किक..!! उशिराच बसणारी..!

Submitted by उदयन.. on 27 July, 2014 - 04:04

किक................. ईद च्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट... खर तर या वाक्यातच चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवट देखील होतो.
खान त्रयी मधले एक आमिरचे काही चित्रपट अपवाद सोडले तर आमिर ,सलमान आणि शाहरुख चे बहुतेक चित्रपटांची हीच अवस्था असते. हिरो लार्जर दॅन लाईफ , सर्व काही करु शकणारा, एकदम जिनियस टाईप, गरिबो का मसिहा. जगभरातील सगळेच गुण खलबत्त्यात कुटुन एकत्रित करुन ते दुधाच्या ग्लासात टाकुन घेणारे हिरो. फक्त फक्त फक्त भारतातच असतात हा गैरसमज आहे. या चित्रपटात सलमानचा एक वाक्य आहे ... मेरे बारे मे ज्यादा मत सोचना... दिल मे आता हु दिमाग मे नही...हा चित्रपट अक्षरशः या वाक्याला जगला आहे असे म्हणावे लागेल ... या बहुतेक डायलॉग रायटर ने चित्रपट बघितल्यानंतर हा डायलोग मधे घुसवला आहे ही शंका येउ लागते. दिमाग मधे येतच नाही चित्रपट कितीही प्रयत्न केला तरी.

चला आता आपण चित्रपटाची स्टोरी बघण्याचा प्रयत्न करुया .
सुचना.. हा दक्षिणभारतीय चित्रपटाचा रिमेक आहे आणि त्यात वांटेड, दबंग, धुम सिरिज, जतहैजा, जय हो, रेडी.. या सगळ्याचे थोडेथोडे भाग घेउन बनवलेला आहे

"मेरे पिक्चर के स्टोरी के बारे ज्यादा मत सोचना........ रिमेक मे आता हु ऑरिजनल नही"

एक असतो देवीलाल सिंग जो असतो सलमान ( चित्रपटात याचे नाव असे चित्रविचित्र का ठेवतो..? चुलबुल काय लवली काय देवी काय.) जो नेहमी काहीतरी "इंट्रेस्टींग" करण्याचा प्रयत्न करत असतो ( हे दाखवण्यासाठी आपण तब्बल अर्धा चित्रपट खर्ची घालवतो उगाचच) त्याचे वडील (मिथुन चक्रवर्ती) कार्ट्यासारखेच असतात ( पोराबरोबर टुल्ल होउन फिरणे इत्यादी प्रकार ) आणि आई ( अर्चना पुरणसिंग Uhoh ) ( हे बघण्यासाठी देवाने मला जिवंत ठेवले असल्यास ताबडतोब मला मृत्यु द्यावा अशी जाहीर विनंती करत आहे) ती ही तशीच ... देवी फार मोठा जिनिअस टाईप आणि सद्गुणाचा पुतळा असतो. फक्त काहीतरी किक मिळत नाही म्हणुन तो अद्याप ३२ पेक्षा जास्त नोकर्या सोडुन बिनकामाचा मोकळा ढाकळा तथाकथित फिल्मीभाषेतली "मदत" करत शहरात फिरत असतो. अश्या कामात त्याला "किक" मिळत असते ..( घर चालवायला किक नाही पैसे लागतात हे बहुतेक दिग्दर्शक विसरलेला आहे ) अश्याच एका "किक" मधे हिरवणी मिळते ती त्याच्या कॉलिटी (?) वर फिदा होते त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याला घरी घेउन येते. बिचारा बाप केविलवाण्या सुरात द ग्रेट किक्कर ला त्याच्या नोकरी संदर्भात विचारतात... सल्लुभाईला राग येतो.. भलीमोठी फिलॉसॉफी सांगतात (झाडतात) मी यांव मी त्यांव.. पैसाच जगण्यासाठी सर्वकाही नसतो ब्लाब्लाब्ला . आणि पैसाच कमावायचा असेल तर बघच मी काय करतो असे बोलुन हिरवीन ला बीच ( बीच म्हणजे मधला - नॉट बीच किनारा ऑर ऑदर अनिथिंग) - ए-मंझधार मधे सोडुन निघुन जातो.... थोडक्यात इंटरवल होतो .. बिग रिलिफ.. खरच पहिला हाफ तर अत्यंत कंटाळवाणा..

