Submitted by मस्तराम on 28 January, 2011 - 15:00
कविता माझी फुलत होती,
श्वासासंगे उमलत होती ,
गंध नव्या स्वप्नांचा लेवून,
कविता माझी बहरत होती...
कविता माझी निरागसतेची ,
तिला न कल्पना सत्याची,
सोंग वेड्या आशेचे घेवून,
कविता माझी जगत होती...
कवितेचा का असा लळा ?
रंग तिचा का असा वेगळा ?
त्या रंगातून जणू ती,
चित्र प्रेमाचे चितारत होती....
का क्षणात व्हावे असे कळेना,
कवितेशी माझा सूर जुळेना,
कविता काही सांगेना,
माझ्याशी काही बोलेना.....
मनात शिरून तिच्या पाहिले,
तेव्हा उघड गुपित झाले,
कविता माझी मनात होती आणि .....
रस्त्यावर तुझी वरात होती !
:-मस्तराम-:
गुलमोहर:
शेअर करा