Submitted by रानभुली on 31 January, 2021 - 10:44
सिंगिंग रिअॅलिटी शोज बद्दल इथे चर्चा करावी. डान्स शोज साठी वेगळ्या धाग्यावर चर्चा करावी. सध्या सोनी वाहीनीवर इंडीयन आयडॉलचा १२ वा सीझन चालू आहे. झी वाहीनीच्या शो ची वेब ऑडीशन्स संपली आहेत. त्यामुळे तो लवकरच भेटीला येणे अपेक्षित आहे. याशिवाय विविध शोज आता सुरू होतील
या व इतर शोजच्या ज्या सीझन्स वर यापूर्वी चर्चा झालेली नाही त्यातल्या उल्लेखनीय परफॉर्मन्स बद्दलही इथे चर्चा करू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sony Liv वर पूर्ण कार्यक्रम
Sony Liv वर पूर्ण कार्यक्रम फुकट पाहता येतो का?
२४ तासांनी. त्या आधी जिओ
२४ तासांनी. त्या आधी जिओ टीव्ही अॅप वर पाहता येतो पण लाईव्ह. युट्यूबवर रात्री १० नंतर त्या दिवशीचा एपिसोड अपलोड होतो. पण तो काही तासांनी डिलीट करतात.
धन्यवाद रानभुली! युट्यूबवर
धन्यवाद रानभुली! युट्यूबवर काही काही गाणी बघितली. छान चालू आहे हा सिझन. रहमानचा एपिसोड बघावासा वाटतोय म्हणून विचारलं!
ह्या कक्कड बाईहून जास्त
ह्या कक्कड बाईहून जास्त इरिटेटिंग बाई म्हणजे गीता अम्मा . भयाण इरिटेटिंग आहे. डोक्याला शॉट एकदम
प्रोमोमधले सगळेच कार्यक्रमात
प्रोमोमधले सगळेच कार्यक्रमात असत नाही. रेखाने विशालच्या टकलावर तबला वाजवलेला पहायला नाही मिळाला).. ..>> हे बघितलं होतं ती रेखा मध्येच एकसाईट होऊन उठली आणि तबला वाजवला.
आज सायली आणि अंजली गायल्या नाही का? आशिष नेहेमीप्रमाणे मस्त गायला एकदम विनासायास. तो टट्टू निहाल एकदम बंडल गातो, बराच मोठा जॅक असावा त्याचा. सायली आणि आशिष टॉप 5 मध्ये असावेत.
आहाहा, फार अमेझिंग झाला
आहाहा, फार अमेझिंग झाला रेहमान एपिसोड आणि नावीनजींचं वादन !
रहमानचे कॅल्क्युलेटिव पण नेमके रिमार्क्स, अगदी लक्षपूर्वक गाणं ऐकणं आणि त्याचं प्रेझेन्स , व्हेरी क्लासी !
निहाल सोडून सगळे मस्तं गायले, निहालला दिलच कशाला गायला, बिलो अॅव्हरेज गातो तो !
अंजलीला का नाही दिलं गायला? रहमाननी तिला क्लासिकल गाते म्हणून स्पेशल मेन्शन केलं खरं तर !
अरुणिता आणि एके जबरदस्तं , दानिशचं छैय्या छैय्या सुध्दा आवडलं !
अशीषने सतरंगी झाल्यावर थांबायला हवं होतं, उत्तम शेवट झाला होता त्या गाण्याचा ‘मुझे मौत कि गोदमे सोनेदे‘ नंतर !
निहाल सोडून सगळे मस्तं गायले
निहाल सोडून सगळे मस्तं गायले >>>>>>>> येस्स. तो इतक्या स्लो आवाजात गात होता त्यामुळे शब्दही कळले नाही.
दानिशचं छैय्या छैय्या सुध्दा आवडलं ! >>>>>>>>>>>> +++++११११११११
रेखाच्या एपिसोडमध्ये आशिषच गाण ( रफ्ता रफ्ता) खास नव्हत झाल. त्याच्या गाण्याचा गायिकान्चा विविध भाषेतला कोरस मात्र मस्त झाला.
