बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिग बॉस पहिली दोन वर्षे नीट बघितलं होतं, सोनी वर होतं बहुतेक. नंतर नंतर फार बोअर व्ह्यायला लागलं, अतिरेकीपणा वाढत गेला. त्यामुळे बघायचं बंदच केलं. काहीजण फार ज्येन्यूईन वाटायचे, तो एक नवीन ताजमहालचा हिरो, कुर्ग चा होता, मॉडेल. तो आवडलेला, अतिशय चांगला वागायचा सगळ्यांशी. कुठल्या सिझनमध्ये होता आठवत नाहीये. नावपण आठवत नाहीये.

झुल्फि(कार) सय्यद. राहुल महाजनबरोबर होता. पहिला सीझन. तेव्हा अर्शद वारसी अँकर होता ना?

राहुल महाजनला तर बिग बॉसमुळे नवं आयुष्य किंवा नवी आयुष्ये मिळाली.

के आर के नाहींहो, तो कुठे ज्येन्यूईन वाटायचा.

झुल्फिकारचं बहुतेक, तो आणि अजून एक चांगले होते फार त्या सिझनमध्ये, गायक होता इंडियन आयडॉलचा का सारेगमप चा विनर, राहुल महाजन सिझनच. पण तो पहिला सिझन नव्हता ना. पहिला राहुल रॉय जिंकला तो सिझन.

राहुल सिझनच. >>> तेव्हा आशुतोष (?) होता न विनर
नाव नक्की आठवत नाही पण तो रोडीज विनर होता

हो आशुतोष विनर झाला, राहुल महाजन बाहेर पडला आणि त्याने सर्व मतं माझी आशुतोष ला द्या सांगितलं. मला झुल्फि जिंकावा असं खूप वाटत होतं.

बरोबर. पहिला सीझन नव्हता तो..होस्ट शिल्पा शेट्टी होती.
पहिला विजेता राहुल रॉय.

राहुलसोबत मंदिरा बेदीही होती.््तिलाही नवजीवन मिळाले.
मराठीत अशी व्हरायटी कुठून आणणार?

मराठीत अशी व्हरायटी कुठून आणणार?
>>>

नक्कीच असेल.
फक्त अजून त्यांना नवजीवन मिळाले नसल्याने त्यांची नावे चटकन आठवणार नाहीत, सध्या ते तुमच्या आमच्या विस्मरणात आहेत ..

मला जर सिलेक्ट करायला सांगितले तर माझी wishlist (हिंदी big boss चा pattern आणि क्रायटेरियाज लक्षात घेउन) अशी असेल:

उषा नाडकर्णी (फटकळ कॅटेगरी)
सयाजी शिंदे (फटकळ कॅटेगरी)
मिलिंद शिंदे aka दादा होळकर (चक्रम कॅटेगरी)
विनोद कांबळी (स्पोर्टस् कॅटेगरी)
द्वारकानाथ संझगिरी (स्पोर्ट्स कॅटेगरी)
मिलिंद सोमण/समीर धर्माधिकारी (मॉडेल कॅटेगरी)
आर जे मलिश्का (रेडिओ/मिडीया)
सुयश टिळक/सुव्रत जोशी/ललित प्रभाकर (टीव्ही स्टार/ गुडबॉय कॅटेगरी)
प्राजक्ता माळी/मृण्मयी देशपांडे/सई गोखले/मृणाल दुसानिस (टीव्हीस्टार/गुडगर्ल कॅटेगरी)
प्रिया मराठे/ शनाया (ग्लॅमगर्ल कॅटेगरी)
रोहीत राऊत/ जसराज जोशी (म्युझिक)
शोभा डे (सनसनाटी कॅटेगरी)
प्रियदर्शन जाधव/विशाखा सुभेदार/अजित कोष्टी (कॉमेडी)
भरत दाभोळकर (ॲड इंडस्ट्री)
एखादा सोशल वर्कर/ॲक्टिव्हिस्ट
एखादा कॉमन मॅन रिप्रेझेंटीव्ह

ग्लॅमरस कॅटेगरीमध्ये मानसी नाईकला ठेवतील असे वाटतेय. तसेही तिच्याकडे सिरियल, चित्रपट, नाटके असे काही नाही. कुठल्याशा अ‍ॅवार्ड शो मध्ये नाच करत असते. आता अ‍ॅवार्ड शोचा सिझन नाही, तर तिला घेतील.

ई टीव्ही मराठीवर असाच एक "झुंज" म्हणून शो झाला होता. फॉर्मेट बिग बॉस सारखा नव्हता, पण रोडीज टाईप होता. त्यात पण पंढरीनाथ कांबळे, पुष्कर जोग असे कलाकार होते. २-३ एपिसोड पहिले होते.

बिगबॉसमध्ये LGBT साठी पण एक जागा राखीव असते. मराठीत असा सेलेब्रिटी स्टॅटस वाला कोणी आहे की नाही ते माहित नाही. पण बिगबॉसमध्ये आल्यावर सेलेब्रिटी होईल पण!

