कलर्स वर हिंदी बिग बॉसने नुकतीच एन्ट्री केली आहे आणि अपेक्षेप्रमाणेच सिझनची सुरवात जोरदार झाली आहे. जंगल, प्राणी थीम आहे, १५ तगडे स्पर्धक आहेत आणि ओटीटी चे ३ स्पर्धक ही आहेतच. त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
सोम ते शुक्र १०.३० pm
शनी-रवी ९.३० pm
चला तर मग !
हाय फ्रेण्डस,
ह्यावेळचा हिन्दी बिग बॉसचा सिझन ' ओन्ली सेलिब्रिटिज' चा असणार आहे. नो कॉमनर्स!
बिबॉ लोणावळयात नसून, फिल्मसिटीत घडतय.
ह्यावेळी सिझनमध्ये काही नवीन टिव्स्ट्स असणार आहेत म्हणे.
एरवी बिग बॉस पुरुषी आवाजात स्पर्धकान्ना आदेश दयायचा, पण आता त्याच्या जोडीला फिमेल वॉईस ऐकायला मिळणार आहे. आणि तो आवाज असणार आहे:
अमिषा पटेलचा.
सो, चर्चा करायला या!
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
दिवाळीचा फराळ दिवाळीत नकोसा होतो. पण काही दिवसांनी काहींना त्याची आठवण येऊ लागते. मैने प्यार किया, हम आपके है कौन नंतर ऐन दिवाळीत आलेल्या हम साथ साथ है चं प्रेक्षकांना अजीर्ण झालं होतं. नंतर नवा पदार्थ बनवून पाहण्यासाठी मै प्रेम की दिवानी हूं आणि विवाह हे प्रेमपट बनवूनही तोंडाला बसलेली मिठी काही सुटेना.मग पुन्हा जुनाच आयटेम नव्या पद्धतीने पण त्याच परंपरेत बनवून पाहण्याची खेळी या वेळी बॉक्स ऑफीसवर तरी चालली आहे.
किक................. ईद च्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट... खर तर या वाक्यातच चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवट देखील होतो.
मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.