अशीषने सतरंगी झाल्यावर थांबायला हवं होतं, उत्तम शेवट झाला होता त्या गाण्याचा ‘मुझे मौत कि गोदमे सोनेदे‘ नंतर ! >>>>>>>>> असाच छान शेवट ' सूनध्यान' मधल्या मुन्व्वरने केला होता.
काल दानिश ला दोन गाणी गाऊ
काल दानिश ला दोन गाणी गाऊ दिली. सायली आणि अंजलीला या आधीही एका एपिसोड मधे गाणे दिले नव्हते. पण दुस-या दिवशी त्यांना सुरूवातीला संधी दिली. उरलेल्या वेळात आधीच्या एपिसोडमधे गायलेले सर्वच जण पुन्हा गायले. अशा परिस्थितीत व्होटिंग कसे होत असेल?
आज पवनदीप राजन रूममधूनच लाईव्ह येणार आहे. कोरोनामुळे तो होम क्वारंटाईन आहे.
अंजलीने रेहमानच्या सचिन अ बिलियन ड्रीम मधे गाणे गायले आहे. त्या दोघा बहिणींचा युट्यूब चॅनेल रेहमन फॉलो करतो. तो आशीष कुलकर्णीला सुद्धा फॉलो करतो. रेहमानची गाणी इतके दिवस दानिश साठी राखून ठेवलेली होती बहुतेक. जर रेहमानला बोलावणार होते तर त्याची सगळी सुपर हीट गाणी आधीच कशाला वाया घालवली ! सवाई आणि दानिशने निवडलेलं गाणं काही खास नव्हतं. दानिशचं सतत वरच्या स्केल मधे गाणं आणि आलाप घुसडत राहणं कंटाळवाणं होत चाललंय. काल त्याचा आवाज चांगला लागला मात्र. सवाई प्लेब्लॅकच्या लायकीचा अजिबातच नाही.
मी फक्त रहमान एपिसोड साठी
मी फक्त रहमान एपिसोड साठी सोनी लिव्हचं subscription घेतलं. आणि अरुणिताने lyrics मध्ये माती खाल्ली. मूडचा विचका झालाय. पुढं बघू.
परत तो पहिला कार्यकर्ता. रोजा
परत तो पहिला कार्यकर्ता. रोजा शब्द नीट उच्चारता आलेला नाही त्याला. जमीन मधल्या ज ऐवजी सारखा जल मधला ज उच्चारत होता फुकणीचा
हो. सोनी लिव्ह वर फुकट बघता
हो. सोनी लिव्ह वर फुकट बघता येईल.
अजून रेहमान चा भाग बघायचा आहे..
पण वरच्या पोस्ट वाचून परत प्रश्न पडतोय की.. प्रत्येक जण एकाच टाईप ची गाणी गातात. असं कसं चालेल? म ला तर असं वाटतंय की प्रत्येकाला एक एक चॅलेंज द्यायला हवं गायला..
ते रोजा (जलवाला ज) असच आहे.
ते रोजा (जलवाला ज) असच आहे. बाकी तो निहाल बरच तोंडातल्या तोंडात गातो काय गातो ते शब्द कधीच कळत नाहीत.
इंडीयन आयडॉलची गाणी ऐकताना
इंडीयन आयडॉलची गाणी ऐकताना साऊंड सिस्टीम चालू असते माझ्याकडे. मला अजून शब्द न कळण्याचा प्रॉब्लेम नाही आला. एकदाच वाय फाय गेल्याने मोबाईलवर पाहिला तेव्हां मोबाईलच्या स्पीकरवर वाटलेले तसे.
काल रेहमान ऑड मॅन आऊट दिसत
काल रेहमान ऑड मॅन आऊट दिसत होता सगळ्यांमध्ये सगळे त्याच्या गाण्यांवर नाचत होते आणि तो गप्प. हसूच येत होते.
त्याच्या कमेंट्स शांत संयमित होत्या. ( भरलेला घडा आहे तो.) आणि त्याच्या शेजारी नेहा ( उथळ पाण्याला ....) . असो.
