परवा पावसाने
मला रस्त्यातच गाठलं
वविच्या आठवणीने त्याच्या
डोळ्यात, पाणी की हो दाटलं
सांग माबोकरांना
आलोय मी देशात
गटग करुया मिळून
लोणावळ्याच्या घाटात
मलाही व्हायचंय चार्ज
करायचेय मजा मस्ती
बघायच्यात माबोवरच्या
आयडी मागच्या हस्ती
मग काय म्हणता लोकहो? पावसाला निराश नको ना करायला? जायचं का मग लोणावळ्याला? कधी? कसं?
ते सगळं उलगडायलाच आलोय हा पावसाचा संदेश घेऊन...
हॉस्टेल लाईफ़ मध्ये केलेली मज्जा, मस्ती, धमाल सगळ्यांच्या आयुष्यभर आठवणीत असते...
मी ७ वर्ष होस्टेलला राहिले, खुप अनुभव, खुप मैत्रीणी, त्यांच्याबरोबर घालवलेले सुख दु:खांचे मौज मजेचे दिवस, अभ्यासासाठी आणि अभ्यास नसतानाही केलेली जागरणं, हे दिवस आजही पुन्हा जगवेसे वाटतात. आता पुन्हा ते अनुभवणं शक्य नाही होणार कदाचित पण आठवणींचा आनंद नक्की घेता येइल.
चला इथे शेअर करुया होस्टेल लाईफ़ चे किस्से, मज्जामस्ती, सुपीक डोक्यातुन निघालेल्या कल्पना, केवळ उदरभरणम या हेतुने साकारलेल्या अफ़लातुन रेसिपी... ऑल अबाऊट होस्टेल लाइफ
नाचू या, गावू या, चला चला सारे या
नाचू या, गावू या, चला चला सारे या ||धृ||
शेवटचा दिवस आहे परिक्षेचा
दिवस आहे मजा करण्याचा
कोणा नका सोडू सारे सामील होवूया
कॉलेज, अभ्यास सारे काही विसरूया ||१||
कोण आता कोठे दुर जाईल
नोकरी धंदा कोण कोण पाहील
विसरू नका एकमेकां पुन्हा भेटुया
भेट घेवून पुन्हा आनंद लुटूया ||२||
कॉलेजातली मस्ती तुम्ही आठवा
मस्तीतले दिवस मनात साठवा
मैत्री आपली सर्वकाळ टिकवूया
विसरू नका काही सारे काही आठवूया ||३||