स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ते वेगवेगळे पदार्थ करून बघावे वाटतात, एक धागा निघू शकेल स्वमिनीमधल्या पाकृंची>>>>पण ते पदार्थ खरेच आताच्या काळात कोणी करत असेल असे वाटत नाही. मग क्रमवार पाकृ मिळणार कशा?पण खरेच कोणाला माहिती असेल तर धागा काढा त्या ग्रूपमध्ये

मागे मोगऱ्याच्या कळ्या घातलेलं सरबत पण होतं, आणि अजून काही चटण्या ऐकल्याचं आठवतय हो

उकडलेल्या शेंगदाण्याचे काहीतरी केलं होता.. रामाच्या आईने रेसिपि सांगितली होती श्रीमंत पेशवे आणि पेशविन बाईंना. आता लक्षात नाही माझ्या..

पेशव्यांकड पेशव्यांकड्ची सर्व मंडळि बहुदा अजुन तरी एकत्र भोजन करताना दाखवली नाहीत. ईतके पदार्थ केले जातात रोज पण खाताना काही दाखवत नाही. एक दोन वेळा पेशविण्बाई आणि पेशवे थोड्फा खाताना दाखवले. नाहीतर नुसतेच त्या चांदिच्या वाटणार्‍या वाटीतून आजारी माणसाला काहीतरी भरवले जाते. किंवा दालनातच खायला पाठवले जाते.
रमेच्या घरी दिसत जेवण करताना बर्‍याचदा.
बाकी पाकृ मात्र खरच करून बघायला हव्यात ते भाग शोधावे लागतिल ज्यात रमेच्या आईने पाचही चटण्या कशा करायच्या ते सांगितले आहे.

कलर्सवाले इकडचे उखाणे तिकडे फिरवतात वाटतं...
आज आनंदी बाईंनी गृहप्रवेशाच्या वेळेस घेतलेला उखाणा परवा मन बावरे मध्ये अनुने घेतला होता की!!

खीर करायला सांगितली होती त्याचं काय झालं. त्या बाईंना खीर नाही जमली का. त्या बाईंनी रमेच्या हाताला काय केलं. विश्वासरावांची बायको असते ती. ऑफिसच्या पॅन्ट्री मध्ये ओझरता बघितला भाग. त्याकाळी मोठया भावाला दादा म्हणत असतील का, माधवराव म्हणतात तसे.

आत्ता प्रोमो बघितला

आनंदीबाई कडे बाळ नारायण रडतो तर ती रमा आनंदी बाईंना त्यांच्या तोंडावरच सांगते अप्रिय गोष्टींची चाहूल बाळांना आधीच लागते ,द्या त्याला माझ्याकडे.

सासूला हे सांगण्याची ते सुदधा बाकीच्या बायका तिथे हजर असताना . काय ही आगाऊगिरी ! कोण लिहीतय हिचे संवाद. त्याची धन्य आहे.

हो मीपण तो प्रोमो बघितला हेमाताई, काहीही पुढचं गृहीत धरुन डायलॉग्ज दिलेत. इतकी आगाऊ रमा तरी नव्हती बहुतेक. एकदंरीत त्यावेळेच्या वातावरणात कोणीही लहान मुली किंवा मुलं इतकी आगाऊ असतील असं वाटत नाही.

रमामाधव मुवीतली रमा किती निरागस दाखवली होती. स्वामिनीतली रमा बघताना मनात नकळत कंपेरिजन होत आणि पदरी निराशाच पडते..
पेशव्यांचा काळ फक्त नावाला दाखवलाय. त्यावेळच्या लढाया, तालिम
भरमसाठ दाखवता येण्यासारख असुनदेखिल खर्च फक्त मेकप ,दागिने, सेट आणि कपड्यावरच केलाय.
बाकिच्या सिरिअल्ससारखीच कौटुंबिक भेळ दाखवलीये. फक्त ह्या भेळीला पेशवेकालीन(?) फरसाण वापरलय इतकच.

लढाया दाखवणे परवडत नाही पण वाड्याच्या दरवाजाचेपण मागे चित्र दाखवतात. कौटुंबिक दाखवायचं तर योग्य वयाचे कलाकार आणि अतिरंजित न करताही दाखवता आलंच असतं. हा कल्पना विस्तार आहे, इतिहासाशी काहीही संबंध नाही हे डिस्क्लेमर टाकतात का सुरुवातीला.

हुशार आणि निर्भिड ज्यांनी सापाला त्याच्या बिळात मशाल घालुन मारले, अश्या आनंदीबाई दादासाहेब खोलित आल्यावर एखादा परका माणुस आल्यासारख्या ओरडत होत्या असे वाटले.

हुशार आणि निर्भिड ज्यांनी सापाला त्याच्या बिळात मशाल घालुन मारले, अश्या आनंदीबाई दादासाहेब खोलित आल्यावर एखादा परका माणुस आल्यासारख्या ओरडत होत्या असे वाटले.++११११११

अगदी अगदी. शाही हार घालायला मिळेल एवढीच माहिती होती का आनंदीबाईना लग्न करताना. :हाहाहा: चुकून दीर खोलीत आलाय अशा ओरडत होत्या आनंदीबाई किंवा रमेच्या वयाच्या असल्यासारख्या. ती रमा तर मला व्हिलनच वाटते. लक्ष्मीबाईंना तोंडावर पाडलं त्या शाही हाराबाबतीत. सगळयांची भांडणं लावून रमा एक दिवस राज्य करणार असे वाटते. बाळ रात्री रडलं तरी रमेलाच बोलावणार Uhoh कसले पांचट लोक आहेत, पोरं जन्माला घालायची स्वतः आणि थोपटायला दुसऱ्याला बोलवायचं. ती रमा रागाने त्या बाळाला काही करेल असे वाटले मला, खुनशी वाटते ती.
रमेचे आईवडील परत का आले वाड्यावर. आले तर आले, जमिनीवर का झोपतात ते. अद्ययावत गेस्ट रूम नव्हत्या का पेशव्यांकडे, की सगळ्या संपत्तीचा उपभोग तेच घेणार. व्याह्यासाठी पलंग नाही का करून घेता येत.
रच्याकने, दादासाहेब जर सावरले नाहीत अजून तर दुसऱ्या लग्नाची काय घाई होती सगळ्यांना.

शिश शिव शिव! काही ताळतंत्रच राहिलेलं नाहीये. होऽ. अस वाटतंय आजचा एपी बघताना. Lol
काय तो गुलाबाचा सीन? अरे लढाया वैगेरे दाखवायला प्रोडक्शन हाऊस बजेट देत नाही तर 'काही वर्षानंतर' अस म्हणत गॅप दाखवा.

ही रमा म्हणजे अकाली प्रौढत्व आहे.कंटाळा यायला लागला हिचा.मोठ करा आता रमेला.तसही आता छोट्या रमेची खरी परीक्षा सुरू होईल मार्च मध्ये.बास झाला आता स्रुष्टी पगारेचा रोल.
आजची नवीन रेसिपी.... उसाच्या रसातल पिठल.म्हणजे पाण्याऐवजी पिठल करताना उसाचा रसच वापरायचा.

चंपा, पूर्ण पोस्टीला अनुमोदन.
त्या रमेची पिरपिर ऐकून कंटाळा आला.
माझा 9 वर्षाचा मुलगा विचारतो आई ती रमा सतत रमेला अमूक करायचे आहे रमेस तमुक ठाऊक आहे. असं का बोलते? रमेस ऐवजी आम्हास म्हणायला हवं ना? आता काय बोलणार?
जी गोष्ट 9 वर्षाच्या मुलाला कळते ती त्या सवांदलेखकास कळत नाही का??
माधवराव एवढे शेळपट का दाखवलेत?
त्यांचा वर्ण एवढा सावळा नव्हता.
मी स्वामी वाचलेली आहे त्यातल्या वर्णनानुसार मी हे म्हणतीय.

बरेच दिवस झाले संताजीची बायको दाखवली नाही. तसेच रमेची दासि पण दिसली नाही.
माझा 9 वर्षाचा मुलगा विचारतो आई ती रमा सतत रमेला अमूक करायचे आहे रमेस तमुक ठाऊक आहे. असं का बोलते? रमेस ऐवजी आम्हास म्हणायला हवं ना? आता काय बोलणार?
स्वताला सतत स्वताच्या नावाने हाक मारण मी समजू शकते कारण माझा ४ वर्षाचा भाचा स्वताला काही हवे असल्यास मला दे म्हणण्याऐवजी रमे सारखच स्वताच नाव घेतो.
या वेळेस रमेच्या वडिलांचे भजन दाखवले नाही का?
पंचपक्वानांनमधे बाकी पदार्थ लगेच झाले हे समजू शकते पण श्रीखंडासाठी चक्का तयार होता का? ते कसे लगेच झाले. आम्ही करायचो घरी तेव्हा वडिल रात्रभर ते दही टांगून ठेवायचे.

श्रीखंड बघून माझ्याही मनात अगदी तेच आले होते. एवढी पंचपक्वान्न खाऊनही सगळ्या पेशवीनी मापात आहेत. मला तर खाता खाताच झोप आली असती. श्रीखंड खायला चमचा नाही दिला पार्वतीबाईंनी, बोटाने चाटून खाल्ले त्यांच्या पतिदेवांनी. सदाशिवराव रमेसमोर काही बोलत होते दादासाहेबांबद्दल तेव्हा मला वाटले अरे गप्प बस ती रमा जाऊन सांगून टाकेल आणि खरेच सदाशिव गप्प झाले. रमेचा वाचाळपणा आठवला असेल त्यांना. रमा तिच्या नवऱ्यासाठी कारल्याचे लोणचे घेऊन गेली, अगोचर आहे मेली.
माधवराव मला तर गोरे दिसतात पण मोठा भाऊ सावळा आहे त्यांचा.

ती रमा तर मला व्हिलनच वाटते.खुनशी वाटते ती
++मलापण.
रमा ही एक खुनशी,कर्कशा,ढोंगी, स्वार्थी, गर्विष्ठ ,अहंकारी,अडेलतट्टू,हेकेखोर, आगाऊ, अगोचर,भोचक,उद्धट अशी खलनायिका आहे असे माझे मत झाले आहे

मला तर तिचा गोपिकाबाई पेक्षा जास्त राग येतो आणि त्यांचं वागणं पटतं. लेखकाची हिचा रोल डेव्हलप करण्यात खूप मोठी चूक झालीये. मेन हिरोईन च व्हिलन वाटतेय .
बादवे सिरीयल बघणं हिच्यामुळेच सोडून दिली मागेच.

मला तर तिचा गोपिकाबाई पेक्षा जास्त राग येतो आणि त्यांचं वागणं पटतं. लेखकाची हिचा रोल डेव्हलप करण्यात खूप मोठी चूक झालीये. मेन हिरोईन च व्हिलन वाटतेय . >> अगदी अगदी

मी अधेमधे बघते, पण नकळत मृणाल कुलकर्णीच्या रमा माधवशी तुलना होते, त्यातले माधवराव आणि सिरियल मधले माधवराव तसचं रमाच character खूप वेगळ वाटत.

Pages