कालचा एपिसोड अर्थात मस्त झाला
कालचा एपिसोड अर्थात मस्त झाला. पण अजून गाणी हवी होती, मेबी एखादा मेडले टाइप परफॉर्मन्स चालला असता. सगळ्यांना संधी दिली नाही गायला.
काल अरुणिता चा परफॉर्मन्स नाही रंगला फारसा. कदाचित नर्व्हस असल्यामुळे असेल. निहाल सो सो. आशिष, दानिश, षण्मुखप्रिया ची गाणी मस्त.
कालच्या एपिसोड बघितल्यावर
कालचा एपिसोड बघितल्यावर रेहमानचा ९९ साँग्ज या चित्रपटाचा साउंडट्रॅक ऐकला. अगदिच मिडियोकर. घरच्याच कार्यात रेहमानने पाट्या टाकलेल्या बघुन वाईट वाटलं. नो वंडर हि गेव अवे धिस आल्बम बिफोर द मुवि इज रिलीज्ड...
सवाई केव्हांच मनातून उतरला
सवाई केव्हांच मनातून उतरला होता. पण आज त्याने कमाल केली.
सायलीचं लैला मै लैला हे तिच्या स्टाईलचं नव्हतं असं म्हणण्यापेक्षा तिने फक्त आशा आणि लता यांची गाणी ती ही रेट्रो काळातली निवडून शिक्का मारून घेतला होता. ऐसा कैसे चलेगा ? देर आये दुरूस्त आये.
पवनदीपला जज्जेस अॅडव्हान्टेज देत असतील. पण तो गायला सुरेख !
दानिशचा कंटाळा येऊ लागलाय. त्याच त्या हरकती गरज नसताना घुसडणे, जिथे जागा नाही तिथेही आवाज टीपेला नेणे इत्यादी अगदी प्रेडीक्टेबल झालाय तो.
अंजलीचं क्लासिकल गाणं म्हणजे अगदी चुम्मेश्वरी परफॉर्मन्स !
लॉक डाऊन मध्ये कुणी बघतय की
लॉक डाऊन मध्ये कुणी बघतय की नाही इंडियन आयडॉल.?
रामनवमी चे दोन्ही भाग पाहिले आज.. मनोज जी नी लिहिलेले आणि निवेदन केलेले रामायण .. छान वाटले ऐकायला.! सर्वांची गाणी छान झाली..परत अरुनिताला जास्त गाणी होती तर अंजली ला एकही सोलो गाणं नाही दिलं.. पवन दीप आणि आशिष मिसिंग होते..पण एकूण रामायण आणि त्यावरील गाणी छान झाली..! जजेस जरा जास्तच कौतूक करत होते सगळ्यांचं.!!
बघतेय ना. आज तीन तासाचा भग
बघतेय ना. आज तीन तासाचा भग आहे.
मनोज मुन्तशीर बोअर करतात खूप म्हणून अपडेट नाही केलं. जयाप्रदाचा एपिसोड त्यापेक्षा छान झाला.
किशोर कुमार एपिसोड छान होईल
किशोर कुमार एपिसोड छान होईल असं वाटत होतं पण तितका नाही झाला चांगला. सगळेच जण अगदी साधारण गायले. तिन्ही जजेसने तर प्रचंड बोअर केले, तो अमित कुमार मनात म्हणत असेल यांना कोणी केलं जज. त्यांच्यापेक्षा स्पर्धक बरे. आणि शंभर गाणी करताना काही गाणी रीपीट काउंट केली असं वाटतं. वर हे आता इंडियन आयडॉल आहे की डेली सोप मालिका तेही कळेना. एलिमिनेशन नाही, काही नवीन चॅलेंजेस नाही. कोणी एक ओळ सुरू करत नाही तेवढ्यात ती नेहा वा वा करते ... आवरा.
अमित कुमार म्हणाले, “किशोर
अमित कुमार म्हणाले, “किशोर कुमार स्पेशल एपिसोड मला आवडला नाही…” ; एपिसोड थांबवा !
https://www.loksatta.com/manoranjan-news/amit-kumar-on-the-indian-idol-1...
अत्यन्त कंटाळवाणा झाला आहे हा
अत्यन्त कंटाळवाणा झाला आहे हा सीझन आता. मी बघायचे सोडले. त्याच त्या कुणीतरी सेलेब्रिटिज ना आणणे, त्यांनी स्क्रिप्टेड कौतुके करणे अन ठराविक लोकांना काले टीके लावणे किंवा होस्ट ने त्यांच्याशी फ्लर्ट करणे. फालतूपणा नुसता.
आता वरची ती लिन्क पाहिली. अमित कुमार च्या कमेन्ट्स वाचून "अगदी अगदी !" असं झालं!
इंडियन आयडॉल दर्जा बेकार आहे.
इंडियन आयडॉल दर्जा बेकार आहे...
गाणी पण recorded असतात... पब्लिक ला चू बनवायचे प्रकार आहेत.. लोक भोळे असतात, फसतात...
बरेच एपिसोड्स मिस केले/काही
बरेच एपिसोड्स मिस केले/काही फॉरवर्ड करत किंवा स्किप करत पाहिले .
पण आजचा भाग छान झाला, सगळे चांगले गायले.
अरुणिताचं ‘तू चन्दा मै चान्दनी’ आणि सायली बरोबर ‘मन क्यूं बहका’ गाणी मस्तं झाली.
अरुणिता-सायली दोघीही कन्सिस्ट्न्ट्ली छान गातायेत, तरी व्होटिंग प्रमाणे टॉप २ पवनदीप आणि सवाई
ह्या कार्यक्रमा ला इतकी
ह्या कार्यक्रमा ला इतकी negative प्रसिध्दी मिळाली आहे की आता पहायची इच्छा च नाही होत.
अरूनिता, सायली ,पवन दीप. हे खरच छान गातात.
पण कार्यक्रमाचा दर्जा खालावला आहे..गायकी पेक्षा इतर गोष्टी वर जास्त फोकस केला जातोय.
आता तर म्हणे सायली आणि निहाल च प्रेम प्रकरण दाखवत आहेत. ! अरे काय हे..?
सरळ सरळ गायकांनी permoance करावे आणि जजेस नी elimination करावे एक एक. ते काही नाही..
इंडियन आयडॉल मध्ये मुलं
इंडियन आयडॉल मध्ये मुलं चांगली गात आहेत. फक्त त्या जजेसना कुठंतरी जंगलात सोडून आलं पाहिजे.
किशोर कुमार एपिसोड मध्ये जजेसनी वाट लावली एपिसोडची.
सेमी फायनल आहे नेक्स्ट week.
सेमी फायनल आहे नेक्स्ट week.
टॉप ६ मधून एक जाणार आणि टॉप 5 राहतील
फायनल १५ ऑगस्ट ला १२ तास चालणार आहे..
थोडा टाईमपास सोडला तर.. कार्यक्रम पुन्हा रंगात आला आहे आता.. कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू चा भाग मस्त झाला..
अरूनिता आणि सायली माझे favroite आहेत..
अपेक्षेप्रमाणे पवन दीप जिंकला
अपेक्षेप्रमाणे पवन दीप जिंकला.. अरूनीता रनर अप ठरली.. न्यूज मुळे कळलं.. sony LIV वर अजून फ्री दिसत नाहीये .. कुणी पाहिला का grand finale .. तब्बल १२तास होता..!!
१.पवनदीप २.अरुणिता ३.सायली
१.पवनदीप २.अरुणिता ३.सायली
नॉट बॅड !
मला उलट्या क्रमाने रिझल्ट जास्तं आवडला असता !
मला अरुणिताच जिंकेल असं वाटत
मला अरुणिताच जिंकेल असं वाटत होतं , सायली टॉप ३ मध्ये असेल हेही वाटलं , पण एका ठराविक लिमीटनंतर पवनदीप नक्कीच फिका होता अरुणितापेक्षा , तोच तो पणा होता , so somehow , तिच्यासाठी वाईट वाटले.
Pages