गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -
वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . आणखी लहान अशी अनेक राजघराणी आहेत ..
मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .
मित्रान्नो,
सूर नवा ध्यास नवाचा तिसरा सिझन सुरु झालाय. सध्या ऑडिशन्स सुरु आहेत.
ह्यावेळेस स्पर्धक ५- ५५ वयोगटातली असतील.
सूत्रसन्चालक - पुष्कर जोग आणि स्पृहा जोशी. जज्स- अवधूत गुप्ते, महेश काळे
सोमवार- बुधवार ९.३० वाजता
कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
बिग बॉस मराठी सिझन २ जिन्कल्याबद्दल शिवचे हार्दिक अभिनन्दन!
गणपती बाप्पा मोरया!!!!

कुठल्याही थ्रिलरचं सगळ्यात महत्वाचं इलेमेंट काय असतं?
रहस्य?
की ते थ्रिलर बघताना पदोपदी बसणारे धक्के, आणि त्यातून मिळणारं थ्रिल?
सेक्रेड गेम्स २ बघताना हाच प्रश्न कायम सतावत राहतो...
सेक्रेड गेम्सच्या पहिला सिजन म्हणजे एक परिपूर्ण थ्रिलर होता. जिथे क्षणाक्षणाला धक्के होते, रोमांचक कथा होती, आपण जी पुराणे वाचलीत, त्यांचा मानवी जीवनाशी संबंध होता, आणि शेवट एक धक्का होता, असा धक्का, ज्याने प्रत्येकाला पुढे काय होणार, याची उत्सुकता लावून ठेवली होती, म्हणून सेक्रेड गेम्स २ च्या शिरावर वाढलेल्या अपेक्षांच प्रचंड ओझं होतं...
हल्ली झी मराठीच्या मालिका पांचट झाल्यात..आमच्या शेजारच्या काकू
"माझ्या नवर्याची बायको" ह्रा मालिकेला इतक्या विटल्या आहेत की, मालिका संपल्यावर पेढे वाटणार आहेत म्हणे...बघू आता कधी पेढा मिळतोय ते ...
असो. एकदा असचं काहीतरी पाहाव म्हणून सोनी मराठी चॅनेल लावलं तर ही मालिका अपघाताने पाहण्यात आली आणि तेव्हापासून मी रोज पाहतोय..
कथा साधी आणि सरळ आहे आणि प्रेरणादायीसुद्धा आहे..
एका कामवाली बाईची वकील होण्याची गोष्ट...
सगळी कथा सांगणार नाही मी पण कथेतले पात्रे छान काम करतात...मला पर्सनली देवयानी आणि अनय हे कॅरक्टर खुप आवडतं...
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

सद्या कलर्स मराठी वरती एक आगळी वेगळी प्रेम कहाणी बघायला मिळत आहे. जवळ जवळ १०० एपिसोड्स झाले आहेत आणि अजूनही धागा निघाला नव्हता म्हणून चर्चा करायला हा धागा-प्रपंच!
लिलावी टी. व्ही . वाहिन्या आणि त्यांच्या मेड इन स्टुडियो बातम्या.
शिवाजी महाराजांच्या काळांत टी.व्ही. न्यूज चॅनेल नव्हते, भडक मसालेदार बातम्या देणारी वृत्तपत्रे नव्हती, ही या देशावर आई भवानी आणि आई जगदंबेची केवढी मोठी कृपा आहे.
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..