गायक कॅटॅगरीत अभिजित सावंत येऊ शकतो.

यात सनसनाटीपणा आणण्यासाठी मोस्ट्ली वरील नावं उपयोगाची नाहीत. बीबी मध्ये भांडणं हवीत, लावालावी, गॉसिप्स हवीत... पण तो मांजरेकर का आहे?

महागुरु सचिन पिळगांवकर बिगबॉस असते तर काय झाले असते कल्पना करा Wink
>>>>

कार्यक्रमाचा दर्जा वाढला असता.
त्यांच्या नृत्यावरच्या एक परीक्षक म्हणून कॉमेंटस अफाट असायच्या.
दुर्दैवाने लोकं आपल्याकडे जास्त बोलणारयाची खिल्ली उडवतात, पण त्याच्यातील बुद्धीमत्ता नाही बघत.
नवज्योतसिंग आणि त्याचे भाषाप्रभुत्व हे दुसरे उदाहरण.

गायक कॅटॅगरीत अभिजित सावंत येऊ शकतो.
>>>>
हो एक्चुअली.
पहिला ईण्डियन आयडल म्हणून तो आजही प्रसिद्ध आहे. तसेच त्याला स्वत:लाही नवसंजीवनीची गरज आहे.

>>दुर्दैवाने लोकं आपल्याकडे जास्त बोलणारयाची खिल्ली उडवतात,
तसे नाहीये ते...... आपल्याकडे जास्त बोलणारयाची स्वस्तुती करणाऱ्यांची खिल्ली उडवतात

बरोबर आहे, 'जास्तीचे' बोललेले एका पॉईंटनंतर उगाचच वाटू लागते. त्याचा परिणाम दुर्लक्ष किंवा खिल्ली उडण्यात होते.

>>राजकारणी कॅटेगरीसाठी नारायण राणेंचा विचार कताबदास्राका?<<

रामदास आठवले किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त कोणिहि जास्त टिआर्पी खेचु शकणार नाहि... Happy

स्वस्तुती करणाऱ्यांची खिल्ली उडवतात
>>>

ते देखील एक दुर्दैवच आहे. स्वस्तुती करणारयाची खिल्ली उडवली जाते. मात्र दुसरयावर टिका निंदा करणारयाचे बोलणे चवीने ऐकले जाते.

अर्थात हे हुमायून नेचर आहे. कोणी स्वत: स्वत:ची स्तुती करत असेल भले ती सौ टक्का खरी का असेना आपल्याला ती सहन होत नाही. त्यात खरे तर आपले काही जात नाही, तरी आपल्याला ते नाही आवडत.
पण एखाद्याचे दोष कोणी सांगत असेल तर कानाला एक समाधान मिळते. खरे खोटे नंतर, पण ऐकायला मजा येते.

महागुरूंला घेतलं तर सकाळी सकाळी उठल्यावर सगळे नाचतात तेव्हा 100 रुपयांच्या नोटा उडवेल नाचराण्यांवर

स्वस्तुती करणे आणि दुसऱ्यावर टिका करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रा.... एकीला वाईट म्हण्टले याचा अर्थ दुसरीचे समर्थन केले असा होत नाही!
अनावश्यक आणि प्रमाणाबाहेर केल्या तर दोन्ही वाईटच.... असो!

>>महागुरूंला घेतलं तर सकाळी सकाळी उठल्यावर सगळे नाचतात तेव्हा 100 रुपयांच्या नोटा उडवेल नाचराण्यांवर

हाहाहा!..... आणि त्या अमुकतमुक स्टेपमध्ये तुमचा हात पाहिजे तितका मागे गेला नाही किंवा चालीतली नजाकत जमली नाही म्हणून लगेच स्वता करुन पण दाखवेल आणि अमक्यातमक्याला आपण कशी ती स्टेप शिकवली याचा किस्सा पण सांगेल रंगवून Wink

एकीला वाईट म्हण्टले याचा अर्थ दुसरीचे समर्थन केले असा होत नाही!
>>>

हो नक्कीच. मी ते हुमायुन नेचर सांगितले. तुम्हाला उद्देशून नाही. तर कमीअधिक प्रमाणात सर्व मानवजातीला अनुसरून..
आता हा धागा संपेपर्यंतच बघा ईथे किती जणांवर टिका होईल आणि ती किती चवीने वाचली जाईल. अर्थात सेलिब्रेटींवर होणारी टिका हि गॉसिपिंग या गोड सदराखाली मोडते Happy

माझी wishlist :

मिलींद गुणाजी
निखील वागळे
नयना आपटे
रुजुता दिवेकर
वैभव मांगले
अश्विनी काळसेकर
साताराभुषण
महेश कोठारे
निवेदिता जोशी
श्वेता साळवे/साळवी (लालबाग परेल मधली)
आर्या आंबेकर
सुरज पवार
क्रांती रेडकर
पंकज विष्णु
वंदना गुप्ते
शशांक शेंडे

Pages