माझी

चित्र -तुझं आणि माझं

Submitted by नादिशा on 6 September, 2020 - 00:55

माझा मुलगा स्वयम चांगली चित्रे काढतो. पण तो खूप चंचल आहे, चिकाटी कमी आहे त्याच्याकडे. फार लवकर Bore होतो तो. मूड असेल, तेव्हा चित्र काढतो. पण एकदाच. त्याच्यात काही सुधारणा सुचवल्या, की मग बिघडलेच.. लगेच bore झाले, आता मी टीव्ही पाहतो, आता मी अभ्यास करतो, असे चालू होते त्याच्या.
म्हणून त्याला motivate करण्यासाठी त्याचे पप्पा आणि मी खोटी खोटी competition ठेवतो त्याच्याशी.
त्यातलीच ही काही चित्रे -

काल शिक्षक दिनानिमित्त मी वारली मध्ये आणि स्वयम ने त्याच्या drawing ने शुभेच्छा दिल्या

मी तुझ्या नभातले तारे ...

Submitted by प्रकाशसाळवी on 18 June, 2017 - 08:50

मी तुझ्या नभातले तारे...
-----------------
मी तुझ्या नभातले तारे मोजले काही
यात मी काय शोधिले मला समजले नाही
**
सुखाच्या वेलीवर होती चार फूले दू:खाची
सुख - दू:खाच्या साथीने जिवन समजले नाही
**
मी जागलो शब्दांना तुझ्या, शब्द फुले होवून गेली
कोमेजली फुले परंतु शब्द कोमेजले नाही
**
स्वर हे साथ देतील, तू गावू नको वीराणी
जीवनाचे खरे गाणे अजून ऊमजले नाही
**
प्रकाश साळवी
११-०५-२०१७
०९१५८२५६०५४

शब्दखुणा: 

विस्मृतीत माझ्या ...

Submitted by प्रकाशसाळवी on 17 June, 2017 - 02:34

विस्मृतीत माझ्या ...
***
विस्मृतीत माझ्या ...
----------------
विस्मृतीत माझ्या तुझाच ध्यास आहे
गंधाळलेल्या फुलांना तुझाच वास आहे
**
बोलावण्यास तुजला वापरु शब्द कोणते?
तु ना येण्याची खंत मृगजळास आहे
**
आठवती सरी ज्या भिजवून रात्र गेल्या
वीरहात तुझ्याही मजला मधुमास आहे
**
विसरलास जरी तु त्या दिल्या वचनांना
तो चंद्रही साक्ष त्याची आज खास आहे
**
नसण्याने तुझ्या लागले जिवनाला ग्रहण
ठाऊक आहे मला ते ग्रहण खग्रास आहे
**
थोडे ऊन थोडा पाऊस हे काय आहे?

शब्दखुणा: 

माझी एखादी कविता

Submitted by pkarandikar50 on 14 February, 2016 - 22:27

माझी एखादी कविता

आलो होतो मी कुठे,
सांगायला तुम्हाला की
मी लिहितो, तुमच्यासाठी?
पण भेटलोच आहोत तर,
थांबा की जराशी, वाचून पहा,
माझी एखादी कविता?

नका बसू लावत अर्थ तिचे
अशानेच होतात अनर्थ अर्थांचे.
निरर्थक प्रवासाची जुजबी टिपणे,
तेव्हढ्याच निरर्थक अव्याहताची.
अथांग, अनंत पसरट रेतीवरची,
बडेजावी पाऊले, एका हव्यासाची…

करून तिरपी सुरई चांगली,
घ्याल भरून प्याला काठोकाठी,
हाता-तोंडाशी लावण्या खारे चणे,
जोडीला तशाच माझ्या रुबाया-गज़ला.

जाईल चढत घेऊन ती वरवर,
जशी विस्मृतीच्या हल्लक ढगांवर
तरंगाल, तुम्ही जेंव्हा, किंवा
इरसाल ती बया उतरेल,बघता बघता,

माझी कविता ..........!!

Submitted by मकरन्द जामकर on 5 May, 2012 - 00:13

कवितेस शब्दी ,
बांधु कि ,
मलाच शब्दात ,
बांधु मी ?

चाकरमानी ,
ती शब्दांची ,
का म्हणू,
मान्य मी ?

मस्त कलंदर,
एक अवलिया,
मजला मीच,
जाणे मी !!

निपजते जर,
कविताच "हटके"
का म्हणू,
सामान्य मी ?

प्रतिभेस वेसनी,
नभास गवसणी,
का न म्हणू,
अमान्य मी ?

जागीर त्या,
प्रस्थापितांची,
का करू ,
मान्य मी ?

खबरदार .....!!
"सोशल",कावल्यांनो,
का मुलाहिजा ,
बाळगावा मी ?
माझीच ती कविता,
अन कवितेचा मी !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता माझी....!

Submitted by मस्तराम on 28 January, 2011 - 15:00

कविता माझी फुलत होती,
श्वासासंगे उमलत होती ,
गंध नव्या स्वप्नांचा लेवून,
कविता माझी बहरत होती...

कविता माझी निरागसतेची ,
तिला न कल्पना सत्याची,
सोंग वेड्या आशेचे घेवून,
कविता माझी जगत होती...

कवितेचा का असा लळा ?
रंग तिचा का असा वेगळा ?
त्या रंगातून जणू ती,
चित्र प्रेमाचे चितारत होती....

का क्षणात व्हावे असे कळेना,
कवितेशी माझा सूर जुळेना,
कविता काही सांगेना,
माझ्याशी काही बोलेना.....

मनात शिरून तिच्या पाहिले,
तेव्हा उघड गुपित झाले,
कविता माझी मनात होती आणि .....
रस्त्यावर तुझी वरात होती !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझी