स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ध चा मा करण्याचा कागदोपत्री पुरावा माझ्या मते अजून तरी उपलब्ध नाहीये. अर्थात सत्तेसाठी महत्त्वाकांक्षी असल्याने आनंदीबाईंनी असे केल्याचा संशय असू शकतो.

आनंदी बाईच्या वडिलांकडे लग्नाचा विषय काढला जातो त्या वेळेस तिचे वडिल पहिले माधवरावांचे नाव घेतात दुसरा विवाह करणार का असे विचारतात. ईथे मला थोडे विचित्र वाटले. आनंदी बाई या वयाने मोठ्या वाटत आहेत. जानकीबाईच्याच वयाच्या वाट्तात साधारण. माधवराव नक्कीच त्या पेक्षा लहान वाट्तात. मग त्या काळी नवर्‍याच्या वयापेक्षा मोठी बायको केली जायची का......... जर तिचे वय लहान असेल तर भुमिका करणारी मुलगी लहान वयाची मला तरी दिसत नाही.
माधवरावांचे नाव ऐकून आनंदी खुष झालेली दाखवली.
नंतर दादासाहेबांचे लग्न करायचे आहे हे कळल्यावर पण त्यांच्याशी लग्न करायची तयारी पण दिसली तिची. म्हण्जेच ती दाखवलि तशी साधी नाही. पेशव्यांच्या घरात जाण्यासाठी तीची कोणासोबतहि लग्न करायची तयारी दिसत आहे.
तसेच जानकी बाईच्या मृत्यु नंतर कसलेच विधी दाखवले गेले नाहीत. लगेचच पंधरादिवस होऊन गेल्याचे दाखवले. काही गोष्टी दाखवायला हव्यात पण त्या टाळल्या जात आहेत असे वाटते.

. पेशव्यांच्या घरात जाण्यासाठी तीची कोणासोबतहि लग्न करायची तयारी दिसत आहे.
तसेच जानकी बाईच्या मृत्यु नंतर कसलेच विधी दाखवले गेले नाहीत. लगेचच पंधरादिवस होऊन गेल्याचे दाखवले. काही गोष्टी दाखवायला हव्यात पण त्या टाळल्या जात आहेत असे वाटते.>>>>+१११११

टाळल्या जात आहेत म्हणजे नक्की काय. मी फक्त स्वामी वाचलं आहे खूप वर्षांपूर्वी, आता काहीच आठवत नाही. नारायण आणि काका मला वाचवा हे नक्की काय होते. काकांनी मारलं का त्याला आणि ध चा मा काय होतं. कुणीतरी सांगा प्लीज.

असे म्हणतात की राघोबादादा यांनी गारद्यांना "नारायणरावास 'धरावे' असा आदेश दिला होता पण कुणीतरी ध खोडून मा असे लिहिले.

आनंदी बाईच्या वडिलांकडे लग्नाचा विषय काढला जातो त्या वेळेस तिचे वडिल पहिले माधवरावांचे नाव घेतात दुसरा विवाह करणार का असे विचारतात. ईथे मला थोडे विचित्र वाटले. आनंदी बाई या वयाने मोठ्या वाटत आहेत. जानकीबाईच्याच वयाच्या वाट्तात साधारण.>>>>>>>+++11111 हेच मनात आलं होतं.

रमा बाईंचा role play करतेय overacting नाही वाटत का??
Like इतका mature बोलते Then suddenly लहान होते .>>>>+1000000 म्हणून मला ती अजिबात आवडत नाही. मी तिचे सीन avoid करून बघते voot वर

तिने म्हणे गोपिकाबाईंचे पाय धुवून ते पाणी पिले. ईईई.>>>>+1112211खरंच तो चरणामृत सीन अगदी यक्क होता

