उपग्रह वाहिनी - मराठी
Submitted by webmaster on 13 July, 2008 - 23:49
मराठी उपग्रह वाहिन्यांच्या कार्यक्रमांविषयी हितगुज
Marathi TV serials
विषय:
टीव्ही चॅनेल, TV Channel
एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..
मराठी सा रे ग म प लीटल चॅम्प्स.. झी मराठी वर सोम मंगळ रात्री ९.३० ते ११ असते. कालच पहिला भाग सुरू झालाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे
स्टार प्लस वरचं 'जो जीता वोही सुपरस्टार' पाहिलं, चांगलं चालू आहे.. हर्शितला मात्र उगाच चढवून ठेवले आहे.
कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्याच बेटियॉ दिसत होत्या.