कास

कास (मॅक्रो)

Submitted by प्रकाश काळेल on 19 September, 2016 - 05:13

कॅमेरा : NIKON D5500
लेन्सः NIKKOR 50mm 1.8g with Vivitar 10X Macro filter
दिनांक: ६ सप्टेंबर २०१६
#१

#२

#३

#४

#५

कास पठार

Submitted by सॅम on 2 October, 2014 - 04:17

या weekendला पुण्यावरुन कास-ठोसेघर करुन आलो. मुंबईतील एका बाइकर ग्रुपबरोबर गेलो होतो.
दिवस १: पुणे-सातारा-कास-बामणोली. कासला मुक्काम.
दिवस २: कास-ठोसेघर-मेढामार्गे महाबळेश्वर-वाई-पुणे
* एकुण ४०० किमी.

* कास-बामणोली रस्ता बाईकर्ससाठी मस्त आहे.
* महाबळेश्वर-पाचगणी रस्ता सध्या खराब झालाय.
* सातारा-कास रोडवर बरीच हॉटेल्स आहेत (निवांत, गोकुळ, प्रकृति, MTDC). त्यांच्या गुणवत्तेची कल्पना नाही कारण आम्ही एका बंगल्यात राहिलो होतो.

शब्दखुणा: 

निसर्गाचीये 'कास' धरोनी..

Submitted by वरुण on 30 December, 2012 - 23:52

निसर्गाचीये 'कास' धरोनी..

जणु निसर्गाचीये 'कास' धरोनी
लिवले मथळ्यांवर मथळे भरोनी
प्रसारमाध्यमे राहिली अतिरेक करोनी
पुरे करा आता ही प्रसिद्धी थांबवोनी

'' अहो या शनिवार-रविवार सुट्टीचे काय नियोजन आहे !?'' ''थोडं गुगलून काही नवीन पिकनिक स्पॉट हुडकून ठेवा.''
''अरे विन्या, या विकेंडला सॉलिड धुमाकूळ घालूया., तु, मी, तुष्या, अभ्या आणि आपल्या गेंग बरोबर राडा करू तिकडे...
सगळ्यांनी बाईक काढायच्या की पक्याची XUV काढायला लावायची !? ठीके ठरलं मग.. ओल्या सुक्याच पण बघा रे लेको ..''
'' शोभाताई कधी सुरु होतोय सिझन !? या वेळची भिशी तिकडेच घेवू जवळच्या resort मध्ये,

कासच पठार आणि आमचं वरातीमागुन आलेलं घोडं

Submitted by झकासराव on 14 November, 2011 - 06:59

नमस्कार मंडळी!!
आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ...

कासच पठार अफाट आहे. विस्ताराने, सौंदर्याने आणि विविधतेने संपन्न अस हे पठार.
तिथे आपल्याला अनेक प्रकारचे लोक आलेले दिसतील, हौशे, नवशे, गवशे, कचरा करणारे, कचरा होउ न देणारे, कचरा साफ करणारे, फोटोसाठी आलेले, ये कास कीस चिडिया का नाम है बघुन येवु असा आविर्भाव असलेले, अजुन एक वीकेंड साजरा करण्यासाठी आलेले, सगळ्यानी पाहिल म्हणुन आपणहि बघु म्हणून आलेले,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ती फुलराणी

Submitted by माधव on 14 December, 2010 - 06:44

गुलाब, ग्लॅडीओलस, कार्नेशन अशा फुलदाणीत दिमाखाने मिरवणार्‍या अथवा जास्वंद, मोगरा, झेंडू, शेवंती अशा देवघर प्रसन्न करणार्‍या फुलांपेक्षाही वेगळी अशी एक फुलांची दुनीया असते - रानफुलांची किंवा गवतफुलांची! पण ह्या फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर आपली दृष्टी बदलावी लागते. नाहीतर त्या फुलांचे सौंदर्य तर सोडाच पण ती फुले नजरेस पडणे पण अवघड असते. ह्यातली बरीचशी फुले नखाहूनही लहानशा आकाराची असतात. ह्या फुलराणीला पहायची खरी मजा हिरव्यागार मखमालीवर खेळतानाच येते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कास