Submitted by आ_रती on 7 October, 2021 - 18:11
कलर्स वर हिंदी बिग बॉसने नुकतीच एन्ट्री केली आहे आणि अपेक्षेप्रमाणेच सिझनची सुरवात जोरदार झाली आहे. जंगल, प्राणी थीम आहे, १५ तगडे स्पर्धक आहेत आणि ओटीटी चे ३ स्पर्धक ही आहेतच. त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा !
सोम ते शुक्र १०.३० pm
शनी-रवी ९.३० pm
चला तर मग !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला आवडलेले स्पर्धक
मला आवडलेले स्पर्धक
तेजस्वी प्रकाश - ही फुल्ल इंटरटेनर आहे व प्रचंड फॅन फोल्लोइंग आहे. खबरींनुसार वोटिंग मध्ये तीच पुढे आहे
विशाल कोटियन - आधी वाटले कोण हा ? ह्याला गुगल करून पाहावा लागला. मग लक्षात आले कि हा दिल विल प्यार व्यार , फॅमिली नं १ मध्ये होता. पण हा surprise एलिमेंट आहे शो मधील. मस्त आहे
जय भानुशालीही जोरात पण जरा जास्तच एग्ग्रेसिव्ह , करण कुंद्रा इम्प्रेसिव्ह
प्रतीक पण बराच पुढे जाईल.
शमिता शेट्टी कितीदा येणार बिग बॉसमध्ये ? पण सध्या बरीच बरी वाटतेय, खबरीनुसार तीच कॅप्टन झाली आहे.
तो उमर (असीमचा) भाऊ काही आवडला नाही. पण तोही पुढे जाईल.
वाचत राहीन. तेजस्वी प्रकाश
वाचत राहीन. तेजस्वी प्रकाश ओळखीचे नाव वाटतं, मराठी आहे का. बाकी जय, राज कुंदरा वगैरे ओळखीचे आहेत. हिन्दी बघत नाही, काही interesting वाटलं इथे वाचून तर बघेन.
हो अंजू ती मराठी आहे.
हो अंजू ती मराठी आहे. वायंगणकर आडनाव आहे
हिंदीपेक्षा मराठीत फुल्ल धमाल
हिंदीपेक्षा मराठीत फुल्ल धमाल आहे. करण कुंदरा मोठा स्टार आहे. इथे कसा काय आला तो?
धन्यवाद आरती, आठवलं. ती
धन्यवाद आरती, आठवलं. ती हिंदी सिरीयल मधे असायची.
खूपच जोरदार झाली या सिझन ची
खूपच जोरदार झाली या सिझन ची सुरवात.
माझे सध्याचे आवडते जय, विशाल आणि तेजस्वी. जय आधीपासूनच आवडतो पण विशाल सरप्राइज एलिमेंट आहे. छान वावर आहे त्याचा. कोटियनच्या कोट्या भारी असतात.
मला तेजस्विनी आवडते.. ती
मला तेजस्वि आवडते.. ती कलर्स च्या स्वरागिनी मध्ये होती..
मला आवडली आहे थीम आणि स्पर्धक
मला आवडली आहे थीम आणि स्पर्धक.
करण कुन्द्रा, विशाल कोटियन आणि तेजस्वी चांगले वाटले सध्या , जय भानुशालीही चांगला आहे पण ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतो जरा .
ती अफसाना खान पण नमुना आहे!
प्रतीकला ओटीटी सारखा इथे भाव मिळणार नाहीये , सेम फॉर्म्युला चालु आहे त्याचा !
निशान्त ओटीटी मधे आवडला होता, इथे नाही आवडते !
माइशा अय्यर , डॉनल, सिंबा, इशान वगैरे पब्लिक अगदीच बी ग्रेड ..
प्रतीकने जो काही गोंधळ
प्रतीकने जो काही गोंधळ घातलेला अपेक्षेप्रमाणे सलमान ने झापले. पण शेवटी सगळ्यांना समजावले ही.
साहिलश्रॉफ गेला अशी न्युज आहे.
करण कुंदरा मोठा स्टार आहे.
करण कुंदरा मोठा स्टार आहे. इथे कसा काय आला तो? >>>
सर्वच जण शेवटी इथे येतातच !
विकेंडचा वार पाहिला का कोणी ?
विकेंडचा वार पाहिला का कोणी ?
प्रतीकने केलेल्या डिस्ट्रक्शन्/राड्याबद्दल त्याला सलमानने सुनावणे अपेक्षितच होते पण जरा जास्तच ह्युमिलेटिंग होतं असं वाटल नाही का ऑडियन्सला ?