कालचा भाग पूर्ण बघितला.(आणि मी पश्चात्ताप पावले)रमाबाईंना अगदी देव असल्यासारखे प्रसंग दाखवतात. काय तर म्हणे ते फुलपाखरू तिच्याशी बोलते.मला अजिबात खरं वाटत नाही. आता असं दाखवतायत की नारायणराव पेशवे(आत्ता तान्हे असलेले)आनंदीबाईंचे नाव घेतले की रडायला लागतात आणि रमाबाईंनी मांडीवर घेतले की शांत होतात. मग गोपिकाबाईंंनी घेतले की पुन्हा रडतात आणि परत रमाबाईंनी मांडीवर घेतले की शांत झाले आणि झोपले पण.असे काल दाखवले.रमा character overrated आहे असे सारखे वाटत रहाते.
ती रमा झालेली actress किती किंचाळते.आई आई म्हणून. आई वडील आले नाही म्हणून हिला लगेच ताप येतो.परत निघाली नाचरी गराड्याला.जर प्रगल्भता म्हणून नाही.त्या मांडीवर घेण्याच्या काळात हिच्या पायाला मुंग्या आल्या. कर्कश किंचाळणे सुरू. आणि तिचे एकदंर बोलणे चालणे उद्धटपणाचे आहे. मला गोपिकाबाईंचा तिच्यावरचा राग,मनस्ताप स्वाभाविक वाटतो आहे.
असे मला एकटीलाच वाटते की काय?

रच्याकने काल पार्वतीबाईंनी अंगावरचे सगळे दागिने आनंदीबाईंना देऊन टाकले. या स्त्रिया भाजीपाल्याची देवाणघेवाण करावी अशा थाटात दागिन्यांची देवाणघेवाण करत असतात. यानिमित्ताने एक प्रश्न आहे, की हे दागिने जर त्या स्त्रियांनी माहेरून आणलेले असतील तर ठीक पण सरकारी खजिन्यातून जर ते असे खर्च करत असतील तर हा सरळसरळ भ्रष्टाचार आहे हेमावैम. जाणकारांनी प्रकाश टाका पेशवे म्हणजे देव नव्हेत,छत्रपतींचे पंतप्रधान, पण इकडे असा आव असतो जगाचे मालक असल्यासारखा.
सुरूवातीला गोपिकाबाईंनी शालूशेले जाळून घेतले होते. किती तो माज.खरे पेशवे खरेच असे होते का?

कनिका, अर्थातच मालिकेत अतिरंजित प्रकार दाखवतात. मग ही मालिका असो वा आणखी कुठली ऐतिहासिक.. कृपया ते पूर्णसत्य मानू नये.

कनिका, अर्थातच मालिकेत अतिरंजित प्रकार दाखवतात. मग ही मालिका असो वा आणखी कुठली ऐतिहासिक.. कृपया ते पूर्णसत्य मानू नये.+++++10000 पूर्णसत्य नाहीच.सगळीच सिनेमेटिक लिबर्टी आहे. यातून चुकीचे संदेश जातात. यात movies पण आघाडीवर आहेत

गेले दोन भागात गोपिकाबाईच्या गळ्यात जो हार दिसतो आहे तो जानकी बाईचा वाटतो आहे. जे दागिने त्यांनी रमाबाईसाठी ठेवलेले असतात त्यातला.
रच्याकने काल पार्वतीबाईंनी अंगावरचे सगळे दागिने आनंदीबाईंना देऊन टाकले. या स्त्रिया भाजीपाल्याची देवाणघेवाण करावी अशा थाटात दागिन्यांची देवाणघेवाण करत असतात. होना........
तसेच गोपिकाबाई जेव्हा वधुपरिक्षेसाठी येतात तेव्हा आनंदी ही केसांचा सैल आंबाडा घालून बसलेली दाखवली आहे. माझ्या ऐकिव माहीती नुसार त्याकाळी स्त्रिया खोपा घालत असत अथवा घट्ट आंबाडा घालत असत. मोकळे केस केवळ आपल्या दालनात असताना अथवा एकांतात असतानाच सोडत असत. कोणाही समोर मोकळे अर्धवट बांधलेले केस घेऊन जाण्याची परवानगी नसायची. मग ईथे तर वधू परिक्षाच होती. गोपिकाबाई सुध्धा बर्‍याच वेळा सैल आंबाड्यातच असतात.