फिर हम आये ब्रेक के बाद

हिरवीन चे लग्न पोलंड मधे एका भारतीय पोलिस बरोबर ठरते रणदिप हुड्डा सोबत तो पोलंड ला एका चोराच्या मागोमाग आलेला असतो घरातले बोलतात बेटा चोराबरोबर मुलीला देखील बघुन ये... तेवढेच सरकारी पैश्यावर पोलंडला चाललाच आहेस तर चोर सापडला तर घेउन ये नाही तर सुन घेउन ये... हुड्डा एका भारतीय चोराच्या मागावर जो त्याला सतत चकवा देत असतो ( कृपया कसा हे विचारु नये ) .. सततच्या हारागिरी होत असल्याने केवळ हुड्डा भारतीय असल्याने त्याला सतत क्लु भारतीय चोर डेव्हील नामक देत असतो. पोलंड मधे डेव्हील शिव (नजाझुद्दीन सिद्दीकी) नामक एक सोशल चॅरीटेबल ट्रस्ट चालवणार्या एका सद्गृहस्थाचा खुन करण्यासाठी येतो

देवीलाल वरुन तो डेव्हील कसा , आणि का बनतो.. चोर्‍या का करतो, शिव च्या मागे का लागतो... ? या प्रश्नाची उत्तरे मिळावण्याकरीता उत्तरार्ध बघावाच लागतो आणि हीच "किक" बरोबर योग्यवेळेला लागते..
खरतर सलमान देवीलाल बनुन जितके माकडचाळे करुन आपले डोके आउट करतो तितकेच डेव्हिल बनुन जबरदस्त "किक"चा अनुभव देतो.. थोडक्यात सुरुवातीचे जे काही थेर करतो ते त्याला माफ होण्याइतके उत्तरार्धात जबरदस्त अ‍ॅक्शन आणि स्टोरी आहे.. संपुर्ण चित्रपट हा त्या डेव्हील वर केंद्रीत असल्याने तो डेव्हील पडद्यावर अवतिर्ण झाल्यावर चित्रपटात जिवंतपणा येतो.. भराभर घटना घडत जातात आणि आपण त्यात गुंतत जातो. पुढे काय याची वाट बघे पर्यंत दुसरे चालु होते. जिथे चित्रपट संपतो तिथुन परत चालु होतो. फुटबॉल मधे जसा एक्स्ट्रा टाईम देउन काही मिनिटे अजुन खेळ चालु ठेवतात तसाच प्रकार इथे घडतो. त्या एक्स्ट्रा टाईम मधे खेळाडु जसे प्राणप्रतिष्ठा लावुन खेळतात आणि धक्कादायक निर्णय सामन्याचा लागतो.. तसेच काहीहीसे या चित्रपटाबाबत होते.. इतका वेळ रटाळ खेळ सलमान खेळत असताना एका मागोमाग एक धक्के देउन सामन्याचा नुरच पलटवुन टाकतो काही धक्के कैच्याकै आहेत परंतु ते सलमानच्या साजेसे असल्याने सुखद असतात. मुख्य चित्रपट उत्तरार्धातनंतरच चालु होतो हे स्पष्ट मत आहे.

