स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर टिपिकल सासू-सून सागा केलाय रमा-सासूचा असं वाटतंय. मोठी मोठी ऐतिहासिक नावं कशाला घेतात उगाच, बदनामी होते त्यांची. कथा काल्पनीक आहे असं दाखवायला बंदी आहे का. तिकडे संभाजी मध्ये अनाजी एकदाचा गेला तर आता तो दुसरा बाबा जंजिऱ्यावर जाऊन बसलाय, त्याच्या बाजूला सतत त्याची लादलेली बायको आणि हा संयमाचा महामेरू. युद्ध वगेरे काही नाहीच.

पब्लिसिटी करताना त्यांनी चुलीशी होणार राजकारण अशीच केली आहे,त्यामुळे टिपिकल सासू सून सागा असणारच.
पण पेशवाईच्या निमित्ताने एक प्रश्न आहे,मी जी काही पेशवाईवरची पुस्तके वाचली,त्यापैकी काहीमध्ये दुसरा बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाईंचा दत्तक मुलगा होता असा उल्लेख आहे,पण काहीत तो दत्तक नसून त्यांचाच मुलगा होता असा उल्लेख आहे.
याबद्दल काही माहित आहे का?

कालच पहिला भाग बघितला. सासू पेशविण आहे म्हणून सतत समोरच्याला घालून पाडुन आणि अपमान करणारी दाखवायची काही गरज आहे का? ब्राम्हण त्यात कोकणस्थ म्हणून सतत सगळ्यांना रागवणारी का?

वीणा जगताप नको, ती नाही नीट करु शकणार. राधावाल्यांचीच सिरीयल आहेना, म्हणून लिहीलं. मी नाही बघत सध्या.

अरे हो,विसरलेच.पण बिबॉस मधली वीणा पाहिल्यावर हा रोल द्यायला धजावणार नाही,नाहीतर म्हणेल,सासूबाई,तुम्ही बोलूच नका....।हसणारी बाहुली.

यावर पूर्वी मालिका आणि आताच एक चित्रपट येऊन गेलेत.

सध्या लहान क्यूट मुलगी दाखवून टीआरपी खेचायचा नवा फंडा जोरात आहे.

भयानक वाटली मालिका नुसते प्रोमो बघून. कोणावर सूड उगवायचा असेल तर हि मालिका जबरदस्तीने दाखवावी.
ती लहान मुलगी रमाबाई म्हणून सूट होत नाही. म्हणजे तिचा दोष नाही पण तिचं character annoying वाटतं फार.

मी सिरीयल पाहात नाहीये, बघीन अशी आशा सुद्धा नाहीये,
पण पूर्वी लौकर लग्न होत आणि नहाण येई पर्यंत मुलगी माहेरीच असे,
वरच्या प्रतिसादातून रमाबाई सासरी आहेत असे वाटते.

तसेही रमाबाई च्या आयुष्यावर असणाऱ्या सिरीयल चे नाव " स्वामीनी" ठेवणे हा विनोद आहे.

सध्या फक्त जीव झाला वेडापीसा दोन दिवस बघतेय. बाकी बिग बॉस, मधे शंभर दिवस बघून जरा लांब टीव्ही पासून. अमिताभचा शो बघायचा आहे पण नेटवर बघेन. हिंदी सर्व चॅनेल्स, झी मराठी काढून टाकलंय केबलमधून.

>>मोठी रमा कोण असेल?<< केतकी माटेगांवकर नाही तर प्रिय बापट.... आपल्या कडे लहान हिरवीण मोठी झाली कि ती एक तर माटेगांवकर होते नाही तर बापट होते Lol Lol
बाकी संभाजी आधी जितकी आवडायची त्याच्या दसपट आता बोअर होते. अनेक एपिसोड अनाजी सारख्या माणसावर खर्च केलेत आणि आता जंजिर्यावर. आणि आता हे रमा-माधव कलर्स वर बोअर करणार. ऐश्वर्या नारकर गोपिका बाई कश्या साकारतात हे मात्र बघायला आवडेल.

रमा म्हणजे मृणाल. कुठे ते शालीन व सोज्वळ सौदर्य....ह्या सिरिअलमधे त्या लहान मुलीला माकडचाळे करायला लावलेत आणि पेशव्यांचे नाव घेऊन सासू-सून ड्रामा करत आहेत. मनःपूर्वक निषेध. जसं पुलंना कोणी सोम्यागोम्यानं हात लावलेला चालत नाही तसंच स्वामी म्हणजे रणजित देसाईंची स्वामी. मूळ कथेला धक्का लावलेला नसल्यामुळे मृणाल व रविंद्र मंकणीनं ती कॅरॅक्टर्स ताकदीनं उभी केली.

असो, मी ही सिरीअल मुळीच पहाणार नाही.

मेधावि, अगदीच सहमत .

ऐश्वर्या नारकर किती वेगळी दिसते ह्यात ? रमा पण नाही आवडली.

स्वामी च होतं नाव सिरियलच

दूरदर्शनच्या जमान्यातली आहे. काही भाग आहेत यू ट्युब वर.

माझे मन तुझे झाले , तुझे मन माझे झाले . हे गोड गाणं ही ह्या सिरीयल मधलंच

रमा म्हणजे मृणाल >> +१११ ह्यात ते गाणे आहे ना "माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले". (हे गाणे विभावरी आपटेने सा रे गा मा मध्ये गायले होते).

स्वामीचे थोडे चित्रीकरण चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यात झाले होते आणि ते पाहिले होते तेंव्हा .. फार भारी वाटले होते Happy

मुळात माधव रावांचं लग्न ठरलेलं दाखवलय,पत्रिका देवापुढे ठेवायला आली आहेत मंडळी , म्हण्जे ह्यांना संभाव्य नवरी महितीच असली पाहिजे नाही का? आणि ती रमा नाहीये? तर मग कोणाशी ठरलं होतं मधवराव पेशव्यांचं लग्न?? आणि नंतर रमाशी झालं !!!!

रमा म्हणजे मृणाल. कुठे ते शालीन व सोज्वळ सौदर्य....ह्या सिरिअलमधे त्या लहान मुलीला माकडचाळे करायला लावलेत आणि पेशव्यांचे नाव घेऊन सासू-सून ड्रामा करत आहेत. मनःपूर्वक निषेध. जसं पुलंना कोणी सोम्यागोम्यानं हात लावलेला चालत नाही तसंच स्वामी म्हणजे रणजित देसाईंची स्वामी. मूळ कथेला धक्का लावलेला नसल्यामुळे मृणाल व रविंद्र मंकणीनं ती कॅरॅक्टर्स ताकदीनं उभी केली.

अगदी पटल. ही सिरीयल पुर्ण बघायला कुठे मिळेल?

वूटवर बघते मी ही मालिका. पण आनंदीबाई कशा नाही दाखवल्या अजून.ही जानकीबाई कोण? मी खूप लिंक पाहिल्या ,पण हे नाव कुठेच नाही दिसल.

ह्यात नारकरताई totally व्हिलन दाखवल्यात काय, दुसरी सिरीयल बघताना प्रोमोज बघते तेव्हा सासू सून सिरीयल वाटते आणि सासुबाई नुसत्या खुन्नस लुक, अति व्हिलन वाटतात. ह्यांना प्रोमोज पण दुसरे दाखवता येत नाही.

Pages