.रमा character overrated आहे असे सारखे वाटत रहाते.》》》+111111
फारच आगाऊ दाखवली आहे. त्याकाळी मोठ्यांसमोर मी जाते माहेरी असे म्हणण्याची हिम्मत कुणी केली असेल.. Lol
तसेच आनंदीबाई लग्न होऊन आल्या तेंव्हा ८ वर्षाच्या होत्या असे वाचलेले आठवतेय.. शिवाय नानासाहेबांनीही फतवा काढलेला की मुलीचे ९ वर्षे वयाच्या आत लग्न व्हावे.. हि सिरियल आता सिनेमॅटीकच होऊ राहिलेली आहे.
माधवरावांचा स्वभाव अतिशय कोपिष्ट होता.. पण यात तर फारच समजूतदार दाखवला आहे.. असो सध्याच्या काळाशी ताळमेळ घालण्याचा प्रयत्न व टिआरपी साठी अतिरंतित प्रसंग अशी ओढाताण वाटते आहे..

रमा character overrated आहे असे सारखे वाटत रहाते.++++++1111+++++ अगदीच.सुरुवातीला तर तिला वेडावून दाखवतानाही दाखवले आहे.आणि जेव्हा ती'रमेला नाही आवडल'.अस म्हणते तेव्हा तर जाम डोक्यात जाते.एकतर त्या काळी मुलींना एवढ स्वातंत्र्य दिल जात नसे.हे म्हणजे आताच्या काळासारख वाटत आहे.
त्या रमेलाच आनंदीबाई दाखवायला हव आणि आनंदीला रमा.

ती रमा सहन करण्याच्या पलीकडे आहे. जनरली लहान मुलं गोडच वाटतात पण ही अपवाद आहे.

बोलू नये पण तिचं रूप , तिचे हावभाव, अभिनय, तिचे संवाद काही ही आवडत नाहीये

खर तर की मालिकाच बाळबोध आणि कल्पना दरिद्री आहे.

ते वाक्याच्या शेवटचं हो आणि वाक्याच्या सुरवातीच परंतु डोक्यात जातं.

तसेच गोपिकाबाई जेव्हा वधुपरिक्षेसाठी येतात तेव्हा आनंदी ही केसांचा सैल आंबाडा घालून बसलेली दाखवली आहे. माझ्या ऐकिव माहीती नुसार त्याकाळी स्त्रिया खोपा घालत असत अथवा घट्ट आंबाडा घालत असत. मोकळे केस केवळ आपल्या दालनात असताना अथवा एकांतात असतानाच सोडत असत. कोणाही समोर मोकळे अर्धवट बांधलेले केस घेऊन जाण्याची परवानगी नसायची. मग ईथे तर वधू परिक्षाच होती. गोपिकाबाई सुध्धा बर्‍याच वेळा सैल आंबाड्यातच असतात.++++१११११२
मला सुद्धा खटकतं हे.

फारच आगाऊ दाखवली आहे. त्याकाळी मोठ्यांसमोर मी जाते माहेरी असे म्हणण्याची हिम्मत कुणी केली असेल..~~~~सगळंच खोटं वाटतं ते.गोपिकाबाईंचा स्वर अगदी काशीबाई आणि अनुबाईंशी बोलताना पण चढा आणि उर्मटपणाचा असतो.
मुलीचे ९ वर्षे वयाच्या आत लग्न व्हावे.. ++त्या काळातील रीत हीच होती. अगदी(तुलनेने)अलीकडच्या काळातील रमा -माधवराव रानडे यांच्या विवाहातसुद्धा रमा 11 वर्षांंची म्हणजे खूप मोठी नवरी असे त्या शिरेलीत म्हटले गेले. या आनंदीबाई 17+ च्या वाटतायत
जेव्हा ती'रमेला नाही आवडल'.अस म्हणते तेव्हा तर जाम डोक्यात जाते.एकतर त्या काळी मुलींना एवढ स्वातंत्र्य दिल जात नसे.हे म्हणजे आताच्या काळासारख वाटत आहे.
त्या रमेलाच आनंदीबाई दाखवायला हव आणि आनंदीला रमा.
+अगदी हेच मनात आलं होतं.ते स्वतःला रमा रमा म्हणणे सहन करण्यापलीकडे आहे. डोक्यात तिडीक जाते.

