Submitted by मकरन्द जामकर on 5 May, 2012 - 00:13
कवितेस शब्दी ,
बांधु कि ,
मलाच शब्दात ,
बांधु मी ?
चाकरमानी ,
ती शब्दांची ,
का म्हणू,
मान्य मी ?
मस्त कलंदर,
एक अवलिया,
मजला मीच,
जाणे मी !!
निपजते जर,
कविताच "हटके"
का म्हणू,
सामान्य मी ?
प्रतिभेस वेसनी,
नभास गवसणी,
का न म्हणू,
अमान्य मी ?
जागीर त्या,
प्रस्थापितांची,
का करू ,
मान्य मी ?
खबरदार .....!!
"सोशल",कावल्यांनो,
का मुलाहिजा ,
बाळगावा मी ?
माझीच ती कविता,
अन कवितेचा मी !!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खबरदार
खबरदार .....!!
"सोशल",कावल्यांनो,
का मुलाहिजा ,
बाळगावा मी ?
माझीच ती कविता,
अन कवितेचा मी !! >>>> क्या बात है......
व्वा छान
व्वा छान
मकरंद सुरेख लिखाण. अगदी परखड.
मकरंद सुरेख लिखाण. अगदी परखड. मनात असलेली चीड (अवाजवी टीकाकाराबद्दलची) प्रभावीपणे मांडलीय. मस्तच.
मनापासुन आभार सर्वान्चे.
मनापासुन आभार सर्वान्चे.