जय भानुशालीला-करणला सलमानने सांगितलं कि तुमच करिअर चांगलं चालु आहे तुम्ही का या पोराच्या लेव्हलला जाताय , प्रतीकचं करियर मधे तसही काही होणार नाहीये, यातून अजुन एखादा रिअॅलिटी शो मिळेल फार तर, हि इज नॉट गोइंग टु ग्रो वगैरे बॅशिंगची काही गरज नव्हती, हे ऐकून कोणी डिप्रेशन मधे जायचा
मला नाही वाटत सलमान पर्पजली
मला नाही वाटत सलमान पर्पजली बोलला प्रतिकला. जर त्याने रागवून किंवा शांतपणे जरी सांगितले असते ना तर प्रतीकला काही फरक पडला नसता उलट फुटेज मिळतंय म्हणून जास्त केलं असते. सलमानच्या अशा बोलण्यामुळे आता प्रतीकचा गेम सुधारेल असे वाटते आहे.
कोणी बघत नाहीये का?
कोणी बघत नाहीये का?
कालचा ‘जंगली डाकूंचा हल्ला ‘ टास्क काय भारी झाला !
प्रतीकने गेम खरच सुधारलाय, मला त्याची गेम साठी पॅशन आवडते, कधीही शान्त बसून राहिलेला दिसत नाही तो !
प्रतीक-निशान्त - शमिता त्रिकुटानी बहुसंख्येने येणार्या अडदांड डाकूंना छान फाइट दिली , रिझल्ट अपेक्षित होता पण तिघांनी मेजॉरीटी असलेल्या जंगल टिम पुढे गिव्हप केले नाही !
डाकू टिम मधे विशाल किती एंटरटेनिंग होता, मला फार आवडतात त्याचे वन लायनर्स आणि ह्युमर
तेजस्विने त्याला चांगली साथ दिली.
जय भानुशालीचा जय गालीशाली झालाय, पूर्ण निगेटिव्ह !
कामामुळे दोन-तीन दिवस पाहता
कामामुळे दोन-तीन दिवस पाहता नाही आला शो.
पण विशाल खूपच एन्टरटेनर वाटतोय. बघायला मजा येते.नाहीतर नुसते भांडाभांडी, शिव्यांमुळे कंटाळा येतो. हुशार आहे तो !
एकूण मराठी आणि हिंदी दोन्हीकडे विशाल गाजत आहेत.
अरे कोणी बघत आहे का हिंदी बिग
अरे कोणी बघत आहे का हिंदी बिग बॉस? काल सर्वांच्या अंगात WWE संचारला होता. काय फायटिंग केली सगळ्यांनी. त्यात करण कुंद्रा तर अक्षरशः उचलून फेकत होता एकेकाला. निशांतला पाचोळ्यासारखे उचलले . काय शक्ती आहे त्याच्यात.
माझी तर हसून हसून पुरेवाट झाली. बिग बॉस ही बहुधा थक्क होऊन बघत राहिले. नंतर फक्त कडी निंदा केली.
अफसानाने तेजस्वीला नौकरानी आणि शमिताला गंदी औरत म्हणून वीकेंडला सलमानची बोलणी खायचे आमंत्रण मिळवले.
आजच्या विकेंडच्या वार मधे
आजच्या विकेंडच्या वार मधे अफसानाची वाइल्डेस्ट साइड दाखवली , भरपूर सुनावलं गेलं अफसानाला पण या सगळ्या प्रकरणात सर्वात कनिंग हालकट शमिता वाटली, तिने मुद्दाम अफसानाला इन्स्टिगेट करून वाइल्ड होऊ दिले, तिला माहित आहे म्हंटली ना अफसानाचा पॅटर्न , शमिताला अर्थातच काहीही सुनावल गेलं नाही !

सलमान खान किती मिसॉज्॑निस्ट आहे, मायशाला म्हणे “सब गाली देते है लेकिन लडकिया गाली देते हुए अच्छी नही लगती , ये फॅक्ट है“ , बाकी जय वगैरे पब्लिकला अगदीच सौम्य स्॑मज शिवी बद्दल
अफसानावर आरोप करताना पूर्ण घर अतिशय कनिंग आणि अफसानापेक्शा जास्त डेंजरस दिसत होते!
तेजस्विनीही किती फेक वाटततेय सध्या !
Btw त्या अफसानाला खरच ट्रिटमेन्टची गरज आहे , डॉ घाबरला होता तिला