Submitted by Yo.Rocks on 12 July, 2008 - 23:13
एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..
बर त्या दिवशी तर प्रदिपने त्याच्या चक्क पाया पडुन कहरच केला.. नि त्या महागुरु ने पण मोठ्या दिमाखाने एखाद्या राजाप्रमाणे त्याला पुर्णपणे पाया पडु दिले.. हे पाहुन विचित्रच वाटले.. भले सचिन वयाने नि अनुभवाने सिनीयर असेल.. पण शेवटी प्रदिपही त्याच काळातला सहकारी.. मग हे पाया पडणे वैगरे अतिच वाटले..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईथे कोणिच
ईथे कोणिच पुढे लिहित नाही आहे का? आज पॅडी गेला बाहेर.
पॅडी जाणं
पॅडी जाणं अपेक्षितच होतं. गेले २-३ परफॉर्मन्स तो अगदीच निष्प्रभ झाला होता. कालचा अनिकेतचा नाच सर्वात जास्त आवडला




आदेश एक दिवस कोणाचा तरी मार खाणारे बहुदा!
सचिन कितीही अ आणि अ बोलत, वागत असला तरी एक गोष्ट मात्र आहे- सगळ्यांना योग्य तो आदर देतो- कोरीयोग्राफर्सना व्यवस्थित वागवतो, कौतुक करतो. हेही खूपच महत्त्वाचं आहे, नाही का
परवाच्या भागात किशोरीचा नवरा पाहिला? तो तर तिच्यापेक्षाही नाटकी वाटला मला!
------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
मला ना
मला ना पाहून पाहून सचिनचं आता काही बाबतीत कौतुकच वाटायला लागलंय.. आय मिन, असं डान्स बद्द्ल इतकं बोलणं, ऍपिअरन्स्,पर्फॉर्मन्स,ई.. गोष्टींवर किती मुद्देसूद बोलतो तो.. हा अता अधे मधे त्याची असंबंध बडबड असते,ती नाही आवडत.. पण तरी इतकं बोलता येणं सुद्धा कला आहे.. नाहीतर दुसरीकडॅ तो बांदेकर.. एकच वाक्य सगळ्यांना म्हणतो!! "नाही म्हणजे, हे कसं काय? कसं शक्य झालं" अरे काय !
मी सचिनच्या जागी असते तर मला, वा, छान नाच वगैरे सोडून काही बोलता आलं असतं की नाही कुणास ठाऊक!
मी कधीही
मी कधीही एकापेक्षा एक चा एपिसोड पहाण्यासाठी चॅनल लावलं की एक तर तो आदेश (वायफळ) बोलत असतो, किंवा महागुरूंचं ज्ञान देणं सुरू असतं. अन्यथा, डान्स् नुकताच आटपलेला असतो.
त्यात जाहीराती इतक्या भरमसाठ असतात की पहाण्याचा सगळा पेशन्सच निघून जातो.
यापुर्वी जे एकापेक्षा एक चं पर्व झालं ते जास्ती चांगलं होतं असं मला वाटतं. 'राणी माझ्या मळ्या...' हे गाणं नुसतं ऐकून कोणिही नाचायला लागेल, पण काल अंकुशने केलेला त्यावरचा नाच अगदी सुमार झाला असं मला वाटतंय. त्यात काही जीव नव्हता.
गेल्या
गेल्या भागात अनिकेत गेला.
अंकुश च्या
अंकुश च्या कालच्या टुकार नाचाचे काय फालतु कौतुक लावले होते सचीनने. बाकी बायकाच आता बर्यापैकी आहेत. अंकुश पेक्षा अनिकेत बरा होता.
अंकुशला
अंकुशला आधी चान्स मिळाला नाही ना, म्हणून! तो आज बाहेर जाईल.. त्या आधी त्याचं बळंच कौतुक नको का करायला? त्याच्या पुढच्या चित्रपटाचा हीरो आहे ना तो!
असो, पण तिन्ही बायका चांगल्या नाचतात. कोणीही जिंकली तरी चालेल..
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
बांदेकरां
बांदेकरांना आवरा!! 'कशाला', 'कसं काय' 'का' असली संतापजनक क ची बाराखडी सतत गिरवल्याबद्दल केकता त्यांना बोलावून का घेत नाही...
बांदेकरां
बांदेकरांना आवरा!! 'कशाला', 'कसं काय' 'का' सोबत त्या महागुरूला पण... अरे कित्ती कित्ती... कालच्या भागात तर नुस्ती पक्वापक्वी... नि डान्स पण कस्ले पकाऊ..
अंकुशला सर्वात जास्ती मार्क म्हणे.. मोठाच जोक.. नि वर शेवटी ठरल्याप्रमाणे आडेवेढे घेत सर्वांना फायनलमध्ये... !!!!! व्वा महागुरु.. तुम्ही थोर आहात..
-::- -::- -::--::--::--::--::--::--::--::--::--::--::-
घुमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गायेंगे, ऍश करेंगे और क्या... Yo !!
-::- -::- -::--::--::--::--::--::--::--::--::--::--::-
व्वा
व्वा महागुरु.. तुम्ही थोर आहात..>>>>>>>>

योग्या हे वाक्य पिवळा पितांबर टाइप झाल रे
.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
या शोच्या
या शोच्या टायट्ल सोंगचे शब्द कोणी सांगेल का ?
शेवट्चे कडवे काय आहे ... *** वाजले **** ?
अरे टायटल
अरे टायटल सोंग वरुन आठवले.
ते एका पेक्शा एक बेबी, अशी हि डान्समस्ति, तर अशी हि डान्समस्ति जे आहे.
ते मला अशी हि नसबन्दि म्हणुन एकायला यायचे.
अखेर
अखेर भार्गवी जिंकली. आजच्या लोकसत्ता मध्ये आले आहे.
मला तर अम्रुता जिंकेल असे वाटत होते.
पण
पण कार्यक्रम तर १७ तारखेला आहे ना???? (ए.भा.प्र.)
हो, आत्ता
हो, आत्ता टीव्हीवर पण दाखवलं भार्गवी जिंकली ते. अमृता जिंकेल असं मलाही वाटलं होतं, पण भार्गवीही तितकीच चांगली आहे
इन फॅक्ट अंकुश सोडला तर तिघीही चांगल्याच होत्या.
काशी, शूटींग आधीच होतं या कार्यक्रमांचं. आपल्याला १७ला दाखवणार आहेत. ते लाईव्ह थोडीच असतं?
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..
भार्गवी
भार्गवी जिंकली का? तिने खरंच चांगली व्हरायटी दिली होती डान्समध्ये.... आणि थोडं इमोशनल बॅकिंग पण मिळालं असेल तिला....
)
निकाल तर आधीच कळला मग जल्लां ते स म स गोळा करताहेत त्याचं काय करणार????
(असे प्रश्न मला का पडतात???
प्रत्येक
प्रत्येक समस मागे ३रु मिळवून पार्टी करणार आणि म्हणणार, 'व्हॉट ऍन आयडीया सरजी!'

--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..
ए ती
ए ती भार्गवी आणि तिची बहिण ह्यांची रडारडी का झाली होती म्हणे?
आणि थोडं इमोशनल बॅकिंग पण मिळालं असेल तिला....>>>>>>>> ह्या वरुन आठवलं सहजच. म्हणजे काही भागपूर्वी तिची बहिण रडली वगैरे होती
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||
संपला का
संपला का हा छळवाद? हुश्श!
(नि:श्वास टाकणारी बाहुली)
कशाबद्दल
कशाबद्दल इमोशनल बॅकींग भार्गवीला?
भार्गवी
भार्गवी जिंकली ??
अमृता जिंकायला हवी होती !
तरी नशीब ती ढोली किशोरी नाही जिंकली
ए ती
ए ती भार्गवी आणि तिची बहिण ह्यांची रडारडी का झाली होती म्हणे?
