Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सोनाली ताई.हा धागा
धन्यवाद सोनाली ताई.हा धागा हवाच होता.
माझी आई सुद्धा रोज बघते, पण
माझी आई सुद्धा रोज बघते, पण ती सांगत असते त्यावरून थोडी typical storyline वाटते.
हा धागा कार्यक्रमावरती चर्चा
हा धागा कार्यक्रमावरती चर्चा करायला आहे असे वाटते.
_____
स्त्रियांनी नोकरी करावी की करु नये/ त्यांना कशी वागणूक मिळावी - या विषयावरचा हा धागा नसावा असे वाटते.
______
कॅन समवन ( मोस्टली लेखक) कन्फर्म प्लीज?
दुसऱ्या धाग्यावर याची चर्चा
दुसऱ्या धाग्यावर याची चर्चा वाचली. अतिसहनशील अलका कुबल टैप आता कुणाला पहायला फारसं आवडत नाही. मला तर मुळीच नाही. कारण जशास तसं, अरेला कारे असा माझा स्वभाव आहे.
हा धागा कार्यक्रमावरती चर्चा
हा धागा कार्यक्रमावरती चर्चा करायला आहे >> हो
स्त्रियांनी नोकरी करावी की करु नये/ त्यांना कशी वागणूक मिळावी - या विषयावरचा हा धागा नसावा असे वाटते.>>> पण ही मालिका त्या विषयावरच आहे.
मूळात मालिकेतल्या या घरातल्या बहूतांश लोकांना तिच्यावाचून आपले काही आडत नाही आणि तिला विशेष काही येत नाही असेच वाटते.
मी ही मालिका बघायचे.. हो
मी ही मालिका बघायचे.. हो बघायचे..मी बघायच सोडून दिल कारण आईला अस बघणे सहन शक्ति च्या बाहेर आहे... एका सीन मध्ये मुलगी आईला बर नाही अस सांगून तिच्या बाबांच्या मैत्रीणीला शाळेत स्टॉल लावायला घेऊन जाते..आणि जेव्हा आईला कळत तेव्हा ती react होतच नाही.. आई डोक्यावर पडलीय का??? मला अशी आई शोधून दाखवावी की जी मुलांची अरेरावी, खोटेपणा डोळे झाकून सहन करते... मूर्खपणाचा कळस आहे.. ह्या अश्या सुरुवातीवरून स्पष्ट होत की आईच्या सहनशीलतेचा डायरेक्टर कळस गाठेल एकदम अलका कुबल style मध्ये आणि मग suddenly आईचा makeover होईल आई सुपर women, confident बनेल... ह्या सगळ्यात 500 एपिसोड तर नक्कीच होतील
थोडक्यात जस्सी जैसी कोई नहीं
थोडक्यात जस्सी जैसी कोई नहीं या वळणानं जाईल ना ही मालिका?
माझ्या नवऱ्याची बायको च्या
माझ्या नवऱ्याची बायको च्या वळणाने जाईल हि सिरीयल.
धागा काढल्याबद्दल धन्यवाद !!!
धागा काढल्याबद्दल धन्यवाद !!!
मी रोज पहाते हि मालिका . मला खूप आवडते . बरच काही पटत नाही आहे.
पण तरीही बघावीशी वाटतेय !! (सध्यातरी :-))
माझ्या नवऱ्याची बायकोची मलाही
माझ्या नवऱ्याची बायकोची मलाही आठवण आली होती. पण त्यापेक्शा बरीच बरी आहे.
सुरुवातीला तीही बरीच होती वो.
सुरुवातीला तीही बरीच होती वो. तीनशे कोटी ची मालकिण बनली तरी कमी की काय म्हणून आता तीन हजार कोटींची मालकीण बनवून सोडतील रादाक्काला.
माझ्या नवऱ्याची बायको च्या
माझ्या नवऱ्याची बायको च्या वळणाने जाईल हि सिरीयल.>>>>थोडी वेगळी आहे. तिकडे फक्त नवर्याचे विबासं आहे इथे नवर्याचे विबासं, हाताबाहेर गेलेली college going मुलगी,लाडावलेला मोठा मुलगा,खाष्ट सासू इत्यादी आहे
भेळ भेळ असते! चुरमुरे, फरसाण,
भेळ भेळ असते! चुरमुरे, फरसाण, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो. (स्वजो आणि मुक्ताचा मुंपुमुं चा सीन आठवला..)
