स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमेचे काका काकू भामटे आणि हावरे दाखवले आहेत Uhoh त्यातही काका काकू एकाच वृत्तीचे आणि रमेचे आई वडील साधे, सज्जन, सालस वगैरे. दोघे वाईट किंवा दोघे चांगले असं सहसा बघितलं नाहीये, एक वाईट तर एक जोडीदार चांगला, असंच बघितलं आहे.

रमेची आई अजूनही त्याच रानड्यांच्या रमेची आई वाटत आहे.
चांगला विषय पण फॅमिली ड्रामा रूप देऊन वाट लावताहेत.

आता मेकअपमुळे सगळ्या बायका छान दिसतात मालिकेतल्या, पण तेव्हा लिपस्टिक, आयशॅडो हे काहीच नव्हते, तेव्हा कशा दिसत असतील. दिवसभर एवढ्या भरजरी साड्या आणि दागिने घालून बसायचं, इकडची स्वारी वगैरे भारी बोलायचं, सणवार, प्रथा, नैवेद्य सगळं साग्रसंगीत पाळायचं, पाटा वरवंटा वापरून स्वयंपाक करायचा म्हणजे मालक आणि नोकर सगळेच थकून जात असणार. उगीच नाही हजार लोक राहायचे म्हणे शनिवार वाड्यावर.

प्रोमोमध्ये रोहिणी हटंगडीना पाहिल.त्या अनुबाईंच काम करणार्या भावेंना रिप्लेस केल आहे कि नवीन कँरँक्टर आहे? >>>>>>> आनन्दीबाई तर नाही ना झाल्या? Uhoh

प्रोमोमध्ये रोहिणी हटंगडीना पाहिल.त्या अनुबाईंच काम करणार्या भावेंना रिप्लेस केल आहे कि नवीन कँरँक्टर आहे? >> नाही, त्या काशीबाई म्हणजेच नानासाहेबांच्या मातोश्री दाखवल्या आहेत.
@प्राचीन - रानड्यांच्या रमेची आई कविता मेढेकर होती आणि ही सासू दाखवली होती.

हो ना सान्वी.. विसरलेच. ती सासू असूनही फारच मायाळू दाखवली होती ना. त्यामुळे मिश्टेक झाली.. स्वामिनी चं पार्श्वसंगीतही काही वेळा उंमाझोका सारख्याच धाटणीचे वाटते. जान्हवी प्रभू अरोरा हिनेच गायले आहे का..

रमाबाईंचं माहेरचं आडनाव पटवर्धन होतं असं ऐकलंय.. ईथे जोशी दाखवलं आहे... >>> नाही, जोशीच होतं असं वाटतंय.

पार्श्वसंगीत काय किंवा काही दुसरं काय पण प्रत्येक वेळेला उंच माझा झोका ची आठवण होतेच. आणि सोबत हेही जाणवतं की ती सिरीयल किती नैसर्गिक वाटायची आणि इकडे सगळंच बटबटीत. रमा खूप उद्धट दाखवलीये. सोळाव्या शतकातल्या मुली इतक्या उद्धट असतील असं वाटत नाही.

काल बऱ्याच दिवसांनी एक मधलाच कोणता तरी रिपीट एपिसोड पाहिला. कधी नव्हे ते गोपिकाबाईंच्या डोळ्यांत अश्रू तरळले.. तेही रमाच्या प्रश्नामुळे. ऐश्वर्या नारकर निदान एकदा तरी दिसली. नाहीतर गोपिकाबाईंची भूमिका साकारताना तिच्या मूळच्या शैलीचं दर्शन घडत नाही.
गोपिकाबाईंच्या कठोर वागण्याची कारणमीमांसा सुद्धा तिच्याच तोंडून दाखवली.

पानिपतचा ट्रेलर पूर्ण नाही बघितलाय. पदमिनी कोल्हापुरे गोपिकाबाई झाली आहे अस वाचलय लोकसत्तामध्ये.

बायकांची लहान वयात होणारी लग्न बघता माधवच्या लग्नाच्या वेळी गोपिकाबाई जास्तीत जास्त तिशीच्या असतिल आणि माधव तेव्हा आठ वर्षाचा होता. ऐश्वर्या नारकर सहज चाळीसच्या पुढे असेल. तो मालिकेतला माधवही आठ नाही पण सोळा वर्षाचा वाटतो.

