Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे ऐकलेले की रितेश देशमुख
मागे ऐकलेले की रितेश देशमुख करणार होता हा शो? ते बारगळले का?
सेम आयडी ने कंमेंट टाकलीय
सेम आयडी ने कंमेंट टाकलीय तुम्ही पहिली ☺️
बादवे - असा शो येतोय माहीत नव्हते.. धन्यवाद। मजा येईल.
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?
मराठीत आला तरी बघण्याचे चान्सेस कमीच.. त्यात महेश मांजरेकर म्हणजे डोक्याला शॉट !
स्वप्निल जोशी नाहीतर रितेश देशमुख असता तर मजा आली असती...
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?> मी आहे.
मराठीत अला काय नी कन्नाडीत आला काय. बघणार नाहीच. मला ती कन्सेप्ट च पकाव वाटते.
कन्सेप्ट पकाव नाही वाटत मला.
कन्सेप्ट पकाव नाही वाटत मला. पण आपल्याकडे नकली मेलोड्रामा असतो त्यामुळे अर्थ उरत नाही. कधीतरी प्रोमोज वा कानावर आलेल्या न्यूजवरूनच त्या कार्यक्रमाची लायकी समजलेली.
आता मराठीत असेल तर बहुधा नुकत्याच संपलेल्या डेलीसोपमधील बेरोजगार कलाकार त्यात दिसतील.
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?>>>मी पण !!! कोणत्या चॅनेल वर आहे म्हणे हे ?
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?>> मी आहे..
मराठीत आला तरी बघण्याचे चान्सेस कमीच.. त्यात महेश मांजरेकर म्हणजे डोक्याला शॉट !>>+११
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?>> मी आहे..
मराठीत आला तरी बघण्याचे चान्सेस कमीच.. त्यात महेश मांजरेकर म्हणजे डोक्याला शॉट !>>+११११
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?>> मी आहे..
मराठीत आला तरी बघण्याचे चान्सेस कमीच.. त्यात महेश मांजरेकर म्हणजे डोक्याला शॉट !>>+१११११११
बर झाल नाही पाहिला अगदी फालतु
बर झाल नाही पाहिला अगदी फालतु आहे. येथे येणारे सेलिब्रिटीही अगदी खालावलेल्या मानसिकतेचे असतात. अपवाद पहिला पार्ट.
मला आवडते बिग बॉस, पण मी
मला आवडते बिग बॉस, पण मी काही विचार करुन बघत नाही, थोडावेळ मस्त टाईमपास म्हणुन बघते , त्या सास बहु ड्रामापेक्षा बरे
अन सलमान खानची होस्टींग पण खुप आवडते, बरेचदा फक्त त्यासाठीच बघते.
पण मराठीत नाही आवडणार असे वाटतेय, कारण महेश मांजरेकर >>>> बिग नो
फिल्म कलाकार मोस्टली येत
फिल्म कलाकार मोस्टली येत नाहित बिग बॉस हिंदी मधे.. म्हणजे फेमस, आत्ता कामात असलेले येत नाहित.. तसच इथे पण असेल कदाचित.. कारण २-३ महिने सलग वेळ द्यावा लागणार ना या सिरिअल ला..
मराठी येवढं ग्लॅमरस नाहिये.. त्यामुळे हिंदी मधे वादविवाद व्हावे म्हणुन मुद्दाम भलते लोक भरतात .. तसं इथे असेल तरच भांडण होतिल आणि लोक बघतिल..
बघुया नावं कळाली तर ठरवता येइल बघायचे की नाही
बिग बॉस तसही खुप बघणेबल नाही वाटत मला.. हिंदी बिग बॉसची लेव्हल तर पहिल्या सिरिज पासुन आत्ता पर्यन्त फार घसरली..पहिल्यांदा ओके होतं.. ओके ओके टास्क ओके लोकं आता आता एकदम घाण हिडिस करुन टाकलं हे सगळं..
मी सिझन -१ बघितला फक्त तो पण पुर्ण मन लावुन नाहिच... पण तेच तेच आणि फॉर्मॅट बोअर होउ लागलं..
फिल्म कलाकार मोस्टली येत
फिल्म कलाकार मोस्टली येत नाहित बिग बॉस हिंदी मधे.. म्हणजे फेमस, आत्ता कामात असलेले येत नाहित.. तसच इथे पण असेल कदाचित >>>> ज्यांच्याकडे काम आहेत ते नसत्तात या शिरेल मधे , पण एखाद गाजलेले असतात
सलमान ने तर बर्याच वेळा ऐकवलेले सुद्धा आहे की, काही काम नाही म्हणुन हे लोक ईकडे येतात, कदाचित या नंतर एखादा ब्रेक मिळेल म्हणुन
पहा मराठीत कोण
पहा मराठीत कोण काँट्रॉव्हर्षिअल आहे ते? साधारण राखी सावंत, राहुल महाजन सारखे लोक येतिल.
रीतेश देशमुख आणि शिल्पा शिंदे होस्ट करणार होते.
काँट्रॉव्हर्षिअल किंवा काही
काँट्रॉव्हर्षिअल किंवा काही हॅपेनिंग असणारे ना?
एक कुणीतरी सेक्सी बोल्ड रेमडोकी असते ना? त्यासाठी सई ताम्हणकर ठीक आहे.
सस्मित, सई ताम्हणकर...? अहो
सस्मित, सई ताम्हणकर...? अहो ती स्टार आहे. ईथे दुय्यम दर्जा कलाकार असतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण येस्स एक शक्यता आहे. टीआरpee साठी सईला सहज दोनेक एपिसोड गेस्ट म्हणून आणतील. अशी पद्धत असते का बिग बॉस मध्ये? नसेल तर सई साठी करतील. पण ती स्पर्धकांमध्ये कशी येईल
ईनफॅक्ट लेडी बिग बॉस म्हणून सईला ट्राय करता आले असते. सारखे जिथे तिथे पुरुषच काय ते बिग बॉस. मराठीत खरे तर हिरोईन जास्त ग्लॅमरस असतात हिरोंच्या तुलनेत..
अहो ती स्टार आहे>> काय
अहो ती स्टार आहे>> काय सांगतोस??? बरं राहुदेत. नको ती.
संचित पाटील, मुक्ता बर्वे,
संचित पाटील, मुक्ता बर्वे, धाकली सोनाली असे भरपूर फ्लॉप लोक आहेत ज्यांना चित्रपट मिळत नाहींयत. ते येतील.
कोमेडियन्स पण येतीलच.. वैभव मांगले, विशाखा वगैरे.
हे बिग बॉस कंटेस्टंट्स असतात
हे बिग बॉस कंटेस्टंट्स असतात त्यांना डेली पेमेंट प्लस विनिंग अमाऊंट (जो जिंकेल त्याला अर्थात) असे मिळते ना?
कोणत्या चॅनल वर?
किति वाजता? ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मराठी बिग बॉस ऑलरेडी सुरू आहे का?
१५ एप्रिल पासून सुरु होईल
१५ एप्रिल पासून सुरु होईल कलर्स मराठी वर.
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?>> मी आहे.. >>> मी पण .
एकंदरीतच बिबॉ बद्दल चवीने चर्चा करणार्या लोकांबद्दल मला फार कुतुहलमिश्रित आदर आहे
काही एपिसोडेस बघितले की मजा
काही एपिसोडेस बघितले की मजा येते हो. 5 मिन मध्ये काय कळणार.
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच
बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?> मी आहे.
मराठीत अला काय नी कन्नाडीत आला काय. बघणार नाहीच. मला ती कन्सेप्ट च पकाव वाटते.>>>+१११११
रितेश देशमुख हवा होता. म मां
रितेश देशमुख हवा होता. म मां ला बघायला नाही आवडणार मला . प्रोमो पण नाही आवडला.
काही एपिसोडेस बघितले की मजा
काही एपिसोडेस बघितले की मजा येते हो. 5 मिन मध्ये काय कळणार.
>>>>
5 मिनिट असे नाही हो. त्यासंबंधित न्यूज गॉसिप कानावर पडून समजतेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तरी तुम्ही काय मजा येते हे वर्णनासह सांगितल्यास कदाचित मराठी भाषेच्या गोडीने बघितला जाईल
संचित पाटील, मुक्ता बर्वे,
संचित पाटील, मुक्ता बर्वे, धाकली सोनाली असे भरपूर फ्लॉप लोक आहेत ज्यांना चित्रपट मिळत नाहींयत. ते येतील.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<<
आं ? मुक्ता बर्वे आणि फ्लॉप ???
आजच्या घडीची सर्वात बेस्ट अभिनेत्री आहे मराठीतली आणि नाटकाची निर्मातीही आहे मुक्ता, काम नसलेली तर अजिबात नाही !
Btw, एका मायबोली गणपतीला ऑलमोस्ट सुचवली होती मी ही स्पर्धा , “मायबोली बिग बॉस“, एकमेकांशी न पटणार्या आयडीजना एका बीबी वर डांबून एकत्रं टास्क करायला द्यायची १० दिवस
पण संयोजक मंडळाकडे पोचवली नाही, नुसताच गप्पांच्या बीबीवर गप्पा मारल्या.
बिग बॉस मी सुध्दा कधी पाहिलं नाही, पण कन्सेप्ट माहित आहे.
शिल्पा शेट्टी , सनी लिऑनी यांना नवीन आयुष्यं त्यामुळेच मिळालं म्हणे !
मुक्ता ज्या लेव्हलची कलाकार
मुक्ता ज्या लेव्हलची कलाकार आहे तिच्याकडे आयुष्यभर काम असेल.
सोनाली कुलकर्णीबाबत हेच म्हणता येणार नाही. पण एवढ्यात तरी तिच्यावर बिनकामाची वेळ येणार नाही.
संचित पाटील सध्या एका मालिकेत दिसतो. राधा प्रेम रंगी रंगली वगैरे काहीतरी नाव आहे.
सनी लिऑनी यांना नवीन आयुष्यं
सनी लिऑनी यांना नवीन आयुष्यं त्यामुळेच मिळालं म्हणे !
>>>>
मला तर वाटलेलं सनी मुळे बिग बॉसला टीआरपी मिळाला असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिग बॉसला काय फायदा झाला
बिग बॉसला काय फायदा झाला माहित नाही पण सनी लिऑनीला बॉलिवुडमधे एंट्री मिळाली.
ओके. सनी बिग बॉसमध्ये आलेली
ओके. सनी बिग बॉसमध्ये आलेली तेव्हा तिची बॉलीवूड एंट्री झाली नव्हती का? मला याची कल्पना नव्हती.
पण तरी बॉलीवूड बी ग्रेड चित्रपटांमधील वाढता बोल्डनेस पाहता तिचे दुकान तसेही चालले असते असे वाटते.
Pages