सहिष्णुता
इतक्यातच Black Adder नामक जुनी (१९८२) टिव्ही सिरीज पाहणे सुरु केले.
http://www.imdb.com/title/tt0084988/
पंधराव्या शतकातील ईंग्लीश राजघराण्यावर (कल्पीत) व चर्चवर (बहुदा कल्पीत) आधारीत विनोद आहेत. अनेक उत्कृष्ट. अनेकदा टोकाचे. असे प्रकार पाहुन सहिष्णुतेबद्दल पुनर्विचार करावासा वाटतो. कोणत्याच खर्या ख्रिश्चन व्यक्तीला ती सिरीज आवडणार नाही. पण ती बनते, चालते. हीच का सहिष्णुता?
की सहिष्णुता म्हणजे तुम्ही तुमच्या देवाची पुजा करा आम्ही आमच्या करु. तुम्ही जोपर्यंत आमच्या देवाला वाईट म्हणत नाही तो पर्यंत आमच्या सारखे सहिष्णु कोणीच नाही. तुम्हीच काय, आमच्यातीलही कोणी आमच्या देवांना नावे मात्र ठेवायचे नाहीत.
सहिष्णुता ही देवादिकांबाबतच असते का? असावी का?
सह् या धातुपासुन निर्मीत हा शब्द सहन मध्ये पण आढळतो व तोच त्याचा अर्थ.
http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/cgi-bin/monier/serveimg.pl?file...
पण शेवटी सहन तरी किती करायचे? जो पर्यंत करु शकतो सहन तोपर्यन्त आमच्यासारखे सहिष्णु कोणीच नाही.
सहिष्णुता हा शब्द फक्त
सहिष्णुता हा शब्द फक्त देवादिकांबाबतच लागू नाही आणि नसावा. सहिष्णुता ही अनेक बाबतीत, अगदी रोजच्या दिनचर्येत कसाला लागली जाते. "क्षमा"भाव असणे हा त्यातील महत्वाचा मुद्दा असतो.
कुठे जशास तसे वागावे, कुठे एका ठोश्यास दोन द्यावेत, कुठे समोरच्याला समजून घेऊन शांत रहावे, कुठे समोरच्याची कृती आपल्याला विरोधी असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन आपला मार्ग चालत रहाण्याचे ठरवावे हे त्या त्या परिस्थितीवर आणि उपद्रवकर्त्यावर ठरते. फक्त आपलं मन शांत नसेल तर समोरच्याची जराशी आगळीकही आपल्याला पुर्ण ढवळून काढते, जर शांत असेल तर तेवढ्याच मुद्द्याला धरुन आपण प्रतिकार करुन पुढे आपल्या मार्गावरुन नेहमीप्रमाणे चालू शकतो. कधी ३-४ वेळा संधी देऊन, पुढच्या वेळेस निव्वळ पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपल्या वाटेला गेलेल्यास त्याची जाणिव करु देणे आवश्यक ठरते. उठसूठच्या कुरापतींना उत्तर नाही दिले तर ती सहिष्णुता न ठरता बावळटपणा ठरेल. परत, त्या कुरापती गैरसमजामुळे आहेत की सवयीमुळे आहेत यावरही प्रतिक्रिया ठरते.
पण एकंदरीत, शक्यतो शांत रहावे. सतत खदखदत राहिले तर आपलेच भावविश्व कलुषित होते. देवादिकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ज्याचा "सबका मालिक एक" यावर विश्वास आहे तो दुसर्याच्या श्रद्धास्थानांना ठेच लावणार नाही. अल्ला म्हटलं तरी तोच, श्रीहरि म्हटला तरी तोच. पण हे न मानणार्यांपैकी कुणी जाणूनबुजून दुसर्याच्या श्रद्धास्थानाची आगळीक करायचा प्रयत्न केला तरी धोंड्यास धोंडा, डोळ्यास डोळा ह्या न्यायाने आपण वागू नये. प्रतिकार जरुर करावा पण तो व्यक्ती पातळीवरच आणि फक्त पुन्हा असं घडू नये इतकी जरब बसण्या इतपतच. कुणा नाठाळाने कुठल्या मुर्तीला xxxxचा हार घातला तर त्याचं कर्म त्याच्याजवळ. त्यापायी आपण दंगे धोपे घडवून अजून खालच्या पातळीला जाण्यात काय अर्थ आहे?
