच वर्षांनी डेलीसोप मधून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

झी-मराठी : ती परत आलीये

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:08

आज रात्री १०.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

जेष्ठ कलावंत विजय कदम यांची मध्यवर्ती भूमिका असावी असं ट्रेलर वरून वाटतंय.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

नवी मालिका - स्वाभिमान

Submitted by मोरपिस on 21 February, 2021 - 01:56

छोट्या पडद्यावर उद्यापासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे.

झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

हिंदी रिअ‍ॅलिटी शोज (गाणे) - इंडीयन आयडॉल, सारेगमप, सिंगिंग सुपरस्टार इत्यादी सर्व सीझन्स

Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
Indian Idol season 12

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.

शब्दखुणा: 

देवमाणूस

Submitted by _गार्गी_ on 18 November, 2020 - 00:25

सत्य घटनेवर आधारित आहे.
वेगवान कथा मांडणी आहे. सर्व नवोदित कलाकारांचे अभिनय उत्तम.
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता झी मराठी वर!

शुभमंगल ऑनलाईन

Submitted by मोक्षू on 1 November, 2020 - 00:51

आत्तापर्यंत या मालिकेवर धागा नाही निघाला याचं जरा आश्चर्यच वाटलं.. कोणीच पाहत नाहिये का ही मालिका...? मस्त चालू आहे.. हलकी फुलकी.. Colours मराठीवर असते रात्री 10 वा.

Pages

Subscribe to RSS - उपग्रह वाहिनी