ती फुलराणी
Submitted by अजय चव्हाण on 10 August, 2019 - 16:15
हल्ली झी मराठीच्या मालिका पांचट झाल्यात..आमच्या शेजारच्या काकू
"माझ्या नवर्याची बायको" ह्रा मालिकेला इतक्या विटल्या आहेत की, मालिका संपल्यावर पेढे वाटणार आहेत म्हणे...बघू आता कधी पेढा मिळतोय ते ...
असो. एकदा असचं काहीतरी पाहाव म्हणून सोनी मराठी चॅनेल लावलं तर ही मालिका अपघाताने पाहण्यात आली आणि तेव्हापासून मी रोज पाहतोय..
कथा साधी आणि सरळ आहे आणि प्रेरणादायीसुद्धा आहे..
एका कामवाली बाईची वकील होण्याची गोष्ट...
सगळी कथा सांगणार नाही मी पण कथेतले पात्रे छान काम करतात...मला पर्सनली देवयानी आणि अनय हे कॅरक्टर खुप आवडतं...
विषय:
शब्दखुणा: