कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका
Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुबाई कोण असतात ज्यांच्याकडे
अनुबाई कोण असतात ज्यांच्याकडे नारायणाला ठेवतात. गोपिका बाईंच्या पतीचे मिशीचे केस पूर्ण पांढरे झाले पण गोपिका बाई तशाच. त्यांनाही द्यायची की एखादी पांढरी बट. रमा आणि माधवची अगदी फिल्मी लव्ह स्टोरी चालू आहे असे वाटते. भेटीलाच ईतका वेळ, पुढे कसं होणार तो वीरेनच जाणे.
माधवराव एकदम कडक इस्त्री
>>>अनुबाईंचा उल्लेख आत्याबाई असा करतायत. कदाचित श्रीमंतांच्या आत्याबाई असतील.
माधवराव एकदम कडक इस्त्री केल्यासारखे दिसतात. मान दुखत कशी नाही? काय ते कौतुक त्या 'करवस्त्राचं'.
ऊंच माझा झोका मधली छोटी रमा आता मोठी झाली असेल ना. ती पण चालली असती.
अनुबाई कोण असतात >>>>बाजीराव
अनुबाई कोण असतात >>>>बाजीराव पेशव्यांची बहीण
बाजीराव पेशव्यांची बहीण>> हो.
बाजीराव पेशव्यांची बहीण>> हो. आणि सरदार घोरपडे यांची सून.
मालिकेत बालरमेस मोठे झालेलं
मालिकेत बालरमेस मोठे झालेलं दाखवले आहे.
मात्र माधवराव साधारण त्याचं वयाचे दिसतायेत. ज्या वयाचे सुरवातीपासून दाखवलेत.
रमाबाई आणि माधवराव यांना एकाच वयाचे दाखवण्याच महान कार्य वीरेन प्रधान ह्यांनी केलेलं आहे...
नंतर माधवरावांची मिशी पांढरी
नंतर माधवरावांची मिशी पांढरी करून टाकतील आणि रमा तशीच राहील (हाय काय नाय काय)
उंच माझा झोका मधली रमा या भूमिकेसाठी बरीच मोठी वाटली असती. पण आता जी रमा आहे ती अठरा-एकोणीस पेक्षा कमी वाटत नाही. नहाण येण्याचं वय तेरा-चौदा असतं ना, ही बरीच मोठी दाखवली आहे, गोपिका बाईंची चिंता रास्त आहे. रमा आणि माधव एकाच वयाचे दिसत आहेत आता
नंतर बदल करायचा नाही रामा
नंतर बदल करायचा नाही रामा मध्ये म्हणून आधीच मोठी घेतली आता
माधवराव तरी कोठे 8yr चे दिसत
माधवराव तरी कोठे 8yr चे दिसत हाती आधी आता बदल कराव लागला नाही काही
लहान मुलं आणि वृद्ध यांना
लहान मुलं आणि वृद्ध यांना बाहेर पडायला बंदी आहे ना? चित्रीकरणही नाही करता येणार.
नाना साहेबांची मिशी पांढरी
नाना साहेबांची मिशी पांढरी दाखवली आहे??
40 व्या वर्षी ते वारले,
आत्ता माधव लहान आहे म्हणजे नाना साहेबांचे वय 30 32 वय असावे. गोपिका बाई 25 -26 एक वर्षे असाव्यात.
इतक्यात त्यांचे केस पांढरे केलेत?
वयाच्या बाबतीत सगळाच गोंधळ
वयाच्या बाबतीत सगळाच गोंधळ आहे मालिकेत.
माधवाचा पोक्तपणाचा आव आणी
माधवाचा पोक्तपणाचा आव आणी रमाबाइच लाजण दोन्ही एकदम उच्च अभिनय !!
लहानी रमा निदान ८ वर्शाची दिसत तरी होती ही रमा २०-२५ दिसतेय, आणि माधव रावही सेमच वाटतायत, कोविड मुळे बन्दी असली तरी त्याआधीचे माधवराव जरा अडनिड्या वयातले दाखवुन मग हे दोन्ही बदल जमले असते.
नविन रमेला हेअरस्टाइलिस्ट आणि मेकप आर्टिस्ट दोन्ही भारी मिळालिये, जेल लावुन एकही केस इकडे तिकडे नाही.
रमा फिरंगी वाटते आहे
रमा फिरंगी वाटते आहे
विश्वासराव आणि लक्ष्मीबाई
विश्वासराव आणि लक्ष्मीबाई दिसत नाहीत.मालिका नक्की किती वर्षे पुढे गेली आहे तेही सांगितले नाही.
रमेला बोलावले आहे, रमेला आठवण येते, रमेने करवस्त्र विणले आहे हे अजून सुरूच आहे. स्वतःला आम्ही म्हणायचे शिकलीच नाही का रमा इतक्या वर्षांत ?
हो हो सोडलं तर पार्वतीबाई जरा
हो हो सोडलं तर पार्वतीबाई जरा बरी वाटते अंजू म्हणतेय तसं.>>>> डोळ्यासमोर आल्या हो पार्वतीबाई ममो
हे करवस्त्र काय किस्सा आहे?
हे करवस्त्र काय किस्सा आहे? हातरुमाल का?
तोच असावा असा अंदाज, आख्खा
तोच असावा असा अंदाज, आख्खा एपिसोड फक्त नावावर घालवला मग पुढे ते भरलेलं करवस्त्र बघायचं डेरिंग राहिलं नाही. रेशमी रुमाल असावा, पोपटी रंगाचे रेशमी काहीतरी दिसत होतं.
करवस्त्र आहे का ते, मला वाटलं
करवस्त्र आहे का ते, मला वाटलं कटिवस्त्र. मी विचार करतेय एवढं पातळ कापड कोणी कंबरेला लावून का फिरेल
करवस्त्र म्हणजे आपला scarf
करवस्त्र म्हणजे आपल्याscarf च्या आकाराचा रुमाल म्हटलं तरी चालेल.त्यावर रमा, माधव अस लिहिलंय आणि मध्ये मोरपीस.चारही बाजूला लटकन लावलेत.
जळगावची आहे म्हणे नवी रमा. मला विचारलं असत म्हणा त्यापेक्षा, हम क्या मर गये थे क्या?
अगदीच बघवत नाही इथली रमा पहिल्या दोन रमाच्या तुलनेत.
करवस्त्र म्हणजे माधवरावांचा
करवस्त्र म्हणजे माधवरावांचा stole आहे
जुन्या रमेची पिरपिर डोक्यात जायची.
त्यामानाने नवीन रमा थोडी सुसह्य वाटली.
रमेला अमूक वाटलं रमेला तमूक वाटलं ते सुरूच आहे.
नवीन रमेस लाजायलाही जमते.
नवी रमा पंडुरोगी वाटते. सारखं
नवी रमा पंडुरोगी वाटते. सारखं ते "रमेला वाटलं" म्हणणं विचित्रच वाटतं.
करवस्त्र म्हणजे आपल्याscarf
करवस्त्र म्हणजे आपल्याscarf च्या आकाराचा रुमाल म्हटलं तरी चालेल.त्यावर रमा, माधव अस लिहिलंय आणि मध्ये मोरपीस.चारही बाजूला लटकन लावलेत.>>
रमा माधव असं देवनागरीत लिहिलय का?
आणि ते कशिदाकाम आहे का?
आणि ते कशिदाकाम आहे का?
करवस्त्र वरून चर्चा वाचून खूप
करवस्त्र वरून चर्चा वाचून खूप हसू येत आहे मालिका पाहून इतक काही नाही वाटले पण इथे वाचून मस्त वाटत आहे
माधवाचा पोक्तपणाचा आव आणी
माधवाचा पोक्तपणाचा आव आणी रमाबाइच लाजण दोन्ही एकदम उच्च अभिनय !! हो ह्यामुळे थोड बघावे अस वाटत आहे अजून थोड मनोरंजन करू शकतात पण खूप कमी दाखत आहेत
चिकू आणि मेधावी हो.
चिकू आणि मेधावी हो.
कशिदाकाम म्हणजे दोऱ्याने केलेलं काम ना तर हो कशिदा काम.
जस ते जुन्या रमेचं सखी
जस ते जुन्या रमेचं सखी फुलपाखरू डोक्यात जायचं तशी नव्या रमेची उचकी उचकवतेय मला. अगदी हुकमी उचकी लागते तिला आणि ती तरी किती कृत्रिम !
अशी मनाची चलबिचल झाल्यामुळे
अशी मनाची चलबिचल झाल्यामुळे उचकी लागते असे प्रत्यक्षात होते का. मी तर हे कधी ऐकले नाही. हे उचकी प्रकरण कोणत्या पुस्तकात लिहिले आहे की प्रधानांची कल्पनाशक्ती आहे. रमा माधवरावांची वाट अडवते एखाद्या गुंडासारखी, बिचारे लाजून खाली मान घालतात. रमेची आई म्हणते ती बरीच समजूतदार झालीये पण अवखळपणा गेला नाही अजून, याचा अर्थ काय.
त्या काळात देवनागरी लिपी
त्या काळात देवनागरी लिपी नव्हती मराठीसाठी. मोडी वापरली जायची. मग ते रमा माधव हे देवनागरीमधे कशिदाकाम करून भरणं म्हणजे मालिकेसाठी काय अभ्यास केला आहे त्याची कल्पना येते अर्थात आपणच उगाच जास्त अपेक्षा वाढवून बसतो ही आपली चूक.
आत्ताच शिवाजीमहाराजांवर संबंधित एका चित्रपटातही शुध्द देवनागरी मराठीत लिहिलेले महाराजांचे आज्ञापत्र बघितलेले आठवते
ते प्रेक्षकांच्या सोयीसाठी
ते प्रेक्षकांच्या सोयीसाठी देवनागरी वापरत असतील
Pages