कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका
Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विरेन प्रधानच्या आधीच्या राधा
विरेन प्रधानच्या आधीच्या राधा प्रेम रंगी रंगलीमध्ये पण असच काहीस होत,राधाच्या पत्रिकेत दोष असतो ती जर लग्नानंतर एका वर्षाच्या आत प्रेग्नंट राहिली नाही तर तिच्या जीवाला धोका असतो,या एका प्लॉटवर त्याने दीड वर्ष ती मालिका चालवली.>>>> हो आठवलं,
>ही सिरीयल सिनेमॅटिक लिबर्टी
>ही सिरीयल सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली वाट्टेल तो इतिहास दाखवतायत म्हणून बंद करायला हवी आहे हे माझं प्रामाणिक मत आहे.>> सहमत. खरोखरच काहिही दाखवत सुटले आहेत. वास्तविक इतिहास पुरेसा नाही का मालिका चालवण्यासाठी? कुकरी + सांस बहू शो करून ठेवलाय. खूप लोकांना हाच खरा इतिहास असं वाटतही असेल.
आज माधवराव रमेला जेव्हा सांगत
आज माधवराव रमेला जेव्हा सांगत होते की छत्रपतींच येण काही काळ लांबणीवर पडल आहे ,तेव्हा वाटल की आता ही भोचक रमा म्हणते की काय,हो इकडची स्वारी ,रमेला माहित आहे,का लांबणीवर पडल आहे ते,करोना आला आहे ना पुण्यात.............हसणारी बाहुली.
आज माधवराव रमेला जेव्हा सांगत
आज माधवराव रमेला जेव्हा सांगत होते की छत्रपतींच येण काही काळ लांबणीवर पडल आहे ,तेव्हा वाटल की आता ही भोचक रमा म्हणते की काय,हो इकडची स्वारी ,रमेला माहित आहे,का लांबणीवर पडल आहे ते,करोना आला आहे ना पुण्यात.............हसणारी बाहुली. >> लय भारी
रमा हुशार चतुर, चौकस
रमा हुशार चतुर, चौकस वाटण्याएवजी आगावु, भोचक आणि वाचाळ वाटतेय, ज्यात त्यात नाक खुपसुन बोलणारी, दाराआडुन बोलण काय एकते घोळ घालुन ठेवणारी.
आणि ती रमा किती लहान दिसते
आणि ती रमा किती लहान दिसते त्या थोराड इकडच्या स्वारी समोर,! कैच्या कैच!
UP लय भारी
UP लय भारी
उडत उडत बघायला सुरूवात केली
उडत उडत बघायला सुरूवात केली पण ऐतिहासिक पार्श्वभूमीवरची नेहमीची सासबहू सिरयल वाटतेय....
खरंच इतक्या ह्या बायका , लहान वयातली रमा (जिला राजकारणातलं सग्ळ कळतया असं बोलणारी ) असतील का?
पेशवे ताटाखालचे मांजर असतील का?
पेशव्यांच्या काळात अस लहान
पेशव्यांच्या काळात अस लहान वयातही कोणी गाढव वगैरे म्हणत असेल का?.
हा विरेन प्रधान सुटलाच आहे आता,काहीही दाखवत आहे.
काल चॅनेल सुर्फिंग करताना
काल चॅनेल सुर्फिंग करताना पाहिलं ते तुरीचे मुटके की काय बनवले ,नेमकी सगळी कृती नाही बघितली, घरी आहे तर करून पाहीन म्हणतेय,कोणी पहिली आहे का पूर्ण रेसिपी
https://marathi.abplive.com
https://marathi.abplive.com/entertainment/new-actress-to-play-ramabais-r...
मालिका बघत नाही पण हे वाचनात आलं म्हणून शेअर करतेय.
हिला ओळखत नाही पण मोठी रमा निदान वीणा नाहीये.
मोठी रमा रेवती लेले आहे.
मोठी रमा रेवती लेले आहे.
हो तिचाच फोटो आहे.
हो तिचाच फोटो आहे. पहिल्यांदाच बघतेय तिला.
आत नविन पाकृ पहायला मिळणार.
आत नविन पाकृ पहायला मिळणार. पण केवळ मोठी रमा चीच का जाहिरात केली. माधवराव पण बदलले असतिल ना....... तो रोल कोण करत आहे.
माधवराव तेच आहेत हो. फक्त
माधवराव तेच आहेत हो. फक्त मिशी आलेय त्यांना. ☺
अरेरे, तेच माधवराव
अरेरे, तेच माधवराव
अर्रर्रर्रर्र किती पकाव चालू
अर्रर्रर्रर्र किती पकाव चालू आहे सिरीयल मध्ये फुल्ल ऑन हिंदी शिनेमा बघायचा फील येतो आहे असे नव्हते आपले पेशवे आणि तेव्हा बायको ला असं सगळ्यांसमोर हळू बघणे वैगेरे म्हणजे कहर आहे आणि भाऊस्वामीं छेडछाड माधव रावांबरोबर devaaa .. साला गोपिका बाई कान लाल करेल माधव रावांचा please काही तरी रिअल दाखवा यार
@डोडो परवाच्या भागात शनिवार
@डोडो परवाच्या भागात शनिवार वाड्याची ग्राफिक्स प्रतिमा बघून मुडच गेला आइचा हा! हा! हा!
टोटल कार्टून ! जुनपुराण तंत्रग्यान
लहानपणी रमा सावळी आणि आता
लहानपणी रमा सावळी आणि आता लख्ख गोरी. रोज हळदीचा लेप लावायची का. मोठी रमा नाही आवडली, अगदी फॉरेनर वाटते. रमा आणि माधव अगदी लहानपणीपासून रोमँटिक दाखवले आहेत. ते सोनचाफा कोमेजू नये म्हणून काय करत असतात माधवराव. रमा लहान असताना मिरजेला निघून गेल्या म्हणून माधवराव रुसले आहेत. तेही तेव्हा लहानच असतील ना. रमा म्हणते आईला मी फक्त ह्यांनी दिलेला सोनचाफा माळते, हा गजरा मी देवीला वाहते. तो सोनचाफा म्हणजे जसा काही ताजमहालच, सारखा त्या चाफ्याचा जप चालू असतो. काहीही दाखवतात.
अगदी अगदी. आणि काल तर केवढे
अगदी अगदी. आणि काल तर केवढे मोठे टपोरे लाल गुलाब माळले होते केसात. चाफाच का नाही माळला मग?
३ दिवस गेले दर्शन होईपर्यंत रमाबाईंचे. कास्टिंग थोडे चुकल्यासारखे वाटते. पहिली रमा आणि दुसरी रमा यांत एवढी तफावत नाही बरी वाटत.
दुसरी रमा बघून पहिली बरी होती
दुसरी रमा बघून पहिली बरी होती म्हणायची वेळ आली.
३ दिवस गेले दर्शन होईपर्यंत
३ दिवस गेले दर्शन होईपर्यंत रमाबाईंचे>>नाहीतर काय एवढा सस्पेन्स तर कतरीना, दीपिका ह्यांच्याही एंट्रीला नसेल.
दुसरी रमा बघून पहिली बरी होती म्हणायची वेळ आली.>> मलाही असंच वाटलं
दुसरी रमा बघून पहिली बरी होती
दुसरी रमा बघून पहिली बरी होती म्हणायची वेळ आली.>> :
मी पाहिली नाही नवी रमा. पण म्हणजे ती जुन्या रमाहून अगोचर दाखवली आहे का?.. विचारमग्न बाहुली..
दुसरी रमा बघून पहिली बरी होती
दुसरी रमा बघून पहिली बरी होती म्हणायची वेळ आली>>>हाहाहा, खरंच म्हणजे ती सु न ध्या न मध्ये छान वाटली पण सिरीयल मध्ये जरा जास्तच मु फट वाटत होती
@डोडो परवाच्या भागात शनिवार वाड्याची ग्राफिक्स प्रतिमा बघून मुडच गेला आइचा हा! हा! हा!
टोटल कार्टून ! जुनपुराण तंत्रग्यान>>> मी नाही बघितला रे तो एपिसोड पण कान उघडणी झाली पाहिजे त्यांची हे नक्की
रमा च्या आईची गुलाबी साडी परत
रमा च्या आईची गुलाबी साडी परत ट्रंक मधुन बाहेर आली ...... रमा मोठी होउन ईतकी बदलली पण माधवराव अगदी तसेच राहिले. काय असेल याचे तारुण्याचे रहस्य ........., अजुन तरी पुर्ण भाग बघायला मिळाले नहित. पण ज्या छोट्या छोट्या क्लिप येतात. त्यातुन असे वाटते की पुन्हा पहिले पाढे पनच्चावन असणार.
दुसरी रमा बघून पहिली बरी होती म्हणायची वेळ आली.>> Proud Proud : हे मात्र अगदी खरे. निवड चुकली आहे.
सोनचाफा कोमेजू नये म्हणून
सोनचाफा कोमेजू नये म्हणून उपाय करतात तर स्वतःचं तारुण्य का नाही जपणार माधवराव. रमेलाही फेर अँड लवली सारखं एखादं क्रीम दिलं असेल माधवरावांनी
माधवराव आधीच मोठे घेतले आहेत
माधवराव आधीच मोठे घेतले आहेत म्हणून नसेन दाखले तसे माल तर नवी रामा आवडी पण आता तरी नीट दाखवावी नाटय कथा
174 व्या भागात voot वर 16:51
174 व्या भागात voot वर 16:51 मिनिटांनी रामचंद्राचे खूप मजेशीर संवाद आहेत.
मगाशी रिपीट भाग होता, नवीन
मगाशी रिपीट भाग होता, नवीन रमा बघुया असं ठरवलं आणि channel बदललं नाही. नवीन रमा फार बोअर वाटली मला, impressive अजिबात वाटली नाही. शेवटी नाही बघितलं पण जितका वेळ बघितलं तो सर्व भाग करवस्त्र या गोष्टीवर घालवला. ह्या मालिकेत त्या पार्वतीबाई impressive वाटतात मला. दिसायला छान आहेतच पण अभिनयपण सहज करतात. अर्थात मी फार कमी वेळा काही सिन्स बघितलेत पण त्याच फक्त आवडल्या मला.
नवीन रमा बघून फारच निराशा
नवीन रमा बघून फारच निराशा झाली. छोटीला झाकावी आणि मोठीला काढावी.
ही नवीन रमा अजिबातच महाराष्ट्रीयन सौंदर्य वाटत नाही. तशी ही सुंदर पण अजिबातच वाटली नाही.
ती जुनी आगाऊ, अगोचर संवाद म्हणणारी रमा जावून कोणी तरी बेअरेबल येईल ह्या आशेवर बोळा फिरवलान त्या विरेन ने.
हो हो सोडलं तर पार्वतीबाई जरा बरी वाटते अंजू म्हणतेय तसं.
Pages