--------
चित्रपटाचे संवाद चुरचुरीत म्हणण्यापेक्षा टायमिंगवर आधारीत असल्याने योग्यवेळी डिलिव्हरी झाल्याने फिट्ट बसतात. अपवाद जॅकलिन चा... ती जितकी सुंदर दिसली आहे तितकीच वाईट तिची अभिनय क्षमता असल्याने बॅलंस होउन जातो Happy हुड्डा आणि सलमान आपापल्या वाट्याचे डायलॉग स्टाईल ने बोलतात. मिथुन आणि अर्चना यांच्याबाबत न बोललेलेच बरे ( एका दोन प्रसंगात तर मिथुन आणि सलमान "वीर" स्टाईल ने बोलायला चालु करतील असे वाटुन जाते .. यावरुन विचार करु शकतात) बाकी बर्याच दिवसानंतर एक "खलनायक" दिसला आहे सिद्दिकी ने आपल्या अभिनयाने शिव कॅरेक्टर जिवंत केलेले आहे...एक तर त्या भुमिकेला ना आगा ना पिछा.. तो या चित्रपटात कोणत्या बाजुने खलनायक आहे ते देखील दाखवलेले नाही तरी देखील निव्वळ अभिनयाने तो माणुस "मीच या चित्रपटाचा खलनायक आहे" हे सिध्द करुन जातो इतक्या ताकदीने त्याने ती भुमिका निभावली आहे.
सलमान डेव्हिल मधेच जास्त शोभुन दिसतो.. चांगला आणि वाईट दोन्ही दाखवण्यासाठी त्याने फ्रेंच कट ठेवली आहे परंतु नंतर ती देखील गायब होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकसारखा चेहरा ठेवल्याने तो देवी आहे की डेव्हिल आहे हे ओळखण्यास कठीण जाते Wink पण ठिक आहे इतकी अपेक्षा न ठेवता येण्यासारखी आहे. त्याचा स्क्रिन प्रेझेंटच इतका जबरदस्त असतो की इतर बाजुचे धुरकट होउन जाते.
रणदीप हुड्डा हा ओठांच्या आजुबाजुला तंबाखु सारखे काहीतरी ठेवून का असतो हे देवालाच ठाउक नेहमीच त्याचे ओठाच्याखाली हनुवटीजवळ काहीतरी फुगीर दिसत असल्याने सारखे तिथेच लक्ष जाते चित्रपटाच्या सुरुवातीला चांगला दिसतो.. पण नंतर चित्रपटात दुर्लक्षित होउ लागतो.

चित्रपटातील गाणी जुम्मे की रात आणि हँगओव्हर जितकी चांगली आहे तितकेच वाईटातला वाईट नृत्य त्यावर केलेले आहे चक्क काही ठिकाणी "झोंबीडान्स" नावाचा प्रकार आहे ठेका एकिकडे आणि नृत्य एकी कडे.
जुम्मेकी रात मधे जतहैजा मधला कतरिनाचा डांस सिक्वेंस आणला.. रेशमियाने त्या डांससिक्वेंसचे वाद्य देखील उचलले.. अरे रेशमिया एकतर तु र फॉर रेहमान नाही वर तुझ्याकडे शिवामणी सारखा अवलियाही नाही उगाचच त्या तुकड्याचे हसु करुन घेतलेले आहे... बिचार्‍या सलमानची गोची झालेली यात एक तर भाई जास्त हलतडुलत नाचत नाही आणि वर जॅकलिनबाई चांगलीच नाचते. बहुदा ती गोची सलमानला बाजुला ठेवुन पुर्ण केली जाते.. बिचारा एका कोपर्यात टाळ्या वाजवत उभा राहतो.. आणि जॅकीबाई नाच नाच नाचते.. जितकी नाचते ..चांगली नाचते. बाकीच्या संगीतात ना राम आहे ना रहिम. कानावर अत्याचार आहे...

अ‍ॅक्शन चित्रपटाचा राम रहिम येशु आहे.. खासकरुन पाठलागचे प्रसंग चांगले थरारक झालेले आहे. पेट्रोल महाग असल्याने हिरो बिचारा सायकलीवरुन पळतो तो भाग वेगळा पण सलमानचे आणि रणदीपचे पाठलाग बघेबल आहेत. मधे मधे रोहीत अंगात घुसल्यासारखा दिग्दर्शकाने गाड्या हवेत उडवण्याचे प्रकार देखील केलेले आहे.