क्लिप मधे रमाबाई कपडे बदलून लगोरी खेळताना दाखवली आहे. पेशव्यांच्या सुना देवदर्शनाला गेल्यावर अस काही करत असतील Uhoh

ऐश्वर्या नारकर सहज चाळीसच्या पुढे असेल >>> मला जन्मसाल पण ठाऊक आहे, आमच्या शाळेतली, बहीणीची बॅचमेट आणि आमच्या एरीयातली होती. पण सांगणार नाही, ते योग्य नाही वाटत. चाळीस ते पंचेचाळीस याच्या मधली आहे एवढंच सांगेन.

काल सहजच ह्या सिरीयलीचा प्रोमो दिसला.
ऐश्वर्या नारकरला काय नटवलीये अशी??? गळ्याला घट्ट चोकर. सगळेच्या सगळे दागिने. उंच अंबाडा त्यावर आणि काय दागिना खोचलाय.
पेशवीण बाई आजिबात वाटत नाहीये ती. रमोला सिकंदची गावची बहिण वाटतेय Happy

एवढे दागिने घालत असतील का रोज. त्यात पैठणीवर शालू. किती गरम होत असेल. त्यावेळी एसी, फॅन वगैरे नव्हते. स्वयंपाकघरातही तोच अवतार.
अंजु विषय तो नाही पण ऐश्वर्या या रोलसाठी खूप म्हातारी दिसते. इंटरनेटवर सगळ्यांची वयं दिलेली असतात पण ऐश्वर्या डाएट पण खूप करते म्हणून त्या सुरकुत्या.

एवढे दागिने घालत असतील का रोज. त्यात पैठणीवर शालू. किती गरम होत असेल. त्यावेळी एसी, फॅन वगैरे नव्हते. स्वयंपाकघरातही तोच अवतार.>>>>>>>>> खरंच. सदानकदा एवढे दागिने घालुन कुणीही स्त्री रहात नसेल.

त्या काळच्या पुण्यात ऐन नदीकाठावर खूपच थंडी असणार.!सगळ्याच बायका शाली पांघरून असतात. रीतीरिवाजसुद्धा भौगोलिक परिस्थितीनुरूप बनत असणार.

एका एपिसोडमध्ये ऐश्वर्या नारकरला मोकळे सोडून बसलेली बघितल. तिचे ते खरे केस आहेत. लाम्बसडक आहेत. या सुखान्नो या पासून बघतेय.

खरंच. सदानकदा एवढे दागिने घालुन कुणीही स्त्री रहात नसेल. >>>>>>>> म्हणूनच रमाला कपडे बदलल्यावर हाशहुश्श झाल्यासारख वाटत असेल. तिला नसेल पेशवाईची सवय. त्यात तिच लहान वय.

चंपा आलं लक्षात.

सुलु तिचे केस खरंच लांब आहेत, ती सुंदरही आहे पण तिची आई अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे, अर्थात मी त्यांना आता खूप वर्ष बघितले नाही.

ते फुलपाखरू रमाने पाळलेले असते ते खरेच तसे होते का. रमाच्या आई वडिलांना घालवून देतात का, मधले भाग बघितले नाहीत मी. कुठे सापडतात ते. काका काकू तिथेच राहतात का, नोकरीवर ठेवतात वाटते पेशवे. माधव अगदी चम्या दिसतो.

ती सुंदरही आहे पण तिची आई अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे,>> अन्जूला अनुमोदन. हे मी देखील ऐकलं आहे.

मेजवानी किंवा तत्सम कार्यक्रमात बऱ्याच नायिकांच्या आया येऊन गेल्या आहेत पण ऐश्वर्याच्या आईला कधी बघितलं नाही.

मालीकेला रंजक बनवायच्या नादात पात्रांची ऐतिहासिकता हरवून जाते. ऐश्वर्या खरचं यात म्हातारी वाटत आहे. मध्यंतरी म्हणजे रमा माधव यांचे लग्न सोहळा चालु असताना तर रमेची बहिण गंगा कुठेच दाखवली गेली नाही आणि काही दिवसांपुर्वी ही गंगा बदलेली नविन आलि आहे असे कळाले. बाकी मला पार्वतीबाई हे पात्र फार आवडते.
मालिका रंजक करण्याच्या नादात ऐतिहासिकता हरवायला नको म्हणजे झाले.

मी ही मालिका पाहत नाही पण त्याचा ट्रेलर पहिला रमा तिच्या आजेसासुला रोहिणी हट्टंगडी यांना विचारत असते तुम्ही फक्त लाल रंग का वापरता
त्या काळात लहान वयापासून मुलींना सासरी कसे वागावे याचे धडे मिळत असतं त्यातून प्रत्येक घरी बालविधवा असतच असे असताना रमेचा असला प्रश्न म्हणजे निष्पाप दाखवायचा केलेला मूर्खपणा आहे.

Pages