गुलाब, ग्लॅडीओलस, कार्नेशन अशा फुलदाणीत दिमाखाने मिरवणार्या अथवा जास्वंद, मोगरा, झेंडू, शेवंती अशा देवघर प्रसन्न करणार्या फुलांपेक्षाही वेगळी अशी एक फुलांची दुनीया असते - रानफुलांची किंवा गवतफुलांची! पण ह्या फुलांचे सौंदर्य बघायचे असेल तर आपली दृष्टी बदलावी लागते. नाहीतर त्या फुलांचे सौंदर्य तर सोडाच पण ती फुले नजरेस पडणे पण अवघड असते. ह्यातली बरीचशी फुले नखाहूनही लहानशा आकाराची असतात. ह्या फुलराणीला पहायची खरी मजा हिरव्यागार मखमालीवर खेळतानाच येते. एखाद्या लहान बाळाशी खेळताना जसे आपण आपले सगळे व्याप बाजूला ठेवतो, निवांतपणे जमिनीवर फत्कल मारून त्यांच्याशी खेळतो तोच निवांतपणा ही फुले बघतानाच हवा. आणखी एक म्हणजे आपला माणूस असण्याचा तोरा विसरून, त्यांच्याएवढे लहान होऊन, त्यांच्या पानळीवरून त्यांना पाहिलेत तर ती तुम्हाला खरेखुरे दर्शन देतील.
ही आहेत कासच्या पठाराची निसटती ओळख--
तेरड्याचा रंग
तेरडा, सफेद गेंद आणि सितेची आसवे
कास सादर करत आहे मिकी माऊस (स्मिथीआ)
सोनकी
सफेद गेंद आणि सितेची आसवे
जांभळी मंजिरी
सब्जा
भारंगी (हिच्या पानांची भाजी करतात)
हत्तीची सोंड (Vigna Vexillata) हे एक खास फूल आहे. किटक मधाच्या लालसेने सोंडेसारख्या भागावर बसतो आणि केंद्राकडे जायला लागतो. जसा तो आत जातो तसे त्याच्या वजनाने फुलाचे पुकेसर नळीसारख्या भागातून बाहेर येतात आणि किटकाच्या अंगाला चिकटतात.
टोपली कारवी - ही ८ वर्षांनी बहरते. इतर वर्षी चुकार फुलेच दिसतात. हिची झुडपे उलट्या टाकलेल्या टोपलीसारखी दिसतात म्हणून टोपली कारवी.
आभाळी
निलवंती
आभाळी आणि निलवंती ही दोन्ही सायनोटीस कुळाटील आहेत. याच कुळातील नभाळी पण कासला दिसते.
अबोलिमा - शांत शालीन सौंदर्य
दुधाळी - फाद्यांच्या खास रचनेमुळॅ वर्गमूळ असेही म्हणतात.
मराठी नाव माहित नाही पण शास्त्रीय नाव Pinda Concanensis.
आरारुट
तेरड्याचा एक प्रकार - किटक उतरण्याकरता एक आदर्श धावपट्टी
कॉमेलीना
व्वाव...! खूपच छान..
व्वाव...! खूपच छान..

प्रकाशचित्रे विभागात जास्त शोभेल अस वाटतय मला....
मस्तच फोटोग्राफी...
http://merakuchhsaman.blogspot.com/
अर्रे झक्कास! काय सुरेख फोटो
अर्रे झक्कास!
काय सुरेख फोटो आहेत!
बाकीचे पहायलाही आवडतील.
वाह मस्तच!
वाह मस्तच!
खूप छान!!!
खूप छान!!!
मस्त
मस्त
हे काय इतकेच ? समाधान नाही
हे काय इतकेच ? समाधान नाही झाले, अजून हवेत.
त्या मिकिमाऊसचा एक वेगळा प्रकार आहे आमच्याकडे. मग स्वतंत्रपणे पोष्टीन.
माधव, खुप छान... अप्रतिम....
माधव,
खुप छान... अप्रतिम....
मस्तच आलेत फोटो...
मस्तच आलेत फोटो...
सुंदर एकदम!
सुंदर एकदम!
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर, सितेची आसवे? फुलांना
सुंदर,
सितेची आसवे? फुलांना अस नाव असत? मजेशीर आहे हे.
वरून ३रा आणि शेवटचा झकास!
वरून ३रा आणि शेवटचा झकास! सुंदर रंग!!
सुं द र
सुं द र प्रकाशचित्रे!!!
सितेची आसवे? फुलांना अस नाव असत? >>>>श्यामली या फुलांचे नाव "सितेची आसवे" असे करूण असले तरी त्या फुलांची जात "किटकभक्षी" वर्गात मोडते.
वाह!
वाह!
मस्त.. पण अजून फोटो बघायला
मस्त.. पण अजून फोटो बघायला नक्कीच आवडतील..
माधव, खासच! ..पण पोट भरलं
माधव, खासच! ..पण पोट भरलं नाही राव...अजून येऊदे!
पण पोट भरलं नाही राव.>> हो ना
पण पोट भरलं नाही राव.>> हो ना लगेच संपल्यासारखे वाटले..
सगळ्यांना धन्यवाद! काल
सगळ्यांना धन्यवाद! काल अनावधनाने प्रकाशीत झाले. आज पूर्ण केले आहे.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सुंदर मनमोहक फोटोज !
सुंदर मनमोहक फोटोज !
सगळेच फोटो खास..
सगळेच फोटो खास..:स्मित:
सुरेख!!
सुरेख!!
सुंदर सुंदर
सुंदर सुंदर
मन बहरलं बघताक्षणि.....
मन बहरलं बघताक्षणि.....
अफलातुन मित्रा... प्रचि 2, 5,
अफलातुन मित्रा... प्रचि 2, 5, 8, 9, 10 तर अप्रतिमच
बास, आता पुढच्या वर्षी कास पठार नक्की...
प्रचंड भारी!
प्रचंड भारी!
अति सुंदर मित्रा
अति सुंदर मित्रा
.................रान फुलांची मस्त ओळख झाली.
छानच आहेत
छानच आहेत
सुंदर!
सुंदर!
मस्तच आहेत सगळे फोटो.
मस्तच आहेत सगळे फोटो.
Pages