जनरली लहान मुलं गोडच वाटतात पण ही अपवाद आहे.

बोलू नये पण तिचं रूप , तिचे हावभाव, अभिनय, तिचे संवाद काही ही आवडत नाहीये++++बालसुलभ निरागसता औषधाला नाही.अनेकांना (तूनळीवर) ती गोड कशी वाटू शकते हे न उलगडलेलं कोडं आहे

कनिका तुमच्या सगळ्या ना अनुमोदन. मेन स्वामिनी म्हणजे रमाच character फारच आगऊ आणि irritating आहे. बालसुलभ्ही वाटत नाही तिचे वागणे.

स्वामिनी म्हणजे रमाच character फारच आगऊ आणि irritating आहे. बालसुलभ्ही वाटत नाही तिचे वागणे.++तेच तर.त्यामुळे 8:30च्या slot मध्ये ना झी मराठी बघवत,ना कलर्स आणि दयाभाभी नाही म्हणून जेठालालची सिरीयल पण बघवत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

मालिका सुरु होऊन बरेच महिने झाले पण आपले शूरवीर केवळ युद्धाच्या आखण्या करतानाच दाखवले, तर कधी नुसतेच संवादांन मधून मोहीमेवर गेले असे सांगितले गेले. प्रत्यक्ष रणांगण अथवा अतितटीची लढाई अजून तरी दाखवली गेली नाही. त्या दिवसांत खरच कुठलीही लढाई झाली नाही का......... मला आता शनिवार वाड्यावरील नाही ....नाही..... वाद्याच्या आतील दृष्य पहायचा कंटाळा आलाय.
मालिका बघण्यापेक्षा पूर्वी खेळ खेळायचो चित्रातील चुका शोधा तसे झालेय माझे, कुठे चुका दिसतायत या कडेच लक्ष जाते आणि मी चुका शोधण्यात जिंकते असे निदान मला तरी वाटते.
निदान कोणीतरी तलवारीला धार लावताना आथवा तालीमीत सराव करताना तरी दाखवा.......

निदान कोणीतरी तलवारीला धार लावताना आथवा तालीमीत सराव करताना तरी दाखवा.......>>:)
माझा मुलगा मला विचारतं होता की ह्यात पानिपतची लढाई कधी दाखवणार.
इकडे तर तू म्हणल्याप्रमाणे जर का साधी तलवारही दाखवली नसेल तर पानिपतची लढाई काय दाखवणार??

बहुतेक कोणतीही लढाई/युद्ध दिसणार नाही. घरगुती तंटेच दाखवणार आहेत.नारकर बाईंनी सुरुवातीलाच मुलाखतीत सांगितले आहे किचन पॉलिटिक्स दाखवणार आहोत म्हणून. पेशवेकालीन घडामोडी दाखवण्याचे नाटक आहे बाकी रमाबाईंच्या पालकांचे साधेपण अधोरेखित करणे, काकाकाकूंचे वाईटपण,रमा माधवांची प्रेमकथा(काय ती मोत्यांची माळ देणे,गुलाबाचे फूल इ.इ.)आणि आता अभिजीत हिरो म्हणून बबड्या व्हिलन या धर्तीवर आता लक्ष्मीबाई(राधिकाबाई?)यांना व्हिलन केले होते कालच्या भागात. मी पाहिले नाही पण प्रीकैप पाहिला आणि voot वर वाचले तेव्हा कळले. तेव्हा मी ठरवले आहे आता अजिबात डोळ्यासमोर येऊ देणार नाही ही सिरीयल.आणि रमाच्या आईचे सुगरणपण दाखवून देणे हाही एक उद्देश आहे(आठवा:पाच प्रकारच्या चटण्या).मात्र मला यांच्या अनेक साड्या आणि दागिने आवडतात

आणि रमाच्या आईचे सुगरणपण दाखवून देणे हाही एक उद्देश आहे(आठवा:पाच प्रकारच्या चटण्या).मात्र मला यांच्या अनेक साड्या आणि दागिने आवडतात>>>>>> Lol हो ते वेगवेगळे पदार्थ करून बघावे वाटतात, एक धागा निघू शकेल स्वमिनीमधल्या पाकृंची

Pages