आणि थोडं इमोशनल बॅकिंग पण मिळालं असेल तिला-----------काय झालं होतं ते सांगा ना कुणी.
मलाही भार्गवी फार आवडली. खुप वेगवेगळे आणि सुंदर performances दिले तिने. छान झालं ती जिंकली.
कालचा तो
कालचा तो ज्युरींचा डान्स खुप छान झाला ना
ते गाणं कुठ्ल्या सिनेमातल आहे ? ' सैंया .. '
कैलास खेर च आहे का ?
****************************
कालचा तो
कालचा तो ज्युरींचा डान्स खुप छान झाला ना
ते गाणं कुठ्ल्या सिनेमातल आहे ? ' सैंया .. '
कैलास खेर च आहे का ?
****************************
अमृताच
अमृताच जिंकायला हवी होती.
केवढी रडली ती..
भार्गवीनी
भार्गवीनी दिली असेल variety पण मला तरी तिचा नाच कधीच graceful वाटला नाही , करायची चांगलं पण एकदम dance बसवल्या सारखा करायची !
अमृता कशी एकदम graceful वाटते, तिचा डान्स, अभिनय जास्त सहज, आणि मना पासून वाट्तो, ती slim असल्यामुळे तिच्या steps जास्त आकर्षक दिसतात !
शिवाय तिचे glamour, looks पण तिचा big X factor आहे !
अर्थात झी च्या मालिकां मधे काम करत असल्यामुळे भार्गवीला फायदा झाला असेल !
दिपांजलील
दिपांजलीला अनुमोदन. भार्गवी ला इमोशनल बॅकिंग मिळालं कारण झी वरच्या मालिकांमधे विशेष पॉझिटिव्ह भुमिका... त्या मानाने अमृता अजून एंट्रीच घेतेय. तरिही तिने बर्यापैकी कॅप्चर केलाय छोटा पडदा. आणि ती भार्गवीपेक्षा कधीही ग्रेसफूल....
इथे तसा काही संबंध नाही, तरिही नमूद करावेसे वाटते. पहील्यांदा अमृताला पडद्यावर पाहीलं ते साडे माडे... मध्ये, आणि ती अज्जिब्बात आवडली नाही. म्हटलं ही फ्लॉप होणार नक्की. मग असाच एकदा 'मुंबई सालसा' नावाचा एक हिंदी सिनेमा पाहीला. तिने त्यात खूप च सहज अभिनय केलाय, मग वाटलं की साडे माडे तिन मुळे तिचं टॅलेंट वाया गेलं
आता ती राम गोपाल वर्माच्या फूंकरी तही चमकतेय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मौत वो अच्छी की जिसके बाद मिल जाए हयात I
जो सबब है मौत का वो जिन्दगी बेकार है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमृता नी
अमृता नी निकाल जाहीर झाल्यानंतर रडारड केली
मी deserving असताना तिला कसं मिळालं....
इमोशनल बॅकिंग मुळे असेल... वगैरे वगैरे...
manjud
(छोटासा पॉज... महागुरु इष्टाईल... :p)
तुमचा संदेश वाचला
आता संपादित केलंत तरी चालेल
किंबहुना मी असं म्हणीन की असं काही असेल तर त्वरित संपादित करा...
अमृताने
अमृताने काय आकांड तांडव केलं म्हणे??
अँकी,
अँकी, 'संपादित करा' असा योग्य शब्दप्रयोग आहे.. तेव्हा, तुझं पोस्ट आधी संपादित कर!
भार्गवी ही झीच्याच 'वहिनीसाहेब'ची हीरॉईन आहे. आणि नाचतेही बरी. त्यामुळे मतांवर फरक पडतो बराच. मात्र अमृताकडे नैसर्गिक टॅलेंट आहे. तिने सिनेमांमधे खूप खूप पुढे जावं अशी मनापासून इच्छा!
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..
Pages