वरील सर्व माझं वैयक्तिक मत
देवादिकांना आणि मर्त्य
देवादिकांना आणि मर्त्य लोकांना एकाच तराजुने तोलणे कितपत योग्य?
Anyway, इतर ठिकाणी सहिष्णुत्वाबद्दल वेगळ्या गुद्द्यांवरुन चर्चा होते आहेच. तसेही आपल्याला आपणच सर्वात सहिष्णु वाटणे असाहजीक नाही.
देवादिकांना आणि मर्त्य
देवादिकांना आणि मर्त्य लोकांना एकाच तराजुने तोलणे कितपत योग्य?
>>> देव ही संकल्पना सश्रद्ध लोकांसाठी फार वरच्या पातळीवरची असली तरी तो भाव मात्र मर्त्य असलेल्या सश्रद्ध लोकांच्या मनातच नांदत असतो. माणसाच्या मनात अनेक भाव भावनांची दाटी असते, त्यातल्या कुठल्याही भावनेला धक्का पोहोचला तर आपण किती शॉकप्रूफ आहोत हे व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असते.
आता माझं उदाहरण प्रामाणिकपणे द्यायचं झालं तर कुणी मला कुठल्याही कारणाने शिव्या घातल्या आणि जर माझ्या हेतूबद्दल मी प्रामाणिक असेन तर माझा हेतू जसाच्या तसा त्या व्यक्तीपर्यंत न पोहोचल्याबद्दल थोडावेळ मी अस्वस्थ होईन पण नंतर मी त्या शिव्यांची किंवा शिव्या घालणार्याची फिकिर करणार नाही. पण जर कुणी भगवंताला शिव्या घातल्या, तर मी उलट त्याच्या श्रद्धास्थानाला शिव्या घालून माझं अधःपतन नक्कीच होऊ देणार नाही. त्याऐवजी मला त्या शिव्या घालणार्याबद्दल "अरेरे" असंच वाटेल. असं करणारा गुंड असेल तर त्याची समजूत घालायला अज्जिबात जाणार नाही. सामान्य व्यक्ती असेल तर ज्याचा त्याचा मतप्रवाह म्हणून सोडून देईन आणि माझं मत त्यापेक्षा वेगळं आहे हे जाणवून देईन. त्या व्यक्तीला उलट अपशब्द नाहीच नाही कारण तो सर्वसाक्षी चूक बरोबर काय ते ठरवील ही भावना मनात असते.
----
इतर ठिकाणी सहिष्णुत्वाबद्दल वेगळ्या गुद्द्यांवरुन चर्चा होते आहेच. >>> ते शेकड्यांनी पोस्ट्स असलेले दोन तीन धागे मी या बाफवरची पोस्ट लिहिल्यानंतर थोडेसे वाचले. त्यामुळे वरची प्रतिक्रिया पुर्णपणे स्वतंत्र आहे.
सेही आपल्याला आपणच सर्वात सहिष्णु वाटणे असाहजीक नाही. >>> असहमत. प्रत्येकाला नक्की माहित असते की कुठल्या मुद्द्यावरुन आपण सहज गुद्द्यावर (शब्दशः नव्हे) येऊ शकतो आणि कुठल्या मुद्यावर आपण जास्त सहनशील आहोत. प्रत्येकाची सहिष्णुता प्रत्येक मुद्द्यासाठी वेगवेगळी असू शकते आणि ती देखिल परिस्थिती आणि मूडवर बदलू शकते. फक्त प्रयास करण आपल्या हातात आहे. शांत रहाण्याची प्रॅक्टीस केली तर थोडी सुधारणा आपल्यात होऊ शकते. पुर्ण सहिष्णु असायला आपण संत नाही.
पलिकडल्या गल्लीतील बाईंना भांडणात कुणी काही वेडवाकडं बोललं तर "हे असं बोलणं चूक आहे" असं आपण बोलू. पण आपल्या आईला/मातृभूमीला कुणी काही बोललं तर तिळपापड होईलच. २६ नोव्हेंबरला टिव्ही बघताना तळपायाची आग मस्तकाला जाणे, कपाळाची शीर तडतड उडणे, धाय मोकलून रडणे, आत्ताच्या आत्ता जाऊन पाकिस्तानवर बाँब टाकून यावा अशी अशक्य कोटीतली इच्छा उसळून वर येणे वगैरे अनुभवलं आहे.
असो, आजूबाजूला गदारोळ उठलेला असताना सहिष्णुतेवर अजून काय चर्चा करणार?