प्रकाशचित्रण

गणपती बाप्पा मोरया!!! : मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा गणपती.

Submitted by शोभा१ on 24 August, 2012 - 03:13

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुण्यात सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो हेतू आता कुठेच पहायला मिळत नाही. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहून फ़ार वाईट वाटते. असो.
पुण्यातला मानाचा पाचवा गणपती ’केसरी वाडा’ गणपती. याची स्थापना, टिळक पंचांगाप्रमाणे होते. यावर्षी गणेश स्थापना, मंगळवारी, २१ तारखेला झाली. तुम्हीही दर्शन घ्या. Happy

बनेश्वर

Submitted by रंगासेठ on 23 August, 2012 - 02:27

यंदा पाऊस तसा उशिराच बरसला, त्यामुळे पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला जास्त वेळ मिळाला नाही. तसेच नोकरी बदलली म्हणून 'नोटीस पिरिअड' मध्ये सुट्टी पण मिळणार नव्हती, पावसात भिजून कॅमेरा खराब होईल ही भिती पण वाटत होती Sad . असेच ४-५ विकांत वाया गेल्यावर आणि लोकांनी काढलेले सुंदर-सुंदर फोटो पाहून ट्रीप काढायचीच ही इच्छा प्रबळ झाली. नेमका त्याच विकांताला मी एकटा, त्यामुळे पुण्याजवळच कुठेतरी जाऊ असं ठरवलं आणि रविवारी 'बनेश्वर'ला जायचं ठरलं.

शब्दखुणा: 

चिंब भिजलेले, रूप सजलेले...

Submitted by इंद्रधनुष्य on 21 August, 2012 - 02:30

UNESCO कडून पश्विम घाटाला 'जागतीक वारसा'चा दर्जा मिळाल्या नंतर ट्रेकर्स मंडळी मधे आनंदी, उत्साही वातावरण पसरले होते. त्यातच ऑगस्ट मधे १८ ते २० अशी तीन दिवसांची सुवर्णसंधी जोडून आली खरी.... पण प्रत्येकाने आपली वैयक्तीक व्यवधाने सांभाळून केवळ रविवारचा सुमुहुर्त अहुपे घाटा करता निवडला.

शब्दखुणा: 

गँग ऑफ उडीपुरकर्स...

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2012 - 12:55

उड उड के देख जरा उड उड के च्या अप्रतिम यशानंतर मामा उर्फ मायबोलीकर मावळे आपल्या समोर पुन्हा घेऊन येत आहेत.... गँग ऑफ उडीपुरकर्स.

फार फार पुर्वीची ....म्हणजे कालचीच गोष्ट आहे.

ट्रेक - सुधागड

Submitted by मुरारी on 18 August, 2012 - 09:11

अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार?
माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती
खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं ..

शब्दखुणा: 

एक सुर्यास्त पर्थमधला....

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 August, 2012 - 03:42

त्या दिवशी डॅरेनतर्फे (माझा बॉस) आम्हाला, म्हणजे मी, हान यांग(चीन), विन्स्टन कोह(सिंगापूर), किथ डॉयर(ईस्ट ऑस्ट्रेलिया) आणि सारा मार्शल(न्युझीलँड) अशा आमच्या गृपला डीनरचे आमंत्रण होते. अजुन बराच वेळ असल्यामुळे अस्मादिकांनी समुद्रकिनार्‍यावर जावून सुर्यास्त अनुभवण्याची कल्पना मांडली जी सर्वानुमते संमत झाली. आम्ही राहात असलेले हॉटेल आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये एका पार्कींग लॉटचेच काय ते अंतर होते. त्यामुळे सगळे चालतच निघालो...

हॉटेलच्या पार्किंगमधून बाहेर पडलो की समोर उभा राहणारा क्लॉक टॉवर..
प्रचि १

यावर्षीचा आमचा "स्वातंत्र्यदिन"

Submitted by जिप्सी on 16 August, 2012 - 13:59

गेल्या दोनवर्षाप्रमाणेच याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्यदिन साजरा केला. पहिल्या वर्षी प्रत्येक टिमला एक एक राज्य दिले होते आणि त्या राज्याची संस्कृती सादर करावयाची होती. दुसर्‍या वर्षी प्रत्येक टिमला एक एक सण दिला होता आणि त्याचे सादरीकरण करावयाचे होते. यावर्षीही अशीच काही हटके थीम आम्ही घेतली होती आणि ती म्हणजे भारतातील ऐतिहासिक्/पुरातन वास्तु सादर करायची. यात आठ टिम होत्या आणि त्यातील एक एक टिमला ताजमहाल, लाल किला, सांची स्तूप, सुवर्णमंदिर, हावडा ब्रीज, महाराष्ट्रातील किल्ला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया अशी नावे आली होती.

पुण्याचा राईडींग ग्रुपची -( RSA), स्वातंत्र्यदिनानिमित्त रॅली.

Submitted by axshay on 16 August, 2012 - 03:21

१.
297033_3585653560830_1095889454_n.jpg

२.
246802_3585617879938_1071422139_n.jpg

३.
208376_3585624960115_1342927465_n.jpg

४.
217735_3587039795485_663542296_n.jpg

५.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण