हिंदी रिअ‍ॅलिटी शोज (गाणे) - इंडीयन आयडॉल, सारेगमप, सिंगिंग सुपरस्टार इत्यादी सर्व सीझन्स

Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
Indian Idol season 12

सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडीयन आयडॉलचा ३० जानेवारी २०२१ चा एपिसोड धमाकेदार झाला. पाहुणे म्हणून आलेल्या कुमार शानू आणि अलका याद्निक यांच्यामुळे पाहण्यासारखा झाला.
कालच्या एपिसोडमधे एकूण सहा जणांनी भाग घेतला. त्यातले अरूणिता कांजीवाल, षण्मुख प्रिया आणि सवाई भट यांचे परफॉर्मन्सेस सर्वात छान झाले. षण्मुख आणि सवाई भट यांच्याकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. काल सवाई भट ने आपण अशीही गाणी गाऊ शकतो हे दाखवून दिले. तर अरूणिता कांजीवाल जी सुरूवातीला फेव्हरिट नव्हती ती हळूच पुढे येऊ लागली आहे. तिने आपले गुण हळू हळू प्रदर्शित करायला सुरूवात केली आहे. ती अंडरडॉग वाटते.

कालच्या एपिसोडची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे नचिकेत लेले आणि निहाल तारो यांची गाडी रूळावर आली. नचिकेत च्या अवतारांमधे परफॉर्मन्सकडे दुर्लक्ष होत होते. कालचे त्याचे गाणे खूप सुंदर. निहालचा आवाज सर्वात चांगला आहे. सहा जणांचे परफॉर्मन्सेस राहीले.

ते आजच्या एपिसोडमधे चालू आहेत.
सायलीची गाडी आज रूळावर येताना दिसली. सुरूवातीच्या तीन एपिसोडमधे तिने मनं जिंकली. पण नंतर तिची कामगिरी चांगली होत नव्हती. आज तिने त्यावर काम केलेलं दिसलं. आशीष कुलकर्णीचा परफॉर्मन्स आत्ता झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यात तो स्टेजवर नाचतानाही सूर जाऊ देत नाही. अतिशय गुणी गायक आहे.

आत्ता दानिशचा परफॉर्मन्स संपला. ९० च्या गाण्यासाठी त्याचा आवाज योग्य वाटत नाही. आताच्या गाण्यात तो एकदम उजवा वाटतो. मात्र त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याला आवाजाची जोड मिळायला हवी होती. शास्त्रीय बैठक असल्याने प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासाठी काय करायचं याचं भान त्याला आहे.

मी पण बघतेय इंडियन आयडॉल. मस्त गायक आहेत यावेळी. अंजली, नचिकेत, पवनदीप हे माझे फेवरीट्स. पवनदीप तर गिफ्टेड आहे अगदी. गाणे वर्सटाइल आहेच पण सोबत वाद्यं हार्मोनियम, ड्रम, गिटार, पियानो सगळेच लीलया वाजवतो. दानिश कडे पण पोटेन्शियल आहे. सवाई फारसा आवडत नाही. अति उच्च पट्टीत गाताना एकदम ते रस्त्यावरच्या किंवा लोकल ट्रेन मधे गाणार्‍यांसारखा फील येतो. अरुणिमा, सायली छान आहेत, गोड आवाज आणि सुरेल - पण या कॅटेगरीमधे खूप सिंगर्स येतात आणि जातात त्यामुळे युनिक वाटत नाहीत. सेम केस निहाल आणि आशिषची. गरिबांचे अरिजीत हजारोंनी येतात त्यामुळे सुरेल असले तरी त्यांच्या गाण्यचे तेवढे कौतुक वाटत नाही. षण्मुखप्रिया गाते त्या प्रकारातली गाणी मला फार अपील होत नाहीत पण तिची युनिक स्टाइल आणि आवाज आहे हे खरं. सिरिषा चा पण वेगळा आहे आवाज.
काल ९०ज गाण्यांचा चॉइस नाही आवडला फारसा. नचिकेत चे गाणे आवडले.

मलाही आवडतोय हा सिझन ,मला सुभाष घई एपिसोड फार आवडला आणि २६ जानेवारी ॓
प्रत्येकाचा आवाज/जॉनर वेगळं आहे त्यामुळे एक शो म्हणून पहायला मजा येते, सगळे स्पर्धक रिअ‍ॅलिटी शोजचा भरपूर एक्स्पिरियन्स असलेले/विनर असलेले सुद्धा आहेत(पवनदीप).
मराठी पोरां मधे मला आशिष कुलकर्णी आवडतो , नचिकेत सुध्द्दा छान गातो पण नाट्यसंगीत एपिसोडमधे जितका आवडला तितका नंतर नाही.
अंजली मस्तं गाते, सुबोध भावे आला होती तेंव्हा नचिकेत बरोबरच्या डुएटमधे त्याच्यापेक्षा ती जास्त छान गायली.
शण्मुखप्रियाही मस्त गाते, हे सगळेच स्पर्धक ए.आर. रहमानची भरपूर गाणी गातात त्यामुळे मजा येतेय !
बाकी सध्या तरी पवनदीपला कोणीच काँपिटिशन दिसत नाही, पोटेन्शिअल विनर सिझनचा !
दानिश ओके गातो पण थोडा हाइप्ड वाटतो मला.

अरे हो, काल पवनदीपचा राहिला. आज वाय फाय बंद पडल्याने श्री शा चे गाणे सुरू होण्याआधीच .
पबनदीपच्या छोट्या बहिणीचा आवाज त्याच्या पेक्षाही छान आहे. दिसायलाही सुंदर आहे ती.

मै +१
९० ची साधी स्ट्रेट गाणी गाताना सगळ्यांची फजिती झाली, फक्त चॅलेंजिंग गाणीच गातात एरवी त्यामुळे इथे फसले, त्यातल्या त्यात चक्क निहाल बरा गायला , तरी निहाल जायला हवा आता !

अति उच्च पट्टीत गाताना एकदम ते रस्त्यावरच्या किंवा लोकल ट्रेन मधे गाणार्‍यांसारखा फील येतो.
अगदी !
सलमान अलीसाठी जी गाणी निवडायचे ती गाणी निवडतात त्याच्यासाठी , त्याच्यामधे अजिबात नाहीये सलमान अलीची जादू !

हो २६ जाने. चा एपिसोड आणि सुभाष घई एपिसोड मस्त झाला. नचिकेत चे रंग दे बसंती चोला गाणं , पवनदीप चं तेरी मिट्टी आणि वंदे मातरम् रहमान वर्जन , अंजलीचं ऐ मेरे वतन के लोगो एक से एक गाणी झाली. जय हो पण छान.

इंडियन आयडॉल पहिले दोन तीन सिझन चांगले होते नंतर नंतर कंटाळा आला. हा सिझन पण तसाच आहे नाटकी थोडाफार . यांच्या गाण्यांपेक्षा नटणे सजणे परफॉर्मन्स आणि इमोशन्स वरच भर आहे. आज पवनदीप मस्त गायला पण. गिटार पण मस्त.

भाग्यश्री,
मी ड्रामा पार्ट, स्पर्धकांच्या आई वडिलांचे सतत येणारे आश्रु , त्यांचे त्याग वगैरे स्टोरीज फॉरवर्ड करते, आदित्य नारायण एकदम पकाउ होस्ट आहे, तो दिसला कि फॉरवर्ड Happy
तरी सवाई भट्टची रिअ‍ॅलिटी बाहेर आल्यावर आयडॉल टिमने त्याच्या गरीबीचा ड्रामा बन्द केला.
पवनदीप त्या मानाने खूप कमी बोलतो आणि ड्रामेबाज नाहीये .

आदित्य नारायण एकदम पकाउ होस्ट आहे, तो दिसला कि फॉरवर्ड>>>> हो ते आहे Lol
पवनदीप आवडतोय, हा जिंकू शकतो. नचिकेत पण तसा चांगलाय पण अजून मेहनत घेतली तर येईल बराच पुढे. मुलींमध्ये अरुणीता आवडली.
शनमुखप्रिया कायम एकाच जॉनरचे गाणे गाते बहुतेक, ओव्हर वाटतं ते आता. बाकी इथे मुली सेफ आहेत सगळ्या मुलंच बिचारे आऊट होताय. कुडीओं का है जमाना Happy

साहिल सोळंकी झी च्या कॉण्ट्रॅक्ट मुळे गेला. त्यानेही सांगितले नसेल सोनीवाल्यांना.

बरेचदा रिअ‍ॅलिटी शोजमधे मुली बाद होत जातात. कारण मुली भरभरून व्होट करतात.
तसं मुलं अजिबात करत नाहीत. याचा फटका मुलींना बसतो.

रियालिटी शो म्हटले की मला आजही अभिजीत सावंतच आठवतो... मोहोब्बते लुटाऊंगा.. वाह
त्यानंतर कधी कश्यातच मन रमलेच नाही.. आणि सध्या तर बाजार झालाय नुसता. कधी तरी युट्यूबवर निवडक क्लिप्स बघतो. पुर्ण सहन करणे अशक्य आहे

रिया यूट्यूब वर येतात आयडॉल चे एपिसोड्स दुसर्‍याच दिवशी. नाहीतर मग स्लिन्ग साउथ एशियन पॅकेज घेतलेस तर सोनीच काय बरीच इंडियन चॅनल घेता येतात.

रीया,
सोनी लिव्ह वर (स्लिंग पॅकेज मधे).
पण स्लिंग वर उशीरा येतात, त्या आधी युट्युबवर येतात आणि डिलिट होतात लगेच , आजचा दिसला नाही अजुन !

आजचा एपिसोड.
https://www.youtube.com/watch?v=dM4lvRAOXfA
मी पण आत्ता बघतेय.

अपेक्षेप्रमाणे अनुष्का बॅनर्जी आज सुपर्ब राहिली. तिचं व्हॉईस टेक्श्चरचं असं आहे कि लतादिदी, अलका किंवा श्रेया ची गाणी तिला सूट होतात.

या शोजची ओडिशन्सच अधिक चांगली असतात. खरा भारत दिसतो यात. दिल्लीचा बुट पालिशवाला कुठेही गाणं न शिकता रेडिओ ऐकून गातो. अप्रतिम . जुन्यांपैकी अझमत, सलमान, नितीन. गाणं न शिकलेले.

नंतर नाटकीपणा सुरू होतो. चालायचेच.

*****'s got talent, champions यामध्ये जिंकले नाही तरी प्रत्येकजण करमणूक करतोच. Darcy Lynne, Jackie evancho, दोन तीन जादुगार, कुत्र्याचे शोज. फार आवडले.

पवनदीपचे सकाळी पाहिले परफॉर्मन्सेस ! हॅट्स ऑफ !!!

पवनदीप आणि निहाल यांचे आवाज ही या शो ची जान आहे. वैष्णव गिरीश बद्दल वाईट वाटले. पण आवर्जून नोंद घ्यावी असे काही वाटले नाही. गाणी सारेच छान गाताहेत.
सायली थोडी कमजोर वाटते सगळ्यांच्यात. पण तिला सुरेश वाडकरांसोबत शोज करताना पाहीले आहे.
अनुष्का ने सुरूवातीला नर्व्हसनेसचे नाटक केले असे आता वाटते.
राहुल देव नावाचा एक कंटेन्स्टंट आहे. हा यूट्यूबवर सापडला. त्याचे फक्त इंडीयन आयडॉलचे ऑडीशन सापडते. नंतर एकही व्हिडीओ इंडीयन आयडॉल साठी नाही. त्याने एक चतुर नार गायले होते. पुढे तो बहुतेक झी च्या स्पर्धेत गेला. तिथे त्याने वेगवेगळ्या गेट अप मधे जी गाणी सादर केली तीच नचिकेतने सादर केली. पण राहुल देवच्या परफॉर्मन्सेस मधे त्याच्या व्यक्तीमत्वाचा, हस-या चेह-याचा आणि कॉन्फिडन्सचा मोठा वाटा होता. नाही म्हटले तरी तुलना झालीच.
राहुल देवच्या परफॉर्मन्स च्या वेळी अनुष्का बॅनर्जी (वयाने खूप लहान आहे त्यात) दिसते. हा सीझन मिस झालाय. म्हणजे ती झी वर होती तर आता नर्व्हसनेस कसा काय आला ?

हा धागा काढण्याचे फार फार मनात होते.. पण आळस.

या shows मधून चालणारा फालतू drama वगळता मला तरी आवडतं फार. घरी सोनी TV दिसत नाही, म्हणून यौतुंबे वरून जुनेपुराणे gems शोधून ऐकत बसतो. पुढे काही आवडत्या लिंक्स देतोय ज्या ऑफिस लॅपटॉपवर पिन करून ठेवल्यात!

https://www.youtube.com/watch?v=gxdIPKlwTvg अमित जाधव (जब भी कोई लडकी)

https://youtu.be/p2HCoW6jPTo?t=1339 गझल गायक २ आणि एक गझल एकाचवेळी..! बेस्ट परफॉर्मन्स..

https://www.youtube.com/watch?v=YhHvQ_a_Lu8 हिमांशू शर्मा. (लोग कहते है अजनबी तुम हो) जब्राट

https://www.youtube.com/watch?v=HqTpyoYcx7o रोहित राऊत ऑडिशन

अजिंक्यराव वरची अमित जाधवची लिंक माईंड ब्लोईंग !! धन्यवाद.

राहुल देव या माझ्या आवडत्या कन्टेस्टंटच्या काही लिंक्स शोधून देते.
इंडीयन आयडॉल ऑडीशन ( एक चतुर नार)
https://www.youtube.com/watch?v=x_pa4O4bi9o

एक चतुर नार पूर्ण गेट अप मधे झी साठी
https://www.youtube.com/watch?v=j9ttzdMW8gk

झी ऑडीशन - कुएं मे कूद के मर जाना, यार तुम शादी मत करना
https://www.youtube.com/watch?v=rDnIh0ZtfVk
.
झी वरच्या एका शो मधे (यात अनुष्का बॅनर्जी पण दिसते)
याद पिया की आये / गुणी जनों
https://www.youtube.com/watch?v=jB-7K9hVyJM

आवडले असेल तर मेल / फिमेल आवाजातले किशोर कुमारचे गाणेही सापडेल ते ही पहा..
https://www.youtube.com/watch?v=GdstStQSGjo

इंडियन आयडॉल ज्युनिअर ची बेस्ट ऑडिशन होती ही

https://youtu.be/EK5G1tbMmJ8
श्रेया घोषाल क्युट आणि टॅलेंटेड आहेच पण विशाल पण आवडला जज म्हणून तेव्हा पण आता पण. Down to earth वाटतो.

पहिल्या इंडियन आयडॉल नंतर आवडला असेल तर तो होता..मराठी सा रे ग म प लिटिल चॉम्प्स.!
खूप मनापासून बघायचो आम्ही सर्व परिवार बसून..!
आर्या, प्रथमेश्,रोहीत्,कार्तिकी, मुग्धा..सर्वच फेवरेट होते.. त्यातल्या त्यात आर्या, सगळ्यात आवडती..
आर्या चे तुम्हावर केली मर्जी बहाल, प्रथमेश् चं गाणं..दत्त दर्शनाला जायाचं आणि कार्तिकी चं..खंडेराया च्या लग्नाला .. हे आवड्ते..!

त्यानंतर विश्वजीत बोरवण्कर चं ..लागा चुनरी मे दाग गाणं... खूपच मस्त सादर केलं होतं त्याने..
आणि नंतर सगळ्यात आवडता सलमान अली..!

बाकीचे काही बघणे झाले नाही किंवा तेवढा ईंटरेस्ट राहिला नाही..
ह्या धाग्यामुळे आठवणी जाग्या झाल्या.. आता कदाचित बघेन..

यावेळी इंडियन idol नाही बघितले. पण हा पवनदीप already voice of india season 1 चा विनर आहे तो शान च्या टीम मध्ये होता..
& tv वर लागायचे ते 2015 मध्ये. तेंव्हा तो पुर्ण सीज़न follow केला होता.

अर्जित सिंग ज्या reality शो मध्ये होता ते फेम गुरुकुल कुणी पहिले आहे का येथे.. ? सोनी टीवी वर लागायचे. अर्जित चा आवाज इतका मस्त असुन पण तो पहिल्या 3 मध्ये पण नाही आला. ते पुर्ण पब्लिक वोटस वर होते. मी पुर्ण follow केला होता तो सीज़न..
मी सगळ्या singing reality शो चे पहिले दुसरे सीज़न follow केलेत. पण नंतर ड्रामेबाजी मुळे.. परत शो शी काही एक संबध नसताना स्पर्धाकची इमोशनल बाजू सांगणे यामुळे इण्टरेस्ट कमी होत गेला..

पहिल्या इंडियन आयडॉल नंतर आवडला असेल तर तो होता..मराठी सा रे ग म प लिटिल चॉम्प्स >>>>>हा सिझन तर बेस्टच होता याच्या इतका दुसरा कोणताच singing show आवडला नाही नंतर. आर्या आणि मुग्धा फार आवडायच्या पण कार्तिकी जिंकल्यावर फार वाईट वाटलं होतं Proud

Pages