तसच कोणतीही सिरियल बघा. तेच तेच बघायला मिळणार. नवे कलाकार, नवीन नाव एवढाच काय तो फरक..
अलका कुबलच्या उमेदीच्या काळात
अलका कुबलच्या उमेदीच्या काळात ही वा अश्या मालिका असायला हव्या होत्या.
निलिमा पात्र डोक्यात जाते. ती
निलिमा पात्र डोक्यात जाते. ती नसती तरी चालले असते
आईचे पात्रं डोक्यात जाते. ती
आईचे पात्रं डोक्यात जाते. ती नसती तरी चाललं असतं
स्मिताताई,मला असे म्हणायचे
स्मिताताई,मला असे म्हणायचे होते की संजना, कांचन, विशाखा, अनिरुद्ध, ईशा,अभिषेक इतके खलनायक असताना या निलिमाची भर कशाला?
मी ते मस्करीत लिहिलंय. निलीमा
मी ते मस्करीत लिहिलंय. निलीमा कोण आहे?
मी ते मस्करीत लिहिलंय.>>>>मग
मी ते मस्करीत लिहिलंय.>>>>मग ठीक आहे
निलीमा कोण आहे?>>>>निलिमा अरुंधतीची जाऊ आहे
सासू मजेशीर आहे.... खाष्ट
सासू मजेशीर आहे.... खाष्ट असली तरी.
ओके
ओके
सासू मजेशीर आहे.... खाष्ट
सासू मजेशीर आहे.... खाष्ट असली तरी.>>>>हो.तिची आणि अप्पांची नोकझोक मस्त असते
सासू मजेशीर आहे.... खाष्ट
सासू मजेशीर आहे.... खाष्ट असली तरी.>>>>हो.तिची आणि अप्पांची नोकझोक मस्त असते ++++
अप्पा डान्स ची प्रॅक्टिस करताना चुकून "अगं अर्चना" म्हणाले "अगं कांचन" ऐवजी
अर्चना पांढरे-पाटकर ला हाक मारताना
निलीमा हे पात्र जसे च्या तसे तीच कलाकार "का रे दुरावा" मधली
अगदीच अनावश्यक आहे. आणि तिचा नवरा म्हणजे अप्पा-आजींचा मुलगा अजून दाखवलाच नाही, नुसताच त्याचा ऊल्लेख आलाय.
शीतल क्षीरसागर दिसली आज मला.
शीतल क्षीरसागर दिसली आज मला. ती कोण दाखवली आहे.
शीतल क्षीरसागर दिसली आज मला.
शीतल क्षीरसागर दिसली आज मला. ती कोण दाखवली आहे.>> तिच ती निलीमा, आईची जाऊ.
कालच्या भागात शेखरने (संजनाचा
कालच्या भागात शेखरने (संजनाचा नवरा) संजना(अनिरुद्ध ची कलिग,जिचा बॉस अनिरुद्ध आहे) आणि अनिरुद्धचा(अरुंधतीचा नवरा) फोटो काढला आहे.पुढील भागात अभिषेक म्हणतो आहे की मला हा साखरपुडा करायचा नाही
मागे एक हिंदीत सेम अशी सिरियल
मागे एक हिंदीत सेम अशी सिरियल आली होती. नाव आठवत नाही.
भेळ आहे ही सिरियल. मुले,नवरा
भेळ आहे ही सिरियल. मुले,नवरा,सासु,नातलग अनेक ट्रॅक्स एकाच ठिकाणी
Mr.and mrs. अधिकारी,
Mr.and mrs. अधिकारी, देशमुखांच्या व्याह्यांचा मुलगा तोच जो ईशाला blackmail करतो। typical serial coincidence. :वैतागलेली बाहुली:
काल झाला एकदाचा साखरपुडा.
सॉरी सॉरी. व्याह्यांचा मुलगा नाही. व्याह्यांच्या मित्राचा मुलगा. झाला एकदाचा साखरपुडा. पुढील भागात मध्ये संजना मुलाला घेऊन अरुंधतीकडे रडत रडत येते. ती बहुतेक रहायला आली आहे
Pages