काही प्रसंग अनावश्यक तर आहेच वर रबर ताणल्यासारखे लांबलचक आहे. हिरोची प्रत्येक क्वालिटीसाठी एक प्रसंग बनवलेला वाटतो. इतका वात आणतात खास करुन बापबेट्याचा दारु पिण्याचा प्रसंग.. तो का आहे त्याने काय साधले काहीही नाही. चित्रपटाचा पुर्वार्ध हे असेच प्रसंग क्वालिटीप्रॉडक्ट ठिगळांचा बनवलेला आहे.. जी काही स्टोरी आहे ती उत्तरार्धामधे .. स्क्रिनप्ले मधे सुरुवातीला चेतन भगत चे नाव बघुन हायसे वाटलेले पण त्याआशेवर फारकाळ जगता आले नाही.

सर्वात आवडलेला दृश्य एकच या चित्रपटात जे नंतर प्रचंड अपेक्षभंग करणारे ठरले... सुरुवातीला जॅकलिन राखाडी कपड्यांमधे कॉलेज / हॉस्पिटलच्या पांढर्‍या गेट मधुन बाहेर पडते... फुल्लटु हॉलिवुडटाईप फिलिंग येते.....ते एकच दृश्य परिणामकारक चित्रित केलेले वाटते ,,, बाकी उजेड बराच आहे... असे लिहायला गेले की १० पुरवण्या भरतील इतके आहे त्यामुळे थांबतोच

थोडक्यात ............ उत्तरार्धापर्यंत घोरत झोपलात तरी चालेल......मात्र उत्तरार्धात उठुन बसा... Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

=)) =))

परफेक्ट परिक्षण!!

सलमानच्या या सिनेमावर पैसे घालवण्यापेक्षा मराठी 'अनवट' पाहायला जावं लोकांनी.

Singham returns ani entertainment che tr. dakhawale. Te awadale

सुरुवातीला जॅकलिन राखाडी कपड्यांमधे कॉलेज / हॉस्पिटलच्या पांढर्‍या गेट मधुन बाहेर पडते... फुल्लटु हॉलिवुडटाईप फिलिंग येते.....
>>>>>>>>>>>>
ओये होये, कुठे मिळेल का गूगाळून, की त्यासाठी सिनेमाच्या तिकिटाचाच खर्चा करावा लागेल .

आज टीव्हीवर किक जस्ट फोर फन असा कार्यक्रम आहे त्यात सल्लु सिनेमा प्रमोट करतो. सर्व नाच गाणी इत्या दि आहेत. हिमेश बॉडी हगिन्ग ब्लॅक टी मध्ये चक्क चांगला दिसतो. सल्लु पेक्षा वयाने लहान दिसतो. सल्लू पन्नाशीचा दिसत नाही अजून.

तो सायकल चा शॉट कधी आहे? मस्त आहे एकदम. बाकी मिहीर फ ड्ण विसचा रिव्हू असाच आहे तुम्ही लिव्हल्या प्रमाणे. रिडिफ वरचे पेड वाटतात. फार जोरात प्रमोशन चालू आहे. टीव्हीवर.

मेरे बारे मे ज्यादा मत सोचना... दिल मे आता हु दिमाग मे नही>>> दिमाग मे नाहिये ते 'समझ मे'
मै सिर्फ दिल मे आता हू,समझमे नहि...काहिही

बाकि छान लिहिले आहे...सलमान्ला हीरो म्हणून पचवण कठीण झालय.हनुवटीचा फुगीर भाग्,म्हातारपणामुळे आला असेल

मला ह्या मुव्हीमध्ये नवीन अस काहीच पाहायला मिळाल नाही..त्यापेक्षा दबंग बरे होते...मुलांना वाचवण्यासाटि हिरो चोरि करतो हे काय पटला नाय्..तो कस करतो हे तर कुटेच दाखवल नाही...एक कळाल नाही हिरवीन पोलंडला का जाते?(का माझ नीट लक्ष नव्ह्ता) ...आता ते ब्लॅक मनी ट्रान्झ्क्शन ऑनलाईन करता येत नव्हता का पोलंडवरुन तो व्हीलन एवडे पैसे काय पोत्यातुन आणनार होता?आणी सलमान ने कसे आणले ते पण काय कळाल नाय..हिरोईन मानसोपचार डॉक का आहे?हा मुव्ही वॉन्टेड चा सिक्वेन्स वाटतो....
सलमान अक्षरशः कार्टुन वाटला...जय हो पण बकवासच होता...
सलमानने ईथुन पुडे दरवर्षी दबंग चे भाग काडुन आपल्या म्हातारपणाची सोय करावी माझ प्रामाणिक मत..(सलमान मला आवडतो तरिही)
१ नंबर परिक्षन उदय.

