सहिष्णुता

आपण त्या दिशेने जाऊ?

Submitted by आशयगुणे on 19 February, 2016 - 16:10

मी अमेरिकेत असताना आमच्या विद्यापीठात 'स्टूडंत असोसियेशन' अतिशय सक्रिय होते. तिथल्या प्रमुख विद्यापीठातील तशी संस्कृतीच आहे. आपली 'भारतीय स्टूडंत असोसियेशन' देखील तिथल्या प्रत्येक विद्यापीठात सक्रिय भूमिका बजावत असते. अर्थात ती भूमिका गणतंत्र दिवस, स्वातंत्र्य दिन, गणपती आणि दिवाळी ह्यात अधिक गुंतलेली असते. म्हणजे गुंतू नये असे नाही, पण त्याच्या बाहेर ज्या देशात आपण आलो आहोत त्याबद्दल जाणून घेणे ही इच्छा खूप कमी लोकांच्या मनात असते. नाहीच जवळ-जवळ!

ना सहिष्णु ना असहिष्णु --- केवळ सकारात्मक

Submitted by सुमुक्ता on 3 December, 2015 - 08:53

सहिष्णुता --- असहिष्णुता वरून सध्या जे रान माजते आहे. मी ठरविले होते की ह्या विषयावर लिहायचे नाही पण आता राहवत नाही. भारतात असहिष्णुता वाढत आहे असे कोणी म्हटले की फार वाईट वाटते. कारण हे नाही की येथे असहिष्णुता नाहीच आहे. कारण हे आहे की समाजात असे कित्येक लोकं आहेत ज्यांना समाज आपल्यासाठी जबाबदार आहे असे वाटत असते. पण आपण समाजासाठी जबाबदार आहोत असे वाटतच नाही.

विषय: 

सहिष्णुता

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

इतक्यातच Black Adder नामक जुनी (१९८२) टिव्ही सिरीज पाहणे सुरु केले.
http://www.imdb.com/title/tt0084988/
पंधराव्या शतकातील ईंग्लीश राजघराण्यावर (कल्पीत) व चर्चवर (बहुदा कल्पीत) आधारीत विनोद आहेत. अनेक उत्कृष्ट. अनेकदा टोकाचे. असे प्रकार पाहुन सहिष्णुतेबद्दल पुनर्विचार करावासा वाटतो. कोणत्याच खर्या ख्रिश्चन व्यक्तीला ती सिरीज आवडणार नाही. पण ती बनते, चालते. हीच का सहिष्णुता?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

षंढ ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 December, 2010 - 23:59

सामर्थ्याचे बदलते परिमाण...
अन् संस्कृतीचे षंढ संदर्भ...
कसाब, अफजल...
तथाकथित उदात्त संस्कृती...(?)

सत्ता, सामर्थ्य ....
दहशतवादाचे राजकारण...
अन् सहिष्णुतेच्या ओझ्याखाली दबलेले...
कोवळ्या मानवतेचे निरागस, निष्प्राण गर्भ !

हम्म्म्म....
सांत्वनाच्या अगतिक.., क्षीण मेणबत्त्या....
आणि गंगातीरावर उसळलेले आगीचे कल्लोळ...
एके ५६, आर. डी.एक्स. अन् बरबटलेली मने..,
निषेधाचे खलिते, संयमाचे (?) नियम अन सौहार्दाचे थोतांड....

कुठलाच हिशोब लागत नाहीये....
समाजकारणाची समीकरणे...
सोयिस्कररित्या बदलेली....!
स्वार्थासाठी सगळीच गणिते चुकवलेली...

आपण दुसरे करणार तरी काय....

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सहिष्णुता