आणी सलमान ने कसे आणले ते पण काय कळाल नाय.. >>> बस पाण्यात नै का डुबली.. त्यातच वाहून गेले. आठवा देसी क्यों पी रहे हो डायलॉग ??

त्यातच वाहून गेले. आठवा देसी क्यों पी रहे हो डायलॉग ??
>>>
अरे हो की...माझा मुडच नव्हता तो मुव्ही पाहायचा...घरि फॅन्ड्री परत पाहीला असत तरि बर वाटल असत.
बर तो व्हीलन तरि कसा नेणार होता पैसे?

बर तो व्हीलन तरि कसा नेणार होता पैसे?
>>> त्या मिटींग रूममध्ये तर बाँड्स दाखवलेले ना काहीशे करोडचे...

पन तो शिवगजराज पण म्हणतो नोट गिन गिन के लेना Uhoh

थोडक्यात इंटरवल होतो .. बिग रिलिफ..>>> उदयदा थोडीशी मिस्टेक Sad
हिमान्शु त्यागी डेविल ची स्टोरी पण पहिल्या भागातच सांगतो . जॅकीताईची फ्लॅश्बॅक स्टोरी वात आणते पण रणदीपची नाही.

खरतरं इंटरवल जबर्दस्त वळणावर होतो .. आता उत्तरार्धात काहितरी भन्न्नाट पहायला मिळेल अशी भाबडी आशा वाटते Sad . पण जुगलबंदी तितकिशी रंगत नाही.

चित्रपटाचे संवाद चुरचुरीत म्हणण्यापेक्षा टायमिंगवर आधारीत असल्याने योग्यवेळी डिलिव्हरी झाल्याने फिट्ट बसतात.>>> त्या पोलिस स्टेशन्मधल्या सीनला जाम हसले होते मी . सलमान खान म्हणतो " ना ना करते प्र्यार हमिसे ..." आणि तो इन्स्पेक्टर म्हणतो " लो अभी महमद रफी बन गया है "
आणि -- पन तो शिवगजराज पण म्हणतो नोट गिन गिन के लेना>> यावेळी पण Happy

सलमान डेव्हिल मधेच जास्त शोभुन दिसतो >> एका शॉट मध्ये तो हिमाशु ला म्हणतो , तुम्हारी आंखे इतनी तेज है तो बता दो अभी मैं देवि हूं या डेविल ( असचं काहीतरी ) , भारी आवडला मला तो ( सलमान ) !

रणदीप हूडाचा पहिलाच सिनेमा बघितला मी बहुतेक . कसला किलर दिसतो तो पहिल्या सीन्मध्ये - ट्रेनमध्ये फुल शर्ट आणि स्लीवलेस स्वेटर. कसली खतरनाक स्माईल देतो तो Happy .

अर्धा बघून झालाय.. तेव्हढा तरी नक्कीच ओके.. सलमान, मिथुन ह्यांच्या एंट्री जबरी आहेत.. सलमानची गाडी जबरी आहे.. आणि मिथुनची सायकल पण..

पोलिसस्टेशनातला सीन जबरीच..

आचरट पिक्चर कसे काढावे हे सलमानच जाणो.. आणि लोकही जबरी रिस्पॉन्स देतात.. किकनी चेन्नै एक्प्रेसचा रेकॉर्ड मोडला म्हणे..

साउथच्या पिक्चरची कॉपी करुन तीनचार पिक्चर काढले सलमाननी आणि सगळेच जोरात चाललेत..

हिम्स्कुल अश्या चित्रपटाची तुलना चांगल्या चित्रपटांशी करु नये

या चित्रपटाची तुलना फक्त धुम्३ बरोबरच होउ शकते Wink

आबासाहेब ...................................तुमचा जाहीर निषेध Biggrin

Pages